Johnson Baby Powder | तुमच्या लहान मुलांना तर लावत नाही ना ही पावडर?

Johnson Baby Powder | अनेक वर्षांपासून महिला त्यांच्या बाळांना ही पावडर अगदी विश्वासाने लावतात. पण आता ही पावडर लावत असाल तर सावध रहा. कारण..

Johnson Baby Powder | तुमच्या लहान मुलांना तर लावत नाही ना ही पावडर?
पावडरची विश्वसनीयता धोक्यातImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Sep 17, 2022 | 4:44 PM

मुंबई : जॉनसन बेबी पावडर (Johnson’s Baby Powder) ही अनेक आईंनी विश्वासांनी वापरलेली पावडर आहे. त्यांच्या तान्हुल्याला (Baby) ही पावडर त्यांनी मायेने लावली आहे. पण आता ही पावडर वापरताना सावध रहा. कारणही तसेच घडले आहे.

महाराष्ट्र सरकारच्या अन्न आणि औषधी प्रशासन विभागाने (FDA) जॉनसन बेबी पावडर कंपनीला दणका दिला आहे. ही बेबी पावडर मानकांवर खरी न उतरल्याने कंपनीचा परवाना रद्द करण्यात आला आहे.

कंपनी आता महाराष्ट्रात टॅल्क बेस्ड बेबी पावडरचे उत्पादन आणि विक्री करु शकणार नाही. पावडरचे सॅम्पल स्टँडर्ड क्वालिटीच्या कसोटीवर टिकले नाहीत.

हे सुद्धा वाचा

या कंपनीने मुंबई, मुलुंड, पुणे आणि नाशिक येथून उत्पादित मालाचे सॅम्पल FDA कडे पाठवले होते. पण सुरक्षा मानके आणि दर्जाच्या चाचणीत ही पावडर फेल झाली. त्यानंतर कंपनीचा परवाना रद्द करण्यात आला.

एफडीएने एक प्रेस नोट प्रसिद्धीला दिली आहे. त्यानुसार, नवजात शिशुंच्या त्वचेसाठी ही पावडर हानीकारक आहे. FDA ने कंपनीला बाजारातील माल परत बोलवण्याचे निर्देश दिले आहेत.

ड्रग आणि अॅडमिनिस्ट्रेशन अॅक्ट 1940 अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. यामध्ये कंपनीला उत्पादनातील दोषांबाबत नोटीस बजावण्यात आली. तसेच तिचा परवाना रद्द का करण्यात येऊ नये याची विचारणा करण्यात आली आहे.

कंपनीने याप्रकरणी उत्तर दाखल केले आहे. जगभरातील आरोग्य तज्ज्ञांच्या वैज्ञानिक आधारावर कंपनीची पावडर खरी उतरल्याचे जॉनसन अँड जॉनसनने स्पष्ट केले आहे.

टॅल्क आधारीत जॉनसन कंपनीची बेबी पावडर सुरक्षा आणि दर्जा लक्षात घेऊन तयार करण्यात येते. या कंपनीत कोणतेही हानीकारक तत्व नसल्याचा दावा कंपनीने केला आहे.

जॉनसन अँड जॉनसनने या पावडरमुळे कॅन्सरसारखा असाध्य आजार जडत असल्याचे आरोपही फेटाळून लावले आहे. या पावडरमुळे कुठलाही कँसर होत नसल्याचा दावा कंपनीने केला आहे.

अमेरिकन फार्मा कंपनी जॉनसन अँड जॉनसन अनेक दिवसांपासून भारतात त्यांच्या पावडरची विक्री करत आहे. भारतात या पावडरला मोठी मागणी आहे. यासोबतच बेबी शॅम्पू, सोप आणि ऑयलची पण कंपनी विक्री करते.

FDA च्या दाव्यानुसार, कंपनीचे पावडर मानकांच्या कसोटीवर खरे उतरले नाही. यातील पीएच मूल्य मानकांनुसार नव्हते. ही कारवाई कोलकत्यातील केंद्रीय औषधी प्रयोगशाळेच्या निर्णायक अहवालानंतर करण्यात आली आहे.

Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.