कर्नाटकात भाजपला खिंडार, माजी मुख्यमंत्र्यांना तिकीट नाकारल्याने काँग्रेसमधून भाजपविरोधात शड्डू ठोकला

मी स्थापन केलेल्या पक्षातून मला जबरदस्तीने हाकलून देण्यात आल्याची टीकाही त्यांनी केली आहे. काँग्रेसची विचारधारा आणि तत्त्वे स्वीकारून मी काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याचे त्यांनी पक्ष प्रवेशानंतर सांगितले.

कर्नाटकात भाजपला खिंडार, माजी मुख्यमंत्र्यांना तिकीट नाकारल्याने काँग्रेसमधून भाजपविरोधात शड्डू ठोकला
Follow us
| Updated on: Apr 19, 2023 | 12:49 AM

बेंगळुरू : भारतीय जनता पक्षातून (भाजप) काँग्रेसमध्ये येऊन फक्त एक दिवस झालेल्या कर्नाटकच्या माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांना आता त्यांच्याच मतदारसंघातून हुबळी-धारवाडमधून तिकीट मिळाले आहे. यावेळी भाजपने शेट्टर यांना तिकीट न देण्याचा निर्णय घेतला होता, त्यामुळे नाराज होऊन त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला होता. सहा वेळा आमदार राहिलेल्या शेट्टर यांनीही दिल्लीत जाऊन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याबरोब चर्चा केली होती. त्यावेळी त्यांनी सांगितले होते की, मला स्वत:च्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त करण्यात आली होती.

भाजपने यावेळी 2 याद्या जाहीर केल्या होत्या मात्र त्यामध्ये त्यांचे नाव जाहीर करण्यात आले नव्हते. त्यानंतर त्यांनी तात्काळ भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

त्याच दिवशी भाजपने दुसरी यादी जाहीर केली, ज्यात त्यांच्या जागेवरून दुसऱ्याला तिकीट देण्यात आल्याचे जाहीर केले होते. त्यांच्या मतदार संघातून भाजपने महेश टेंगींकाई यांना उमेदवारी दिल्याचे सांगण्यात आले आहे.

यापूर्वी 16 एप्रिल रोजी भाजपचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी तिकीट मिळाल्याने नसल्याने आपल्याला अपमानास्पद वाटत असल्याचे जाहीरपणे सांगितले होते.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष डी. के. शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला.

पक्ष सोडल्यानंतर शेट्टर यांनी भाजपवर हल्लाबोल सुरूच ठेवला आहे. त्यांनी भाजपचे सचिव बी.एल. संतोष यांच्यावर तिकीट न मिळाल्याचा कट रचल्याचा आरोप केला आहे.

मी स्थापन केलेल्या पक्षातून मला जबरदस्तीने हाकलून देण्यात आल्याची टीकाही त्यांनी केली आहे. काँग्रेसची विचारधारा आणि तत्त्वे स्वीकारून मी काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याचे त्यांनी पक्ष प्रवेशानंतर सांगितले.

शेट्टर हे लिंगायत समाजाचे प्रमुख नेते आहेत. त्यांच्या बाहेर पडल्याने भाजपला मोठा फटका बसू शकतो, असे मानले जात आहे. शेट्टर हे 2012 ते 2013 पर्यंत राज्याचे मुख्यमंत्री होते. 2008 ते 2009 या काळात ते कर्नाटक विधानसभेचे अध्यक्षही होते. याशिवाय त्यांनी विरोधी पक्षनेत्याची भूमिकाही पार पाडली आहे.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.