शिवसेनेच्या आधीच्या कार्यकरिणीत एकनाथ शिंदे कितव्या क्रमांकाचे नेते होते ? कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सुरू
उद्धव ठाकरे यांनी काहींची नेमणूक केली होती. तर काही निवडून आले होते. पक्षाचे सर्व निर्णय हे उद्धव ठाकरे घेत होते. आत्तापर्यन्तची सर्व निवड ही उद्धव ठाकरे यांनी केली असल्याचे सिब्बल यांनी म्हंटले आहे.
नवी दिल्ली : सलग दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात ( Supreme Court ) सुनावणी सुरू झाली आहे. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल ( Kapil Sibbal ) यांनी दुसऱ्या दिवशीही युक्तवाद केला आहे. दुसऱ्या दिवसाच्या सुनावणीत सुरुवातीला कपिल सिब्बल यांनी 10 व्या सूचीबाबत माझं बोलणं झालं असून इतर मुद्यांवर बोलतो म्हणत शिवसेनेच्या आधीच्या कार्यकरिणीवर युक्तिवाद सुरू केला आहे. कपिल सिब्बल यांनी शिसेनेच्या अधिकच्या कार्यकारिणीत उद्धव ठाकरे हे पक्षातील एक नंबरचे नेते होते.
तर सध्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरे यांनी स्वतः 2018 ला एकनाथ शिंदे यांची नेते पदी निवड केली होती. तेव्हाच्या कार्यकारिणीत एकनाथ शिंदे यांचे स्थान हे चौथ्या स्थानावर होते असं सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल यांनी म्हंटलं आहे.
उद्धव ठाकरे यांनी काहींची नेमणूक केली होती. तर काही निवडून आले होते. पक्षाचे सर्व निर्णय हे उद्धव ठाकरे घेत होते. आत्तापर्यन्तची सर्व निवड ही उद्धव ठाकरे यांनी केली असल्याचे सिब्बल यांनी म्हंटले आहे.
त्यावर सरन्यायाधीश यांनी कागदपत्रावरुन तसं दिसत नाही असे म्हंटले आहे. त्यावर कपिल सिब्बल यांनी कार्यकरिणीची वचन करत 2019 ला एकनाथ शिंदे यांची गटनेते पदी निवड केल्याचे म्हंटले आहे.
त्यानंतर कपिल सिब्बल यांनी आधीच्या कार्यकरिणीचे वाचन करत असतांना सुनील प्रभू यांची प्रतोद पदी निवड केली होती त्यावेळी उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री नव्हते असेही कपिल सिब्बल यांनी खंडपीठासमोर सांगितले आहे.
पक्षाची बैठक झाली त्यावेळी पक्षाचे सर्व निर्णय हे उद्धव ठाकरे घेत होते. बैठकीत सर्व अधिकार हे ठाकरे यांना देण्यात आले होते. व्हीपचा निर्णय हा पक्ष घेत असतो. त्यामध्ये जी बैठक घेण्यात आली ती बैठक निवडणून आलेल्या आमदारांची होती अशी टिपन्नी सरन्यायाधीश यांनी केली आहे.
याच दरम्यान सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी मुख्य प्रतोद कसे निवडले जातात याचे वाचन केले आहे. दोन निवडीच्या ठरावाचे वाचन सरन्यायाधीश यांनी केली आहे. त्याचवेळी 2019 ला गटनेते आणि प्रतोदची निवड योग्य की अयोग्य यावर चर्चा सुरू झाली आहे.
एकूणच शिवसेनेची कार्यकारिणी आणि त्यानंतर गटनेते आणि मुख्य प्रतोद निवड योग्य की अयोग्य यावर चर्चा होत असतांना कायद्याचे वाचन सर्वोच्च न्यायालयात केले जात आहे. दुसऱ्या दिवशी महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा होत असतांना उमेश ठाकूर केसचाही दाखला सिब्बल यांनी दिला आहे.