देशातील या राज्यात आक्रमक श्वान पालनावरील केंद्राच्या बंदीला स्टे, केंद्राने 23 कुत्र्यांच्या जातींवर घातली होती बंदी
पिटबुलसारख्या आक्रमक 23 श्वानांच्या पालनावर केंद्र सरकारने नुकतीच बंदी घातली आहे. आता या निर्णयावर एका राज्याने स्टे आणला आहे. या निर्णयाने आता इतर राज्यातील श्वान प्रेमी देखील हायकोर्टात धाव घेण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली | 20 मार्च 2024 : केंद्र सरकारने अलिकडेच पिटबुल सारख्या 23 आक्रमक श्वानांना पाळण्यास बंदी घालण्याचा आदेश जारी केला आहे. यामुळे अनेकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. तर अशा श्वानांना प्रेमाने घरी पाळणाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आता कर्नाटक राज्यातील हायकोर्टाने मोठे पाऊल उचलत केंद्र सरकारच्या या नोटीफिकेशनला स्टे आणला आहे. अलिकडेच पाळीव श्वानांद्वारे लोकांवर झालेल्या हल्ल्यात काही जणांचा मृत्यू झाल्याच्या घटना उघडकीस आल्या होत्या, त्यानंतर केद्र सरकारने राज्यांना पिटबुल टेरियर, अमेरिकन बुलडॉग, रॉटविलर आणि मॉस्टिफ्स सारख्या आक्रमक श्वानांना पाळण्यास मनाई केली आहे.
कर्नाटक राज्यातील हायकोर्टाने मंगळवारी केंद्रीय मत्स्यपालन, पशुपालन आणि डेअरी विभागाच्या या सर्क्युलरला स्टे दिला आहे. केंद्र सरकारने 12 मार्च रोजी जारी केलेल्या आदेशात 23 हिंसक श्वानाच्या जाती मानवी जीवनास धोकादायक ठरवित त्यांना पाळण्यास मनाई केली आहे. या संदर्भात डॉग ब्रीडर आणि केनेल क्लब ऑफ इंडिया या श्वान प्रेमी संघटनेने कर्नाटक उच्च न्यायालयात केंद्र सरकारच्या नोटीफिकेश विरोधात याचिका दाखल केली. या याचिकेत या बंदी आदेशाला विरोध करीत स्टे आणण्याची मागणी केली होती. या याचिकेवर सुनावणी झाली असता कर्नाटक हाय कोर्टच्या न्यायमूर्ती एम. नागाप्रसन्ना यांच्या एकल खंडपीठाने या आदेशाला सध्या स्टे दिला आहे. केंद्र सरकारच्या सर्क्युलरला कर्नाटक राज्यापुरता स्टे असल्याचे आदेशात नमूद केले आहे.
या श्वानांच्या प्रजातींवर बंदी
केनेल क्लब ऑफ इंडियाच्या याचिकेत केंद्रीय मंत्रालयाने हा निर्णय जारी करण्यापूर्वी स्टेक होल्डर्सली कोणतीही सल्लामसलत केली नाही. आणि परस्पर हा निर्णय घेतल्याचा युक्तीवाद या संघटनेने केला. त्यानंतर कर्नाटक हायकोर्टाचे न्यायमूर्तींना केंद्र सरकारला जबाब सादर करण्याचे आदेश देत तोपर्यंत हा निर्णयाला स्टे दिला आहे. पिटबुल टेरियर, टोसा इनु, अमेरिकन स्टेफोर्डशायर टेरियर, फिला ब्रासीलीरो, डोगो अर्जेंटीनो, अमेरिकन बुलडॉग, बोअरबोएल कांगल, मध्य एशियाई शेफर्ड डॉग, कोकेशियन शेफर्ड डॉग, दक्षिण रूसी शेफर्ड डॉग, टॉर्नजॅक, सरप्लानिनॅक, जापानी टोसा आणि अकिता, मास्टिफ, टेरियर्स, रोडेशियन रिजबॅक, वुल्फ डॉग, कॅनारियो, अकबाश डॉग, मॉस्को गार्ड डॉग, केन कोर्सो और बॅंडोग सारख्या 23 श्वानांच्या आयातीवर तसेच पालन आणि पोषण तसेच ब्रीडींगवर केंद्र सरकारने बंदी आणली आहे.