राजकारणात राहिलीय का शाबूत, झारखंडचे सीएम भावाच्या त्या ‘अंडरवेअर’ मुळे अडचणीत

नवी दिल्लीः झारखंडमध्ये मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Jharkhand CM Hemant Soren) यांचे सरकार आधीच अडचणीत आलेले असताना त्यांचे भाऊ आणि दुमकाचे आमदार बसंत सोरेन आपल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन वादात सापडले आहेत. अंडरवेअर खरेदी करण्यासाठी आपण दिल्लीला गेलो होतो असं विधान त्यांनी केले होते. त्यानंतर भाजपकडून मात्र सोरेन सरकारला कोंडीत पकडण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. दुमकाच्या आमदारांचा वादग्रस्त […]

राजकारणात राहिलीय का शाबूत, झारखंडचे सीएम भावाच्या त्या ‘अंडरवेअर’ मुळे अडचणीत
Follow us
| Updated on: Sep 09, 2022 | 12:48 PM

नवी दिल्लीः झारखंडमध्ये मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Jharkhand CM Hemant Soren) यांचे सरकार आधीच अडचणीत आलेले असताना त्यांचे भाऊ आणि दुमकाचे आमदार बसंत सोरेन आपल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन वादात सापडले आहेत. अंडरवेअर खरेदी करण्यासाठी आपण दिल्लीला गेलो होतो असं विधान त्यांनी केले होते. त्यानंतर भाजपकडून मात्र सोरेन सरकारला कोंडीत पकडण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. दुमकाच्या आमदारांचा वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल (Social Media video Viral) झाला आहे. त्या व्हिडीओमध्ये आपली अनुपस्थिती का आहे हे याचे स्पष्टीकरण देताना त्या व्हिडीओमध्ये ते दिसून येत आहेत. त्या व्हिडीओमध्ये बसंत सोरेन (Basant Soren) म्हणताहेत की, माझ्या अंडरवेअर संपल्या होत्या, त्यामुळे त्या खरेदी करण्यासाठी म्हणून मी दिल्लीला गेलो होतो. त्यांच्या वक्तव्यावरुन सोरेन सरकार अडचणीत सापडले आहे.

बसंत सोरेन यांच्या या विधानावरुन झारखंडमध्ये भाजपकडून सोरेन सरकारवर सडकून टीका केली जात आहे. त्यामध्ये भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी म्हटले आहे की, सोरेन कुटुंबीय आता असंवेदनशील झाले असून त्यांना राज्यातून आम्ही हद्दपार करुन टाकू अशी जोरदार टीका भाजपने केली आहे.

आमदार आणि अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी

झारखंडमधील दोन आदिवासी मुलींच्या मृत्यूनंतर दुमका आमदारांकडून त्यांच्या मतदारसंघाला भेट देण्यात आली त्यावेळी राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या प्रतिनिधींनी या भागाला भेट देऊन अहवाल तयार केला आहे.

आदिवासी मुलींच्या हत्येचा तपास

मागील आठवड्यात 14 वर्षाच्या मुलीचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत मिळाला होता, याप्रकरणी मुलीच्या आईने एका व्यक्तीने लग्नाचे अमिष दाखवून आपल्या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. तर त्यानंतर पाच दिवसाच्या अंतराने जिवंत मुलीला एका माणसाने पेटवून दिले होते, त्यानंतर पाच दिवसांनी त्या मुलीचा मृत्यूही झाला होता.

मुलीच्या बहीणीला नोकरी

मुख्यमंत्र्यांच्या लहान भावाने ज्या मुलीला जाळून मारण्यात आले होते, त्या मुलीच्या मोठ्या बहिणीला नोकरी देण्याचे अश्वासन देऊन तेथील अधिकाऱ्यांना कागदोपत्री सगळ्या गोष्टी पार पाडण्याचे आदेश दिले आहेत. राज्यातील आदिवासी मुलींची हत्या होते, त्यांचा जीव जातो आणि सरकारमधील मंत्री, मुख्यमंत्र्यांच्या भावाला दिल्लीत जाऊन अंडरवेअर खरेदी करण्यासाठी जातात, ही गोष्ट गंभीर असून त्यामुळे लोकप्रतिनिधींचा असंवदेनशीलपणा यातून दिसून येतो असंही त्यांनी यावेळी सांगितले.

आरोपी बांग्लादेशी

मुलीला पेटवून मारण्याच्या घटनेत बांग्लोदेशाती आरोपी असल्याचा आरोप भाजपच्या नेत्यांनी केला असून या प्रकरणाची एनआयएकडून चौकशी केली जावी अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणातील आरोपी हा बांग्लादेशी असून झारखंडमधील पिंडरगरियामध्ये त्याचे कोणी नातेवाईक आहे का याचाही शोध घेतला जात आहे. माजी मुख्यमंत्री बाबुलाल मरांडी यानी आदिवासी मुलींची झालेल्या हत्येचा तपास केंद्रिय तपास यंत्रणांकडे सोपवण्याची मागणी केली आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.