तुमच्या हिजाबमुळेच आम्ही अडचणीत; तुम्ही बुरख्यातच राहा…
हिजाबवर बंदी आणण्यात आली तर मुस्लिम समाजाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे.
नवी दिल्लीः कर्नाटक हिजाब (karnataka hijab Issue) प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) खंडपीठाकडून सुनावणी होणार आहे. मात्र या सुनावणीआधीच उत्तर प्रदेशातील संभल लोकसभा मतदारसंघातील समाजवादी पक्षाचे खासदार शफीकूर रहमान (Khasdar Shafiqur Rahman Burke) यांनी वादग्रस्त विधान केले आहे. त्यांच्या या विधानामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणाबद्दल बोलताना ते म्हणाले की, मुलींनी हिजाबमध्येच राहण्याची गरज आहे. मुलींनी हिजाब न घालताच फिरत असतील समाजात भ्रामकपणा वाढणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
हिजाबवर बंदी आणण्यात आली तर मुस्लिम समाजाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. आणि त्याचा विपरित परिणामही भोगावा लागणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
तरीही याबाबत सर्वोच्च न्यायालय योग्य निर्णय घेईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. भाजपमुळे समाजाचे वातावरण बिघडत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
कर्नाटकातील शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब घालण्यावरील बंदी उठवण्यास नकार देणाऱ्या कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्यात आले होते.
त्यानंतर या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाकडून गुरुवारी वेगळा निकाल देण्यात आला. न्यायमूर्ती हेमंत गुप्ता यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधातील याचिका फेटाळून लावल्या होत्या.
हिजाब प्रकरणाचा निकाल देताना न्यायमूर्ती गुप्ता म्हणाले की, या प्रकरणी मतभेद आहेत. हा निर्णय पाहता, उच्च न्यायालयाच्या निकालाला आव्हान देणाऱ्या याचिका पुढील खंडपीठाच्या स्थापनेसाठी मुख्य न्यायमूर्तींसमोर ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या बाबतचा आपला निकाल वाचून दाखवताना न्यायमूर्ती हेमंत गुप्ता यांनी सांगितले की, हे मत भिन्न आहेत. मी माझ्या ऑर्डरमध्ये 11 प्रश्न तयार केले आहेत.
यामध्ये पहिले अपील घटनापीठाकडे पाठवायचे की नाही? तर न्यायमूर्ती हेमंत गुप्ता यांनी शैक्षणिक संस्थांमधील हिजाब वापरावरील बंदी उठवण्यास नकार देणाऱ्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात दाखल केलेल्या याचिका फेटाळूनही लावण्यात आल्या आहेत.
याआधीही खासदार शफीकुर रहमान बुर्क हे त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले होते. जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त ते म्हणाले होते की, बाळंतपणाचा संबंध मानवाशी नसून निसर्गाशी आणि अल्लाहशी असल्याचे त्यांनी म्हटले होते.
त्यावेळी ज्यावेळी बाळ जन्मते त्यावेळी त्याच्याय अन्नाचीही व्यवस्था तोच करतो असंही ते म्हणाले होते. खासदार बर्क यांनी योगी सरकारला सल्ला देताना सांगितले की, लोकसंख्या नियंत्रण कायदा करण्यापूर्वी राज्य सरकारने मुस्लिमांच्या शिक्षणाची व्यवस्थाही करावी, जेव्हा मुस्लिमांना शिक्षण मिळेल आणि आपला समाज शिक्षित होईल, तेव्हा वाढत्या लोकसंख्येची समस्या दूर होणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.
तर दुसरीकडे शफीकुर रहमान बर्क यांनी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) वर कारवाई केली गेल्यानंतर मात्र हा अत्याचार सुरु असल्याचे त्यांनी म्हटले होते.