किती भयानकय हे… महिलेनं मदत मागितली; म्हणून भाजपच्या मंत्र्यांनं थेट कानशिलात लगावली…
जमिनी वाटप सुरू असताना आपल्याला जमिन का मिळाली नाही असा जाब विचारला म्हणून मंत्र्याने थेट महिलेच्या कानशिलातच लगावली आहे.
बेंगळुरूः कर्नाटकातील एक महिला आपल्याला आलेल्या अडचणी आणि समस्या सांगण्यासाठी कर्नाटकातील एका भाजपच्या मंत्र्यांकडे (BJP Leader) गेली होती. त्या महिलेच्या अडचणी ऐकून घ्यायच्या सोडून त्या भाजपच्या मंत्र्याने महिलेच्याच कानशिलात लगावली आहे. या घटनेचा काही वेळातच व्हिडीओही व्हायरल झाला आहे. महिलेला झालेल्या मारहाणीनंतर मात्र विरोधकांनी आणि काँग्रेसने ट्विट (Congress) करून केंद्र सरकारला घेरले आहे. कर्नाटकचे पायाभूत सुविधा विकास मंत्री व्ही. सोमन्ना (Minister V. Somanna) चामराजनगर जिल्ह्यातील हंगला गावाच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी सोमन्ना यांच्याकडून जमिनीचे वाटप करण्यात येत होते.
कर्नाटक की BJP सरकार के मंत्री वी सोमन्ना ने एक महिला को थप्पड़ जड़ दिया।
महिला का अपराध था कि वो अपनी फरियाद लेकर BJP के मंत्री के पास चली गई।
अब PM मोदी का बयान पढ़ लीजिये – ‘क्या हम स्वभाव से, संस्कार से, नारी को अपमानित करने वाली हर बात से मुक्ति का संकल्प ले सकते हैं?’ pic.twitter.com/eSdyRZaFqv
— Congress (@INCIndia) October 23, 2022
या कार्यक्रमावेळी जमिनीचे वाटप करण्यात येत होते. त्यावेळी आपल्याला जमीन जमिन मिळाली नसल्याने ती महिला तक्रार घेऊन मंत्र्यांकडे गेली होती.
त्यावेळी आपली समस्या आणि आपल्याला जमिन का मिळाली नसल्याचे सांगत असतानाच मंत्री सोमन्ना यांनी तिच्या कानशिलात लगावली. त्यानंतरही त्या महिलेनी आपल्याला जमीन मिळावी यासाठी मंत्र्यांचे पाय धरले.
त्यानंतर या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. सोशल मीडिया आणि काँग्रेसने जोरदार हल्लाबोल केल्यानंतर मात्र व्ही सोमन्ना यांनी नंतर माफी मागितल्याचे सांगितले जात आहे.
भाजपच्या व्ही. सोमन्ना यांच्या या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. काँग्रेस पक्षाकडून हा व्हिडीओ ट्विट केला आहे. यामध्ये मंत्री सोमन्ना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला आहे.
कर्नाटकातील या घटनेमुळे राजकीय वातावरण पेटले आहे. काँग्रेसकडून आणि विरोधी पक्षाकडून भाजपच्या नेत्यांवर जोरदार टीका केली जात आहे. सोमन्ना यांनी महिलेला मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्याने अनेक जणांनी भाजपला आरोपीच्या पिंजऱ्यातच उभा केले आहे.