Hariyana Crime : चालत्या ट्रेनमध्ये कबड्डीपटू मुलीवर अत्याचार; हरयाणातील धक्कादायक घटना

महिलेचा आरोप आहे की, आरोपीने मुलीला कोणालाही काहीही न सांगण्याची धमकी दिली. बरीच चौकशी केल्यानंतर मुलीने घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पीडितेच्या आईने कैरू पोलीस चौकीत तक्रार दिली. याप्रकरणी तोशाम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करूनही पोलिसांनी आरोपीला अटक केली नसल्याचा आरोप पीडितेने केला आहे.

Hariyana Crime : चालत्या ट्रेनमध्ये कबड्डीपटू मुलीवर अत्याचार; हरयाणातील धक्कादायक घटना
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 25, 2022 | 1:15 AM

चंदिगढ : हरियाणाच्या भिवानी जिल्ह्यातील एका गावात धक्कादायक प्रकार घडला आहे. चालत्या ट्रेनच्या टॉयलेटमध्ये 17 वर्षांच्या कबड्डीपटूवर लैंगिक अत्याचार (Sexually Abused) केल्याची घटना समोर आली आहे. पीडितेच्या आईने कैरू पोलीस चौकीत तक्रार दाखल केली आहे. त्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी तरुणाविरुद्ध तोशाम पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचार आणि पॉक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. तसेच प्रवास करणाऱ्या महिला आणि तरुणींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. (Kabaddi girl abused in toilet of moving train in Haryana)

आरोपीची पीडित तरुणीला जीवे मारण्याची धमकी

गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी हा पीडित मुलीला फोन करून जीवे मारण्याची धमकी देत ​​असल्याचाही आरोप मुलीच्या कुटुंबीयांनी केला आहे. कैरू पोलीस चौकीत दिलेल्या तक्रारीत तसा आरोप करण्यात आला आहे. पीडितेची आईने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तिने सांगितले की, तिची मोठी मुलगी बारावीत शिकते व ती कबड्डीची खेळाडू आहे. कबड्डीच्या तयारीसाठी अकादमीत प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने आरोपीने फेब्रुवारी महिन्यात मुलीला इंदूरला नेले होते. मुलीला अकादमीचे वातावरण आवडत नसल्याने दोघेही दिल्लीला ट्रेनने गावी परतत होते. रात्री 12 वाजण्याच्या सुमारास आरोपीने मुलीला काही नशेचे पदार्थ पाजले आणि नंतर चालत्या ट्रेनच्या टॉयलेटमध्ये तिच्यावर बलात्कार केला.

महिलेचा आरोप आहे की, आरोपीने मुलीला कोणालाही काहीही न सांगण्याची धमकी दिली. बरीच चौकशी केल्यानंतर मुलीने घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पीडितेच्या आईने कैरू पोलीस चौकीत तक्रार दिली. याप्रकरणी तोशाम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करूनही पोलिसांनी आरोपीला अटक केली नसल्याचा आरोप पीडितेने केला आहे. तपास करत असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याशीही आरोपीने संगनमत केल्याचे बोलले जात आहे.

न्यायासाठी पोलीस अधीक्षकांना साकडे

पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिस अधीक्षकांकडे न्यायाची मागणी केली आहे. 19 एप्रिल रोजी आरोपी तरुणाविरुद्ध पोलिस ठाण्यात बलात्कार आणि पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली आहे. लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असे तोशाम पोलिस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी सुखबीर जाखर यांनी सांगितले. (Kabaddi girl abused in toilet of moving train in Haryana)

इतर बातम्या

Lakhimpur Kheri Violence : लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरण : मंत्रिपुत्र आशिष मिश्रा पुन्हा तुरुंगात

Bhayander Power Outage : वीज गुल झाल्यामुळे लग्नाचा मुहूर्त मध्यरात्री 1 पर्यंत खोळंबला; भाईंदरच्या माहेश्वरी भवनमधील धक्कादायक प्रकार

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.