Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Karnataka Sex Scandal: अखेर ‘त्या’ सेक्स क्लीपमुळे भाजप मंत्र्याचा राजीनामा

रमेश जारकीहोळी यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांच्याकडे सोपवला आहे. | ramesh jarkiholi resigned

Karnataka Sex Scandal: अखेर 'त्या' सेक्स क्लीपमुळे भाजप मंत्र्याचा राजीनामा
रमेश जारकीहोळी यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांच्याकडे सोपवला आहे.
Follow us
| Updated on: Mar 03, 2021 | 2:02 PM

बंगळुरु: सेक्स स्कँडलमुळे चर्चेत आलेले कर्नाटकमधील भाजपचे मंत्री रमेश जारकीहोळी (ramesh jarkiholi ) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. एका सेक्स टेप (Sex video tape) प्रकरणात रमेश जारकीहोळी यांचे नाव समोर आले होते. त्यांची ही क्लीप समोर आल्यानंतर पक्षाची बदनामी टाळण्यासाठी जारकीहोळी यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.  प्राथमिक माहितीनुसार, रमेश जारकीहोळी यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांच्याकडे सोपवला आहे. (karnataka minister ramesh jarkiholi resigned )

जारकीहोळी यांचा राजीनामा इतक्या तातडीने का घेतला?

केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकतीच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. यामध्ये दक्षिणेतील तीन राज्यांचा समावेश आहे. त्यामुळे निवडणुकीत भाजपला याप्रकरणाचा फटका बसू शकतो. त्यामुळेच भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी हे प्रकरण गांभीर्याने घेत बी.एस. येडियुरप्पा यांना रमेश जारकीहोळी यांचा राजीनामा घेण्याचा आदेश दिल्याचे समजते. आता रमेश जारकीहोळी पत्रकारपरिषद घेऊन या सगळ्यावर आपली बाजू मांडणार आहेत.

आरोप सिद्ध झाले तर राजकारण सोडून देऊन: जारकीहोळी

हा व्हीडिओ समोर आल्यानंतर रमेश जारकीहोळी यांनी ती सेक्स टेप खोटी असल्याचा दावा केला होता. मी संबंधित महिला किंवा तक्रारदाराला ओळखत नाही. मी त्यावेळी म्हैसूरला होतो. मी पक्षश्रेष्ठींची भेट घेऊन माझी बाजू स्पष्ट करेन. माझ्यावरील आरोप सिद्ध झाले तर मी राजकारण कायमचे सोडेन, असेही रमेश जारकीहोळी यांनी सांगितले.

नोकरीचं आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार?

जारकीहोळी यांनी नोकरीचं आमिष दाखवून युवतीवर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप दिनेश कलहळ्ळी यांनी केला आहे. कलहळ्ळी यांनी बंगळुरुचे पोलीस आयुक्तांकडे याबाबत तक्रारही दाखल केली आहे. त्याचबरोबर पीडित तरुणीला सुरक्षाव्यवस्था पुरवण्याचीही मागणी करण्यात आली आहे. कलहळ्ळी यांनी जारकीहोळी यांची एक सीडी व्हायरल केली आहे. या सीडीमध्ये जारकीहोळी हे एका तरुणीला शरीरसंबंध ठेवण्याबाबत बोलत असल्याचा दावा त्यांनी केलाय.

नोकरी देण्यास नकार, तरुणीकडून व्हिडीओ व्हायरल?

कर्नाटक सरकारमधील एका मंत्र्याचे अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे भाजप सरकारमध्ये मोठी खळबळ माजली आहे. नोकरी लावण्याचं आमिष दाखवून युवतीवर अत्याचार केल्याचा आरोप रमेश जारकीहोळी यांच्यावर करण्यात आला आहे. नोकरीचं आमिष दाखवून अत्याचार केले. मात्र पुढे नोकरी देण्यास नकार दिल्यानंतर तरुणीने जारकीहोळी यांच्यासोबतचे काही क्षण रेकॉर्ड केले. बाब समजल्यानंतर जारकीहोळी यांनी संबंधित तरुणीला याचे वाईट परिणाम होतील अशी धमकी दिल्याचीही माहिती मिळत आहे. दरम्यान, व्हायरल झालेले हे व्हिडिओ साधारण महिनाभरापूर्वीचे असल्याचं सांगितलं जात आहे.

मानवी हक्क आयोगाचे दिनेश कलहळ्ळी यांच्याकडे संबंधित तरुणीच्या कुटुंबियांनी आपलं गाऱ्हाणं मांडल. त्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार केली. या प्रकरणाचा तातडीने तपास करावा आणि पीडित मुलीला आणि तिच्या कुटुंबियांना संरक्षण देण्याची मागणी कलहळ्ळी यांनी केली आहे.

संबंधित बातम्या:

बेळगावच्या पालकमंत्र्यांची आक्षेपार्ह सीडी सार्वजनिक, कर्नाटकच्या राजकारणात मोठी खळबळ

(karnataka minister ramesh jarkiholi resigned )

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.