बेंगळुरूः कर्नाटकातील गृहनिर्माण मंत्री व्ही. सोमन्ना (Housing Minister V. Somanna) यांनी एका कार्यक्रमात महिलेला थप्पड मारल्याप्रकरणी वादात सापडले आहेत. जमिन वाटपाच्या कार्यक्रमात ही महिला मंत्री सोमन्नांकडे आपली समस्या घेऊन गेली होती. मात्र अडचणी न विचारता, किंवा समस्या न सोडवता त्यांनी थेट महिलेच्या कानशिलात (Slap) लगावली होती. त्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral) झाला आहे. त्यामुळे सोमन्ना हे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. त्यामुळे आता कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनीही त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागितले आहे.
#WATCH | Karnataka Minister V Somanna caught on camera slapping a woman at an event in Chamarajanagar district’s Hangala village in Gundlupet Taluk, where he was distributing land titles.
(Source: Viral video) pic.twitter.com/RGez4y1fCV
— ANI (@ANI) October 23, 2022
मंत्री सोमन्ना यांनी अद्याप या घटनेवर कोणतेही भाष्य केलेले नाही. मात्र या घटनेबाबतचे विधान मात्र समोर आले आहे. त्यामध्ये महिलेने सांगितले आहे की, मंत्र्याने तिला थप्पड मारली नाही तर तिचे सांत्वन केले आहे.
त्या घटनेविषयी सांगताना ती म्हणाली की, मी त्यांच्याकडे मदत मागण्यासाठी गेले होते आणि त्यांना (मंत्र्यांना) जमीन देण्याची विनंती केली होती.
त्यावेळी मी त्याच्या पाया पडले. त्यावेळी कोणीतरी त्यांना सांगितले की, मला त्यांनी थप्पड मारली आहे. मात्र ती थप्पड नव्हती, तर त्यांनी माझं सात्वंन केले होतं, आणि मला त्यांनी आता मदतही केली असल्याचे त्यांनी सांगितले.
“I went there to ask for help &requested him to give land. At the same time,I fell on his feet& somebody said that he (Karnataka Minister V Somanna) slapped me. There was no slap,it’s just an allegation against the minister. He consoled &helped me,” said the woman who was slapped pic.twitter.com/36ynwvmHyl
— ANI (@ANI) October 23, 2022
मंत्री व्ही सोमन्ना हे गुंडलुपेट येथील हंगला गावात गेले होते. त्यावेळी त्या गावात जमिनी वाटपाचा कार्यक्रम सुरु होता. त्यावेळी त्या कार्यक्रमामध्ये या महिलेला जमिनीचा लाभ मिळालेला नव्हता. त्यामुळे ती महिला त्या मंत्र्यांकडे गेली. आणि आपल्या कामाविषयी ती त्यांना विनंती करु लागली.
महिला मंत्र्यांकडे आपली समस्या घेऊन गेल्यानंतर तेथे जमा झालेल्या नागरिकांनी धक्काबुक्की केली. त्यामुळे सोमन्ना मंत्री भडकले होते. त्या कारणामुळेच त्यांनी महिलेला थप्पड मारल्याचे सांगितले जात होते.
या घटनेनंतर मंत्रालयाकडून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये महिलेने सांगितले आहे की, ती खूप गरीब असल्याने तिने फक्त एका भूखंडासाठी मंत्र्यांकडे विनंती केली होती.