ट्विटरला बिल्कुल माफ करु नका, त्यांनी भारतात नागरी युद्धाचा कट केलाय, कंगना रणौतचे थेट पंतप्रधानांना साकडं
ट्विटरनं कितीही माफी मागितली तरी त्यांना माफ करु नका, अशी विनंती कंगना रणौतनं पंतप्रधान नरेंद्र मोदींना केलीय. Kangana Ranaut Twitter Narendra Modi
नवी दिल्ली: अभिनेत्री कंगना रणौत आता थेट ट्विटरविरोधात मैदानात उतरली आहे. कंगना रणौतनं ट्विट करुन थेट नरेंद्र मोदींना ग्रेट वॉरिअर पृथ्वीराज चौहान यांनी केलेली चूक करु नका, असं म्हटलंय. पृथ्वीराज चौहान यांनी केलेली चूक म्हणजे माफी होती. ट्विटरनं कितीही माफी मागूद्यात तुम्ही त्यांना माफ करु नका, अशी विनंती कंगनानं नरेंद्र मोदींना केली आहे. काही दिवसांपूर्वी ट्विटरनं कंगना रणौतच्या अकाऊंटवर नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई केली होती. ()
कंगना काय म्हणाली?
ट्विटरनं कितीवेळाही माफी मागितली तर त्यांना माफ करण्यात येऊ नये. त्यांनी भारतात नागरी युद्ध घडवण्याचा कट केल्याचा धक्कादायक आरोप कंगना रणौतनं केला आहे. कंगणानं #BanTwitterInIndia हा हॅशटॅग देखील वापरला आहे.
Honourable Prime Minister ji jo galti Great warrior Prithaviraj Chauhan ji ne ki thi woh bilkul mat karna …. uss galti ka naam tha maafi…@Twitter kitni bhi maafi mange bilkul maaf mat karna. They conspired for a civil war in India. #BanTwitterInIndia
— Kangana Ranaut (@KanganaTeam) February 11, 2021
कंगनाच्या अकाऊंटवर ट्विटरची कारवाई
क्रिकेटपटूंविरोधात आपत्तीजनक ट्विट केल्याप्रकरणी अभिनेत्री कंगना रणौतवर ट्विटरने कारवाई केली आहे. ट्विटरने तिच्या दोन पोस्ट डिलीट केल्या असून सामाजिक तेढ निर्माण होईल, असं ट्विट न करण्याची तंबीही ट्विटरने कंगनाला दिली आहे. एका ट्विटमध्ये तर कंगना रणौतनं “हे सर्व क्रिकेट खेळाडू धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का अशा स्वरुपात का बोलत आहेत” असा सवाल उपस्थित केला. याचवेळी तिन पुन्हा एकदा शेतकरी आंदोलनाबद्दल वादग्रस्त वक्तव्यं केल.”ते दहशतवादी आहेत त्यांच्यामुळे गोंधळ निर्माण झाला आहे. त्यांची भीती वाटते हे सांगून टाका, असं आव्हान कंगनानं क्रिकेटर्सना दिलं आहे.
ट्विटर भारत सरकार वाद काय?
केंद्र सरकारनं आक्षेप घेतलेल्या #ModiPlanningFarmerGenocide या हॅशटॅगसह ट्विट केलेल्या 257 पैकी 126 हॅशटॅग डिअॅक्टिव्हेट करण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी, ट्विटरने हे अकाऊंट्स ब्लॉक केले होते, परंतु लगेचच त्यांनी हे अकाऊंट्स अनब्लॉक केले. हे अकाऊंट्स अनब्लॉक करताना ट्विटरने म्हटलं होतं की तुमचे ट्विट्स हे ‘फ्री स्पीच’मध्ये मोडतात. आता यापैकी काही अकाऊंड्स पुन्हा ब्लॉक करण्यात आले आहेत. मात्र, केंद्र सरकार 257 अकाऊंटसवर कारवाई करण्यासाठी आक्रमक झाले आहे. केंद्र सरकारनं ट्विटर प्लॅटफॉर्मला तुम्ही खोट्या, असत्य, बेनामी आणि स्वयंचलित बॉट अकाऊंटस वापरण्यास परवानगी देते, असं ठणकावलं आहे.
संबंधित बातम्या:
कंगना रोहित शर्माच्या ट्विटवर म्हणाली, हे सर्व क्रिकेटर्स म्हणजे धोबी का कुत्ता, घर का ना घाट का!
जगप्रसिद्ध पॉपस्टारच्या ट्विटला उत्तर देताना कंगना म्हणते, आंदोलन करणारे शेतकरी नाहीत तर दहशतवादी !
Farmer Protest: भारतासाठी काय चांगलं हे आम्हाला कळतं, बाहेरच्यांनी नाक खुपसू नये: सचिन तेंडुलकर
कंगनाला ट्विटरचा झटका, आक्षेपार्ह ट्विट हटवले; अकाउंट बॅन होणार?
(Kangana Ranaut request Prime Minister Narendra Modi to not pardon twitter