श्रीमंत उमेदवार : ज्योतिरादित्य शिंदे तब्बल 334 कोटींचे मालक

Lok Sabha Election 2019 : 12 मे रोजी लोकसभेच्या सहाव्या टप्प्यात सात राज्यातील 59 जागांसाठी मतदान होत आहे, ज्यात 979 उमेदवारांचं भवितव्य पणाला लागणार आहे. सहाव्या टप्प्यातील 967 उमेदवारांपैकी 311 उमेदवारांकडे एक कोटी किंवा त्यापेक्षा जास्त संपत्ती आहे. मध्य प्रदेशातील गुणा मतदारसंघाचे काँग्रेस उमेदवार ज्योतिरादित्य शिंदे सर्वात उमेदवार आहेत, तर रंगलाल कुमार हे सर्वात गरीब […]

श्रीमंत उमेदवार : ज्योतिरादित्य शिंदे तब्बल 334 कोटींचे मालक
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:46 PM

Lok Sabha Election 2019 : 12 मे रोजी लोकसभेच्या सहाव्या टप्प्यात सात राज्यातील 59 जागांसाठी मतदान होत आहे, ज्यात 979 उमेदवारांचं भवितव्य पणाला लागणार आहे. सहाव्या टप्प्यातील 967 उमेदवारांपैकी 311 उमेदवारांकडे एक कोटी किंवा त्यापेक्षा जास्त संपत्ती आहे. मध्य प्रदेशातील गुणा मतदारसंघाचे काँग्रेस उमेदवार ज्योतिरादित्य शिंदे सर्वात उमेदवार आहेत, तर रंगलाल कुमार हे सर्वात गरीब उमेदवार आहेत.

वाचा – राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी, आत्या आणि भाच्याचं मनोमिलन

एडीआरच्या रिपोर्टनुसार, ज्योतिरादित्य शिंदे 374.56 कोटींच्या संपत्तीसह या टप्प्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत. तर भाजपचे पूर्व दिल्लीचे उमेदवार हे 147 कोटींसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. गुडगावमधून इंडियन नॅशनल लोकदलचे उमेदवार वीरेंद्र राणा यांच्याकडे 102.59 कोटींची संपत्ती आहे.

वाचा – दिवसभर बैठकात व्यस्त, ज्योतिरादित्य शिंदे लग्नाचा वाढदिवसही विसरले

सहाव्या टप्प्यात चार उमेदवार आहेत, ज्यांच्याकडे 100 कोटींपेक्षा जास्त संपती आहे. भिवानी महेंद्रगड मतदारसंघाच्या काँग्रेस उमेदवार श्रुती चौधरी यांच्याकडे 101.61 कोटींची संपत्ती आहे. हिसारचे खासदार दुष्यंत चौटाला 76.95 कोटींच्या संपत्तीसह या टप्प्यातील श्रीमंत उमेदवारांमध्ये पाचव्या क्रमांकावर आहेत. बसपाचे दीपक यादव यांच्याकडे 56.94 कोटींची संपत्ती आहे, तर केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांच्याकडे 55.69 कोटींची संपत्ती आहे. सोनीपतमधून निवडणूक लढत असलेल्या दुष्यंत चौटाला यांच्या भावाकडे 53.18 कोटींची संपत्ती आहे.

कोण आहेत ज्योतिरादित्य शिंदे?

वडील माधवराव शिंदे यांचं विमान दुर्घटनेत निधन झाल्यानंतर ज्योतिरादित्य राजकारणात आले. गुना या मध्य प्रदेशातील मतदारसंघातून पहिल्यांदा त्यांनी 2002 साली निवडणूक लढली आणि निवडून आले. आतापर्यंत ते सलग चार वेळा निवडून आले आहेत. 2012 ते 2014 या काळात त्यांना यूपीए सरकारमध्ये मंत्रीपदही देण्यात आलं होतं. त्यांची आत्या वसुंधरा राजे या राजस्थानच्या मुख्यमंत्री होत्या. तर यशोधरा राजे मध्य प्रदेश सरकारमध्ये मंत्री होत्या.

Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.