Trikut ropeway: 2000 फुटावर अडकले! रोपवे दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, आतापर्यंत किती जणांना वाचवलं?
ITBPचे पीआरो विवेक पांडे या त्रिकुट रोपवे दुर्घटनेबाबत अधिक माहिती दिली आहे. या दुर्घटनेमध्ये 12 ट्रॉलींमध्ये 48 लोक अडकले होते.
देशभरात आज वेगवेगळ्या दुर्घटनांमुळे एकच खळबळ उडाली आहे. पुण्यात बसचा अपघात (Pune Bus Accident) झाला. या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलंय. दुसरीकडे ब्रिटिशकाली पूल पडण्याची घटना मध्य प्रदेशात पडली आहे. या पुलावरुन थेट 128 चाकी ट्रॉलीच थेट खाली कोसळली आहे. तर दुसरीकडे झारखंडमध्येही रोपवे (Trikut Ropeway) तुटल्यानं एकच खळबळ उडाली आहे. झारखंडच्या देवघरमध्ये (Deoghar, Jharkhand) रोपवेचा सॅप तुटला. त्यामुळे अनेकांचे जीव हजारो फूट उंचीवर लटकले होते. या दुर्घनेत आतापर्यंत दोघांचा जीव गेला असल्याची माहिती मिळतेय. तर अनेकांना वाचवण्यासाठी बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. दुपारी 4 वाजेपर्यंत 29 लोक हवेत रोपवेच्या दुर्घटनेमुळे 2000 फूट उंचीवर अकडले होते. या लोकांना वाचवण्यासाठी आता भारतीय लष्कराची मदत घेतली जाते आहे. दरम्यान, आतापर्यंत 19 लोकांना वाचवण्यात यश आलंय.
नेमकी घटना कुठं घडली?
झारखंडच्या देवघरमध्ये असलेल्या त्रिकुट येथील रोपवेचा सॅप तुटला. त्रिकुट रोपवे दुर्घटनेत अनेक लोक अडकले होते. हजारो फूट उंचीवर लटकलेल्या या लोकांचा जीव वाचवण्यासाठी सध्या धडपड सुरु आहे. भारतीय सैन्याकडून सध्या याप्रकरणी बचावकार्य राबवलं जातंय. हेलिकॉप्टरच्या मदतीनं रोपवे दुर्घटनेत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न करण्यात आलेत.
Visuals of rescue efforts at Trikut Ropeway, #Deoghar, Jharkhand early today. #DeogharRopewayAccident pic.twitter.com/wOt9WP4DCl
— Vivek Kumar Pandey (@vivekitbp) April 11, 2022
भारतीय हवाई दलानं दिलेल्या माहितीनुसार, झारखंडच्या देवघर जिल्ह्यात बचावकार्य करण्यासाठी एमआय-17 हेलिकॉप्टर तैनात करण्यात आलं आहे. दोन एमआय-17 हेलिकॉप्टरच्या मदतीनं बचावकार्य केलं जातंय. मात्र रोपवेच्या तारांमुळे हेलिकॉप्टरने बचावकार्य करण्यातही अडथळे येत आहे. त्यामुळे बचावकार्यालाही बराच वेळ लांबलं.
The operation of #NDRF and #Army is going on in the #Ropeway accident in #Trikut, #Deoghar #Jharkhand 48 people are hanging in the air. 8 people have been rescued so far. There is news of the death of 2 women. pic.twitter.com/Z2F25acHHR
— Rajan Kumar Jha (@RealRajanjha) April 11, 2022
किती जण अडकले होते?
ITBPचे पीआरो विवेक पांडे या त्रिकुट रोपवे दुर्घटनेबाबत अधिक माहिती दिली आहे. या दुर्घटनेमध्ये 12 ट्रॉलींमध्ये 48 लोक अडकले होते. शेवटचं वृत्त हाती येईपर्यंत चोघांना 60 फूट खाली आलेल्या ट्रॉलीतून सुखरुप बाहेर काढण्यात आलंय. रविवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. रोपवेची एक तार तुटल्यामुळे ही दुर्घटना घडली होती.
पाहा व्हिडीओ :
#WATCH झारखंड: देवघर में हुए रोपवे हादसे में ट्रालियों में फंसे हुए लोगों को निकालने के लिए ‘रेस्क्यू ऑपरेशन’ चलाया जा रहा है। pic.twitter.com/wYEcENa2Wg
— ANI_HindiNews (@AHindinews) April 11, 2022
संबंधित बातम्या :
मुंबई-नाशिक महामार्गावर कंटेनरची उभ्या आयशरला धडक; एका चालकाचा मृत्यू, एक जखमी
Pune Crime : : दहाव्या मजल्यावरून उडी मारून उच्चशिक्षित महिलेची पुण्यात आत्महत्या