एनवी रमणा भारताचे पुढील सरन्यायाधीश होणार, CJI शरद बोबडेंनी सुचवला उत्तराधिकारी

सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश शरद बोबडे(Sharad Bobde) पुढील महिन्यात निवृत्त होणार आहेत. NV Ramana Sharad Bobde

एनवी रमणा भारताचे पुढील सरन्यायाधीश होणार, CJI शरद बोबडेंनी सुचवला उत्तराधिकारी
शरद बोबडे , एनवी रमण्णा
Follow us
| Updated on: Mar 24, 2021 | 12:01 PM

नवी दिल्ली: सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश शरद बोबडे(Sharad Bobde) पुढील महिन्यात निवृत्त होणार आहेत. त्यापूर्वी केंद्र सरकारने त्यांना पुढील सरन्यायाधीशांच्या नावाची शिफारस करण्यास सांगितलं होतं. शरद बोबडे यांनी न्यायमूर्ती एन.व्ही. रमणा (NV Ramana) यांच्या नावाची शिफारस केंद्रीय कायदा मंत्रालयाला केली आहे. (Justice NV Ramana will be next Chief Justice of Supreme Court recommended by Sharad Bobde)

सरन्यायाधीश शरद बोबडे पुढील महिन्यात सेवानिवृत्त

सरन्यायाधीश शरद बोबडे पुढील महिन्यात 23 एप्रिलला सेवानिवृत्त होणार आहेत. केंद्रीय कायदा मंत्रालयानं सरन्यायधीश निवडीची प्रक्रिया सुरु केली आहे. केंद्र सरकारनेच शरद बोबडे यांना पुढील सरन्यायाधीशांच्या नावाची शिफारस करण्यासाठी सुचवलं होते. कायदा मंत्रालायाला प्रतिसाद देत बोबडे यांनी न्यायमूर्ती एन. व्ही. रमणा यांच्या नावाची शिफारस केली आहे. केंद्रीय कायदा मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी सरन्यायाधीशांना पत्र लिहीले होते.

देशाचे 48 वे सरन्यायाधीश होणारे न्यायमूर्ती रमणा कोण?

न्यायमूर्ती एन. व्ही. रमणा हे सरन्यायधीश शरद बोबडे यांच्यानंतर सुप्रीम कोर्टातील सर्वात ज्येष्ठ न्यायमूर्ती आहेत. नुथुलापटी वेंकट रमणा यांचा जन्म 27 ऑगस्ट 1957 रोजी झाला होता. न्यायमूर्ती रमणा यांना एक वर्ष चार महिने इतका कार्यकाळ मिळणार आहे. 26 ऑगस्ट 2022 ला ते सेवानिवृत्त होतील. रमण्णा हे आंध्र प्रदेशातील शेतकरी कुटुंबातील आहेत. जून 2000 मध्ये त्यांची आंध्र प्रदेशच्या हायकोर्टात कायमस्वरुपी न्यायमूर्ती म्हणून निवड झाली होती. त्यानंतर त्यांनी दिल्ली हायकोर्टात मुख्य न्यायमूर्ती म्हणून काम केले. सुप्रीम कोर्टात 2014 पासून ते कार्यरत आहेत.

सरन्यायाधीशांची निवड कशी होते?

भारतात सरन्यायाधीशांची निवड राष्ट्रपतींकडून केली जाते. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश निवृत्त होण्यापूर्वी त्यांचा उत्तराधिकारी म्हणून ज्येष्ठ न्यायमूर्तींच्या न्यायमूर्तींची शिफारस राष्ट्रपतींना करतात. राष्ट्रपती केंद्रीय कायदा मंत्रालयाच्या सल्ल्यानं सरन्यायाधीशांची नियुक्ती करतात. सध्याचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी नोव्हेंबर 2019 मध्ये सरन्यायाधीशपदाची शपथ घेतली होती. निवृत्त सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याकडून त्यांनी कार्यभार स्वीकारला होता.

संबंधित बातम्या:

केवळ महाराष्ट्रच नव्हे, ‘या’ राज्यांनाही 50 टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण हवंय!

Parambir Singh : ‘मुंबई पोलिस आयुक्तपदावरुन केलेली बेकायदेशीर बदली रद्द करा’, परमबीर सिंगांची मागणी

(Justice NV Ramana will be next Chief Justice of Supreme Court recommended by Sharad Bobde)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.