माझ्या भावाला दिलेल्या शिवीगाळ यावरही एक पुस्तक निघेल; काँग्रेसचे नरेंद्र मोदी यांना जोरदार प्रत्युत्तर
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल करताना त्यांची तुलना विषारी सापाशी केली होती. कालच पीएम मोदींनी खर्गे यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत काँग्रेसने मला कितीही शिव्या दिल्या, तरी मी नेहमीच जनतेची सेवा करेन, असे म्हटले होते.
जमखंडी : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजप आणि काँग्रेसमध्ये आता जोरदार शाब्दिक युद्ध सुरू आहे. तर काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हुमनाबाद येथील सभेत बोलताना त्यांनी काँग्रेसने केलेल्या टीकेवर बोलताना त्यांनी काँग्रेसने दिलेल्या शिव्या मोजून दाखवल्या होत्या. तर जेव्हा-जेव्हा काँग्रेसने मला शिवीगाळ केली होती, तेव्हा तेव्हा जनतेने त्याची त्यांना शिक्षा दिली आहे. काँग्रेसच्या लोकांनी मला आतापर्यंत 91 वेळा शिव्या दिल्या असल्याचे नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते. तर पंतप्रधान मोदींच्या याच वक्तव्यावर आता काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनीही प्रत्युत्तर दिले आहे.
आज राज्यातील जमखंडी येथे एका निवडणूक सभेत संबोधित करताना प्रियांका गांधी यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
जनतेसमोर रडणारा असा पंतप्रधान मी पहिल्यांदाच पाहत आहे. त्यांच्यावर किती वेळा अत्याचार झाले त्याची हे यादी तयार करत आहे.
यावेळी त्या म्हणाल्या की, जर भाजप नेत्यांनी दिलेल्या शिवीगाळ यावर बोलायचं आणि लिहायचं काँग्रेसने ठरवलं तर अनेक पुस्तके लिहिता येतील असा खोचक टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.
प्रियंका गांधी म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझा भाऊ राहुल गांधी यांच्याकडून शिकावे. भाजपवाल्यांनी त्यांना खूप शिव्या दिल्या.
त्यांच्याप्रमाणे माझ्या कुटूंबाला दिलेल्या अत्याचाराची नोंद ठेवल्या तर अनेक पुस्तकं त्यावर लिहून होतील. पंतप्रधान फक्त त्यांचे दुःख व्यक्त करतात.
त्यांच्या कार्यालयाने कधी अशी यादी बनवली आहे का ज्यात जनतेच्या समस्या लिहिल्या असतील? तसे कधीच होणार नाही. पण त्यांना कोणी किती शिव्या दिल्या हे मात्र ते नक्की सांगतील असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल करताना त्यांची तुलना विषारी सापाशी केली होती. कालच पीएम मोदींनी खर्गे यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत काँग्रेसने मला कितीही शिव्या दिल्या,
तरी मी नेहमीच जनतेची सेवा करेन, असे म्हटले होते. मात्र आता कर्नाटकातील जनता काँग्रेसच्या शिवीगाळांना त्यांच्या मतांनी उत्तर देईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.