नवी दिल्लीः दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठामधील (जेएनयू) अनेक भिंतींवर ब्राह्मण विरोधी नारे लागले असल्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ही घटना घडल्यानंतर विद्यापीठातील शिक्षक आणि विद्यार्थी संघटनांनी या प्रकरणाची स्वतंत्र व निष्पण चौकशी करण्याची विनंती करण्यात आली आहे. त्यानंतर मात्र गीतकार मनोज मुंतशीर शुक्ला यांनी उडी घेत सनातन धर्माचाअपमान असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
जेएनयूमध्ये ब्राह्मण विरोधी नारे लागल्यानंतर आता मनोज मुंतशीर यांनी छोटाशा व्हिडीओ शेअर करत त्यांनी पृथ्वीवरील ब्राह्मणांचे योगदान काय आहे त्याचं महत्त्व सांगितले आहे.
गीतकार मनोज मुंतशीर यांनी आपला व्हिडीओ करत त्यांनी ब्राह्मणांनी आमची संस्कृती आणि हस्तलिखितं कशी वाचवली आहेत.
तेही त्यांनी यावेळी सांगितले आहे. प्राचीन काळातही क्षत्रियांना धर्मग्रंथ, शस्रास्रे शिकवण्याची जबाबदारी ही फक्त ब्राह्मणांवर होती असं सांगत त्यांनी ब्राह्मणांची महती त्यांनी या व्हिडीओमध्ये सांगितली आहे.
त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, तो फक्त ब्राह्मण होता, जो राजांना ज्ञान देऊन महान बनत होता. दधीची ऋषी ज्यांनी समाजहितासाठी आपल्या अस्थींचेही योगदान दिले आहे.
तर ब्राह्मण तो होता, ज्यानी एका वंचित वनवासी व्यक्तीला सम्राट बनवून अखंड भारताची स्थापना केली होती, असे असले तरी आज एका गोष्टीचे दुःख आहे ते म्हणजे आज या गोष्टीबद्दल कोणीही बोलत नाही असंही त्यांनी त्यामध्ये म्हटले आहे.
गीतकार मनोज मुंतशीर शुक्ला यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केल्यानंतर त्याला अनेकांनी प्रतिसाद अनेकांनी त्यांचे समर्थन केले आहे. मात्र ब्राह्मण भारत छोडोचे नारे लागल्यानंतर या प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी करून हे नारे देणाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी विविध संघटनांकडूनकरण्यात आली आहे.