डेंग्यू ताप ‘साथ’ म्हणून घोषित, त्रस्त राज्याचा मोठा निर्णय, हे आहे कारण ?

डेंग्यूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने तेथील देशातील या राज्याचे सरकार हादरले आहे. त्यामुळे या डेंग्यू या आजाराला आता या राज्यातील सरकारने महासाथ म्हणून घोषीत केले आहे.

डेंग्यू ताप 'साथ' म्हणून घोषित, त्रस्त राज्याचा मोठा निर्णय, हे आहे कारण ?
dengue in karnataka
Follow us
| Updated on: Sep 03, 2024 | 9:26 PM

देशातील काही राज्यात पावसाने कहर केल्यानंतर आता डेंग्यूच्या साथीचा जोर वाढला आहे. याच दरम्यान कर्नाटक राज्याने डेंग्यू आजाराला साथ म्हणून जाहीर केले आहे. कर्नाटक सरकारने डेंग्यू आजाराची वाढती प्रकरणे पाहून या आजाराला महासाथ म्हणून घोषीत केले आहे. आणि या आजाराच्या सर्व प्रकारच्या स्ट्रेनला अधिसूचनेत सामिल केले आहे. हा आजार आता महासाथ म्हणून जाहीर केल्याने डेंग्यू संदर्भात राज्यात अधिक काळजी घेण्यात येत आहे. या आजाराला महामारी म्हणून जाहीर केल्याने आता त्याच्या उपचार आणि बचावाचे नवे प्रोटोकॉल जारी करण्यात आले आहेत.

डेंग्यूच्या प्रकरणांवर राज्यात कठोर नजर ठेवली जात आहे. सर्व विभागांना डेंग्यू कंट्रोल करण्याचे आदेश दिले असल्याचे कर्नाटकाचे आरोग्य मंत्र्यांनी सांगितले. रुग्णालयांना डेंग्यू रुग्णांसाठी व्यवस्था करण्यासाटी सूचना केलेल्या आहे. तसेच आशा वर्कर आता घरोघरी जाऊन जनतेचे प्रबोधन करीत आहेत. डेंग्यूमुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी पावले उचलली जात आहेत. डेंग्यू अळ्यांना ओळखण्याचे आणि त्यांची पैदास रोखण्यासाठी विशेष मोहीमा राबविण्याचे आदेश दिले असल्याचे कर्नाटकाच्या आरोग्य मंत्र्‍यांनी म्हटले आहे.

महामारी म्हणून घोषीत का झाली?

यंदा जानेवारी ते जुलैपर्यंत राज्यात डेंग्यूचे सात हजाराहून अधिक रुग्ण आढळले आहेत. तसेच एकूण सात रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसेंदिवस डेंग्यूचा वाढत चाललेला धोका पाहूनच सरकारने त्याला महासाथ म्हणून घोषित केले आहे.आता प्रत्येक रुग्णालयात प्रति वॉर्ड 10 खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत असे कर्नाटक सरकारने म्हटले आहे.

डेंग्यू म्हणजे काय ?

डेंग्य हा आजार डास चावल्याने होतो. डेंग्यू आजार पसरविणारा हा डास स्वच्छ पाण्यात वाढतो. जेव्हा हा डास कोणा व्यक्तीला चावतो. तेव्हा त्याच्या शरीरात डेंग्यू व्हायरस पसरतो. बहुसंख्य प्रकरणात आठवडाभरातच डेंग्यूचा ताप बरा होतो. परंतू काही प्रकरणात हा ताप गंभीर समस्या निर्माण करु शकतो. डेंग्यूमुळे शरीरातील प्लेटलेट्सची संख्या कमी होत जाते. जर पेंशीची संख्या 30 हजाराहुन कमी झाली तर जीवाला धोका निर्माण होतो. डेंग्यूमुळे शॉक सिंड्रोम देखील होऊ शकतो. या आजारात शरीरातील अनेक अवयव निकामी होण्याचा धोका असतो.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'.
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?.
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक.