कमल हासनच्या पक्षाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर, अब्दुल कलामांच्या सल्लागाराला तिकीट
तामिळनाडूच्या आयटी विभागाचे माजी सचिव डॉ. संतोष बाबू, व्ही पोनराज यांना मक्कल निधी मय्यम पक्षाने उमेदवारी दिली आहे. (Kamal Haasan first list of candidates)
चेन्नई : आगामी तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी (Tamilnadu Assembly Election) अभिनेते आणि मक्कल निधी मय्यम पक्षाचे (Makkal Needhi Maiam) अध्यक्ष कमल हासन (Kamal Haasan) यांनी 70 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. पहिल्या यादीत खुद्द कमल हासन यांचे नाव नाही. परंतु दिवंगत राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे सल्लागार व्ही पोनराज (V. Ponraj) यांना पक्षाकडून तिकीट देण्यात आले आहे. (Kamal Haasan releases Makkal Needhi Maiam’s first list of 70 candidates)
पहिल्या यादीत कमल हासनचे नाव नाही
तामिळनाडूच्या आयटी विभागाचे माजी सचिव डॉ. संतोष बाबू, व्ही पोनराज यांना मक्कल निधी मय्यम पक्षाने उमेदवारी दिली आहे. पक्षाच्या उमेदवारांमध्ये महिलांची संख्या लक्षणीय आहे. विधिमंडळात प्रवेश करणं, हे आमचं एकमेव उद्दिष्ट नाही. तर निवडून आल्यानंतर किमान पन्नास टक्के आश्वासनं पूर्ण करण्यावर आमचा भर राहील, असं कमल हासन यांनी स्पष्ट केलं. कमल हासन यांनी निवडणूक लढवणार असल्याचं आधीच स्पष्ट केलं आहे.
भाषास्वातंत्र्याच्या रक्षणाची हमी
“प्रख्यात लेखक मार्क ट्वेन म्हणाले होते की, राजकारण हा घोटाळ्याचा शेवटचा उपाय आहे आणि आम्ही ते बदलण्यासाठी सज्ज आहोत” असं म्हणत कमल हसन यांनी विधानसभा निवडणुकांचा एल्गार केला. एक राजकारणी म्हणूनही भाषा, भाषण आणि संस्कृती स्वातंत्र्याचे मी ठामपणे रक्षण करत राहीन, अशी हमी कमल हसन यांनी दिली.
द्रमुक-भाजपवर टीकास्त्र
तमिळ भाषिकांचे कैवारी अशी द्रमुकने स्वतःची खोटी प्रतिमा तयार केली आहे. तर एआयडीएमके पक्षाने द्रमुकवर घराणेशाहीचा आरोप केला आहे. तर भाजप जातीय आधारावर विभाजन करु पाहत असल्याचा दावा, कमल हासन यांनी केला. (Kamal Haasan releases Makkal Needhi Maiam’s first list of 70 candidates)
कमल हासन यांना फायदा होणार?
स्टॅलिन आणि रजनीकांत यांचा अपवाद वगळता तामिळनाडूत कमल हासन यांना कोणताही स्पर्धक नव्हता. त्यात रजनीकांत यांनी माघार घेतल्याने त्यांना थेट आता स्टॅलिन यांच्याशी सामना करावा लागणार आहे. तामिळनाडूत भाजपचा प्रभाव नाही. काँग्रेसही नावाला शिल्लक आहे. शिवाय कमल हासन नेहमीच प्रादेशिक अस्मितेच्या बाजूने उभे राहिल्याने त्यांना राजकीय प्रतिसाद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
संबंधित बातम्या :
अभिनेते कमल हासन स्वतः निवडणूक रिंगणात, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
रजनीकांत यांची राजकारणातून माघार; कमल हसन पोकळी भरून काढणार?
(Kamal Haasan releases Makkal Needhi Maiam’s first list of 70 candidates)