Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘अहंकारी नेत्याला धडा शिकवण्याची वेळ’, ज्योतिरादित्य शिंदे यांचा कमलनाथ यांच्यावर हल्लाबोल

काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी भाजपच्या महिला उमेदवारावर आक्षेपार्ह शेरेबाजी केल्याने मोठा वाद तयार झाला आहे.

'अहंकारी नेत्याला धडा शिकवण्याची वेळ', ज्योतिरादित्य शिंदे यांचा कमलनाथ यांच्यावर हल्लाबोल
Follow us
| Updated on: Oct 18, 2020 | 9:17 PM

भोपाळ : बिहार विधानसभा निवडणुकीसोबतच देशात उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये पोटनिवडणुकाही होत आहेत. मध्य प्रदेशच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस आणि भाजप आमनेसामने आहेत. त्यातच आता काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी भाजपच्या महिला उमेदवारावर आक्षेपार्ह शेरेबाजी केल्याने मोठा वाद तयार झाला आहे. भाजपने कमलनाथ यांच्यावर सडकून टीका केली आहे (Jyotiraditya Shinde Scindia Shivraj Singh criticize Kamalnath for controversial statement).

मध्य प्रदेशच्या डबरा मतदारसंघात काँग्रेसकडून सुरेंद्र राजेश उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचारासाठी आले असताना माजी मुख्यमंत्री कमलनाथ म्हणाले, “‘सुरेंद्र राजेश आमचे उमेदवार आहेत. ते सरळ साध्या स्वभावाचे आहेत. ते त्यांच्यासारखे नाहीत, काय आहे त्यांचं नाव? मी त्यांचं काय नाव घेऊ, तुम्ही तर त्यांना माझ्यापेक्षा चांगलं ओळखता. तुम्ही तर मला आधीच सावध करायला हवं होतं, ‘काय आयटम आहे’.”

इमरती देवी माजी आमदार असून त्यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासोबतच काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला. त्या ज्योतिरादित्य शिंदे यांच्या कट्टर समर्थक मानल्या जातात.

‘आयटम शब्दप्रयोग करुन कमलनाथ यांचे सामंतवादी विचार उघड’

कमलनाथ यांच्या आक्षेपार्ह शेरेबाजीवर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी जोरदार टीका केली. ते म्हणाले, “कमलनाथजी इमरती देवी या एका गरीब शेतकऱ्याच्या मुलीचं नाव आहे जिने मोलमजुरी करुन सुरुवात केली. आज त्या राष्ट्रउभारणीच्या कामात आपलं योगदान देत आहेत. काँग्रेसने मला ‘भुकेला-नग्न’ म्हटलं आणि आता एका महिलेसाठी ‘आयटम’ शब्दप्रयोग करुन त्यांचे सामंतवादी विचार उघड झाले आहेत.”

“स्वतःला ‘मर्यादा पुरुषोत्तम’ म्हणवणारे अशा ‘बेताल भाषेचा’ उपयोग करत आहेत? नवरात्रीच्या पवित्र पर्वात नारीची पूजा केली जात आहे. अशात तुमच्या या शेरेबाजीतून तुमची खालच्या स्तरातील मानसिकता दिसते. तुम्ही तुमचे शब्द मागे घ्यावेत आणि इमरती देवी यांच्यासह मध्य प्रदेशच्या प्रत्येक मुलीची माफी मागावी,” अशीही मागणी शिवराज सिंह यांनी केली.

अहंकारी नेत्याला धडा शिकवण्याची वेळ : ज्योतिरादित्य शिंदे

कमलनाथ यांच्या वक्तव्यांवर बोलताना भाजप नेते ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले, “एका गरीब आणि मजुर कुटुंबातून पुढे आलेल्या दलित नेत्या इमरती देवी यांच्यासाठी डबरा येथे आयटम आणि जलेबी असे अत्यंत निंदास्पद आणि आक्षेपार्ह शब्दप्रयोग झाले. यातून कमलनाथ यांची मानसिकता दिसते. महिलांसह संपूर्ण दलित समाजाचा अपमान करणाऱ्या या अहंकारी नेत्याला धडा शिकवण्याची वेळ आली आहे.”

संबंधित बातम्या :

मध्य प्रदेशात काँग्रेसला हादरा, ज्योतिरादित्य शिंदेंचा राजीनामा, वडिलांच्या जयंतीलाच वादळी निर्णय, सरकार संकटात

MP congress crisis | राहुल गांधींचा हुकमी एक्का मोदींच्या भेटीला, मध्य प्रदेशात काँग्रेस संकटात

कमलनाथ सरकार संकटात, मध्य प्रदेशातील 20 मंत्र्यांचे राजीनामे

Jyotiraditya Shinde Scindia Shivraj Singh criticize Kamalnath for controversial statement

कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार
कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार.
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण...
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण....
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही..
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही...
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?.
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे...
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे....
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?.
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?.
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी.
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात.
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती.