Jharkhand Ropeway Collision : 46 तासानंतर रेस्क्यू ऑपरेशन संपलं, 4 लोकांचा मृत्यू; लटकणारी महिला खोल दरीत पडली
झारखंडमधील (Jharkhand) देवघरमध्ये (Deoghar) त्रिकूट पर्वत रोपवे (Ropeway) दुर्घटनेनंतर बचावकार्य अखेर संपुष्टात आले आहे. हे ऑपरेशन 45 तास चालले आणि लष्कराने 46 जीव वाचवले. या अपघातात चार जणांचाही मृत्यू झाला आहे. लष्कर, हवाई दल, आयटीबीपी, एनडीआरएफ यांच्या संयुक्त कारवाईत सोमवारी 33 जणांची सुटका करण्यात आली होती.
नवी दिल्ली – झारखंडमधील (Jharkhand) देवघरमध्ये (Deoghar) त्रिकूट पर्वत रोपवे (Ropeway) दुर्घटनेनंतर बचावकार्य अखेर संपुष्टात आले आहे. हे ऑपरेशन 45 तास चालले आणि लष्कराने 46 जीव वाचवले. या अपघातात चार जणांचाही मृत्यू झाला आहे. लष्कर, हवाई दल, आयटीबीपी, एनडीआरएफ यांच्या संयुक्त कारवाईत सोमवारी 33 जणांची सुटका करण्यात आली होती. आज 13 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. आजही एका महिलेचा डोंगरावरून खाली पडून मृत्यू झाला.
Most Shocking visual from the #Ropeway incident from #TrikutHills. This man just fell after reaching the helicopter. 3 dead now and 15 more to be rescued. Now the operation will start tomorrow during daylight. https://t.co/veZzPsQHGs pic.twitter.com/IjuI06KXk7
— Kirandeep (@raydeep) April 11, 2022
2500 फूट उंचीवर 48 जीव अडकले होते
देवघरमध्ये रविवारी रामनवमीची पूजा आणि दर्शनासाठी शेकडो पर्यटक दाखल झाले होते. यादरम्यान रोपवेची एक ट्रॉली खाली येत असताना ती वर जाणाऱ्या ट्रॉलीला धडकली. यादरम्यान अनेक ट्रॉली वरती अडकल्या, ज्यामध्ये 48 लोक होते. रविवारी दुपारी 4 वाजता हा अपघात झाला. त्यानंतर बचावकार्य सुरू करण्यात आले.
उच्च न्यायालयाने दिले चौकशीचे आदेश
देवघर रोपवे दुर्घटनेची झारखंड उच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घेतली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणावर 26 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. त्यापूर्वी राज्य सरकारला सविस्तर तपास अहवाल न्यायालयासमोर सादर करावा लागणार आहे. अपघातानंतर एनडीआरएफ आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. पण 2500 फूट उंचीवर बचावकार्य पार पाडणे अवघड काम होते. यानंतर लष्कराला पाचारण करण्यात आले. मात्र गरजेनुसार नंतर हवाई दलाची मदत घेण्यात आली. या कारवाईत हवाई दलाने आपली दोन हेलिकॉप्टर तैनात केली होती.
भुकेले आणि तहानलेले लोक
जास्त उंचीमुळे वरती अडकलेल्या लोकांपर्यंत पोहोचणे खूप अवघड काम होते. त्यामुळे ड्रोनच्या सहाय्याने त्यांच्यापर्यंत अन्न आणि पाणी पोहोचवण्यात आले. मात्र, रात्रीही यामध्ये अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे रात्रीच्या वेळी अनेकांना भुकेने व तहानलेल्या अवस्थेत राहावे लागले. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी दुपारी एकाच्या मृत्यूची माहिती देण्यात आली. यानंतर सायंकाळी एक व्यक्ती हेलिकॉप्टरमधून खाली पडली. हात निसटल्याने हा अपघात झाला. मंगळवारी एका महिलेचा डोंगरावरून खाली पडून मृत्यू झाला.