कंधार विमान अपहरण : जेव्हा भारताला मसूद अजहरला सोडावं लागलं

मुंबई : जम्मू काश्मीरमध्ये 37 सीआरपीएफ जवानांचे जीव घेणाऱ्या जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसूद अजहर पाकिस्तानमध्ये मोकाट फिरतोय. या संघटनेला पाकिस्तानकडूनच बळ दिलं जातं. मसूद अजहर जेव्हा भारताच्या हाती लागला तेव्हा त्याला सोडावं लागलं होतं. कारण, दहशतवाद्यांनी इंडियन एअरलाईन्सच्या विमानाचं अपहरण करुन मसूद अजहरला सोडण्याची मागणी केली होती. 176 प्रवाशांना ओलीस ठेवून […]

कंधार विमान अपहरण : जेव्हा भारताला मसूद अजहरला सोडावं लागलं
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:26 PM

मुंबई : जम्मू काश्मीरमध्ये 37 सीआरपीएफ जवानांचे जीव घेणाऱ्या जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसूद अजहर पाकिस्तानमध्ये मोकाट फिरतोय. या संघटनेला पाकिस्तानकडूनच बळ दिलं जातं. मसूद अजहर जेव्हा भारताच्या हाती लागला तेव्हा त्याला सोडावं लागलं होतं. कारण, दहशतवाद्यांनी इंडियन एअरलाईन्सच्या विमानाचं अपहरण करुन मसूद अजहरला सोडण्याची मागणी केली होती. 176 प्रवाशांना ओलीस ठेवून मसूद अजहरची दहशतवाद्यांनी सुटका करुन घेतली होती.

20 वर्षांपूर्वी संपूर्ण भारत हादरला होता. 24 डिसेंबर 1999 रोजी दहशतवाद्यांनी काठमांडूहून नेपाळला येणाऱ्या इंडियन एअरलाईन्सच्या विमानाचं अपहरण केलं. दहशतवादी एवढं मोठं कृत्य करु शकतात याचा भारत सरकारला अंदाजही नव्हता. विमानाचं अपहरण केल्यानंतर काही तासातच एका प्रवाशाची हत्या करण्यात आली. यामुळे भारत सरकारवरील दबाव वाढत होता. या विमानाचं अपहरण करुन ते दुबईला नेण्यात आलं. इथे विमानात इंधन भरण्याबाबत तडजोड करुन काही प्रवाशांची सुटका करण्यात आली. इथे 27 प्रवासी सोडण्यात आले.

दहशतवाद्यांनी काय मागण्या केल्या होत्या?

तालिबानच्या पाठिंब्याने अफगाणिस्तानमधील कंधारमध्ये हे विमान उतरवण्यात आलं. यानंतर तालिबानी दहशतवाद्यांनी हे विमान चारही बाजूंनी घेरलं. भारतीय प्रवाशांना सोडण्याच्या बदल्यात दहशतवाद्यांकडून काही कोट्यवधी रुपये आणि भारताच्या तुरुंगात असलेल्या त्यांच्या साथीदारांना सोडण्याची मागणी केली.

तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या कारकीर्दीतील हा सर्वात कठीण प्रसंग मानला जातो. सरकारने तालिबान्यांच्या मागण्यांना सराकात्मक प्रतिसाद देत जीवितहानी होऊ दिली नाही. 31 डिसेंबर रोजी सरकार आणि अपहरणकर्त्यांमध्ये तोडगा निघाला आणि 155 प्रवाशांची सुखरुप सुटका करण्यात आली. भारताच्या तुरुंगात कैद असलेल्या काही दहशतवाद्यांना सोडण्यावर त्यावेळी सरकारला तयार व्हावं लागलं. वाजपेयी सरकारमध्ये परराष्ट्र मंत्री असलेले जसवंत सिंह स्वतः तीन दहशतवाद्यांना घेऊन कंधारला गेले होते. या तीन दहशतवाद्यांमध्ये जैश ए मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहर, अहमद जरगर आणि शेख अहमद उमर सईद याचा समावेश होता.

मसूद अजहरचे भारतावर अनेक हल्ले

मसूद अजहरला पहिल्यांदा श्रीनगरमध्ये 1994 मध्ये अटक करण्यात आली. पण कंधार विमान अपहरणात त्याला सोडावं लागलं. 2000 मध्ये त्याने जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेची स्थापना केली. या संघटनेने 2001 मध्ये भारतीय संसदेवर हल्ला केला. हल्ल्यानंतर मसूद अजहरला पाकिस्तानमध्ये अटक करण्यात आली. पण पुराव्यांअभावी त्याची पाकिस्तानच्या कोर्टाने सुटका केली. मसूद अजहरने 2002 मध्ये अमेरिकन पत्रकार डेनियल पर्ल यांची हत्या केली होती. यानंतर अमेरिकेने मसूदला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी केली. दबाव वाढल्यानंतर पाकिस्तानने मसूदला नजरकैदेत ठेवलं होतं. पण सध्या पाकिस्तानमध्ये तो मोकाट फिरतो.

जैश ए मोहम्मदची स्थापना जेव्हा केली त्यानंतर दोन महिन्यातच श्रीनगरच्या बादामी बागमध्ये भारतीय सैन्याच्या मुख्यालयावर आत्मघातकी हल्ला करण्यात आला. यानंतर जम्मू काश्मीर सचिवालयाच्या इमारतीवरही हल्ला झाला. 2001 मध्ये स्फोटकांनी भरलेली कार जम्मू काश्मीर विधानसभेत घुसवण्यात आली, ज्यामध्ये 38 जणांचा मृत्यू झाला होता. याच वर्षी देशाच्या संसदेवरही हल्ला झाला. शिवाय पठाणकोट आणि उरीमध्ये झालेल्या हल्ल्यातही याच संघटनेचा हात होता.

चीनचा नेहमीच मसूद अजहरला पाठिंबा

जैश ए मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहरला संयुक्त राष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या यादीत टाका ही मागणी जुनी आहे. भारताच्या अनेक प्रयत्नांनंतरही चीनने मसूदला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्याच्याविरोधात पुरावे नसल्याचं चीनचं म्हणणं आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.