कोरोनाच्या नव्या व्हेरीयंटमुळे या राज्यात मास्क बंधनकारक, या वयोगटातील नागरिकांना..

सिंगापूरमध्ये कोरोनाचा नवा व्हेरीयंट सापडल्यानंतर भारतातील केरळात देखील हा व्हेरीयंट सापडल्यानंतर शेजारील राज्ये अलर्ट मोडवर गेली आहेत. त्यामुळे कोरोना संशयितांच्या चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले असून महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात 60 वर्षांवरील नागरिकांना मास्क बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोनाच्या नव्या व्हेरीयंटमुळे या राज्यात मास्क बंधनकारक, या वयोगटातील नागरिकांना..
corona maskImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Dec 18, 2023 | 6:17 PM

कर्नाटक | 18 डिसेंबर 2023 : कोरोनाच्या साथीतून जगाची अजून सुटका झालेली नाही अशी परिस्थिती आहे. कारण कोरोनाचे नवे – नवे व्हेरीएंट येतच आहेत. त्यात आता केरळात कोविड-19 चा सब व्हेरीएंट JN.1 नावाचा नवा विषाणूचा प्रकार सापडल्याने यंत्रणा दक्ष झाल्या आहेत. आता घडामोडीनंतर आपल्या शेजारील राज्य असलेल्या कर्नाटकाने त्यांच्या राज्यातील 60 वर्षांवरील नागरिकांना मास्क परिधान करणे बंधनकारक केले आहे.

केरळामध्ये कोरानाच्या नव्या वेगाने पसरणाऱ्या सब व्हेरीएंट JN.1 चे रुग्ण सापडल्याने काळजी बाळगण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता केरळच्या शेजारील राज्य कर्नाटकाने आपल्या नागरिकांसाठी नवीन नियमावली जारी केली आहे. कर्नाटकचे आरोग्यमंत्री दिनेश गुंडु राव यांनी राज्यातील संशयित रुग्णांच्या चाचण्यांचे प्रमाण वाढविले आहे. सीमावर्ती जिल्ह्यामध्ये दक्षता बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच 60 वर्षांवरील नागरिकांना मास्क घालणे बंधनकारक केले आहे. सध्या तरी नागरिकांच्या दैनंदिन हालचालींवर कोणतेही निर्बंध घालण्याची गरज नसली तरी आम्ही परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहोत असे आरोग्यमंत्री दिनेश गुंडुराव यांनी म्हटले आहे. सध्या काही घाबरण्याची गरज नाही. आम्ही परवा डॉ. के.रवी यांच्या नेतृत्वाखालील आमची तांत्रिक सल्लागार समिती बैठक घेतली. या परिस्थिती घ्यावयाच्या निर्णय आणि उपायांच्या संदर्भात अधिकारी आणि तज्ज्ञांशी चर्चा केल्याचे राव यांनी म्हटले आहे.

साठ वयोगटाच्यावरील व्यक्ती सावधान

ज्यांचे वय 60 वर्षांच्या पुढे आहे. आणि ज्यांना हृदयविकार, मधुमेह, किडनी, सर्दी, ताप, खोकला आणि श्वसना संबधीत सहव्याधी आहेत. त्यांनाच मास्क परिधान करणे बंधनकारक करण्यात आले आहेत. आम्ही जनतेलाही सूचना देत आहोत आणि कोडागु, दक्षिण कन्नड, चामराजनगरा या केरळाला लागून असलेल्या जिल्ह्यातील रुग्णालय आणि आरोग्य केंद्रांना दक्ष रहायला सांगितले असल्याचेही त्यांनी सांगितले. सीमावर्ती जिल्ह्यातील कोणतेही संशयास्पद केसेस आढळल्या तर त्यांची कोरोना चाचण्या तातडीने घेण्याचे आदेश दिले आहेत.

तर इतर प्रतिबंधात्मक उपाय योजणार

येत्या काही दिवसात आम्हाला समजेल की प्रादुर्भाव वाढतोय की कमी होतोय. आम्ही कोविडच्या चाचण्या वाढविल्याने जर अधिक पोझिटीव्ह केसेस वाढल्या तर इतर प्रतिबंधात्मक उपाय योजन्याचा निर्णय घेण्यात येईल. सध्या तरी नागरिकांच्या हालचालींवर कोणतेही अन्य निर्बंध टाकण्याची गरज नसल्याचे आरोग्य मंत्र्यांनी म्हटले आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.