हे छोटेसं गाव अख्ख्या भारताला हिरवेगार करीत आहे, काय कहाणी आहे या गावाची ?
आपल्या देशाला हिरवेगार करण्यात या राज्यातील एका गावाचा मोठी हातभार लागत आहे.या गावातील खास करुन महिलांच्या सहायता गटातून हे मोठे काम होत आहे. काय आहे या गावाची कहाणी ?
तामिळनाडू येथील पुडुकोट्टई जिल्ह्यातील अरिमलम जवळ स्थित एक छोटेसे गाव कल्लुकुडियिरुप्पु हे आज संपूर्ण भारत देशाला हिरवेगार करीत आहे. या गावात प्रवेश करताच आपण एका गावात नाही तर एखाद्या नर्सरीत आल्यासारखे वाटतं. येथे विविध प्रकारच्या फुल झाडांची लागवड केली जाते. या फुलांचा सुंगध आपल्याला मनमोहीत करतो. या गावातील लोक शेती सोबत विविध जातीच्या झाडांची रोपडी लावतात. या मोठ्या वृक्षांची रोपटी, शोभेची झाडे आणि फुलझाडांचा समावेश आहे. या रोपवाटीकेतील रोपटी संपूर्ण देशात निर्यात केली जातात. तर कल्लुकुडियिरुप्पु गावातील लोकांचे जीवन कसे आहे हे पाहूयात…
कल्लुकुडियिरुप्पु हे गाव पुडुकोट्टई जिल्ह्यातील अरिमलमपासून 26 किमी अंतरावर वसलेले आहे. या गावात 350 कुटुंबाचं उदरनिर्वाह शेती, नर्सरी यावर होतो. या गावाला दुष्काळी म्हटले जाते. तरीही विहीरी आणि बोअरवेलचा वापर करुन येथील लोक नर्सरी आणि शेती करीत असतात. या नर्सरीतील फुल झाडे आणि इतर रोपे देशभर हायवे किनारी आणि वृक्षा रोपणासाठी नेली जातात.
या गावच्या रहिवासी कामाक्षी यांनी दिलेल्या माहीतीनुसार त्या आधी मोलमजूरी आणि टोपल्या विणण्याचे काम करायच्या. परंतू साल 2001 त्यांनी 20 महिलांचा स्वयं-सहायता गट तयार केला आहे. छोट्या प्रमाणात फुल झाडांच्या नर्सरीचा व्यवसाय सुरु केला. त्यानंतर त्यांना पाण्याची कमतरतेचा सामना करावा लागला. जिल्हाधिकारी या गावात आले. त्यांनी गावात बोअरवेल आणि पाण्याची टाकी बांधून दिली.
नर्सरीचा व्यवसायाचा विस्तार झाला
गावात पाण्याची सोय झाल्यानंतर नर्सरीचा व्यवसाय वाढला. आज गावातील प्रत्येक कुटुंब झाडांच्या रोपांची नर्सरी चालवत आहे.या नर्सरीच्या रोपांवरच त्यांची उपजीविका सुरु आहे. कामाक्षी यांना आता मजूरीच्या कामाला जायची गरज पडत नाही. परंतू या व्यवसायातून जास्त लाभ मिळत नाही. कारण लाल मातीची कमतरता आणि खतांचा तुटवडा आहे. त्यांना शेजारील गावातून लाल मातीची खरेदी करावी लागते.
वीज आणि माती मिळावी
आपल्या एका झाडाच्या रोपाच्या विक्रीतून केवळ सहा रुपये मिळतात. अनेक रोपांच्या निर्यातीतून देखील फारसे उत्पन्न मिळत नसल्याचे कामाक्षी हीचे म्हणणे आहे.कारण माती आणि वीजेची गरज लागते. लाल मातीच्या किंमती, खतांच्या किंमती आणि वीज महागली आहे. तर सरकारने आपल्याला मोफत वीज दिली आणि कमी दरात माती उपलब्ध केली तरच त्यांना मदत होईल असे कामाक्षी सांगते.