नरक यातनातून केले मुक्त..आहे तरी कोण ही जय-वीरुची जोडी..

देहविक्रय करणाऱ्या महिलांबरोबर दोघं दारुडे भांडू लागले म्हणून दोघं मित्र पुढे सरसावले आणि एक नाही दोन नाही हजारो महिलांना त्यांनी नरकयातनेतून बाहेर काढले.

नरक यातनातून केले मुक्त..आहे तरी कोण ही जय-वीरुची जोडी..
Follow us
| Updated on: Sep 21, 2022 | 6:41 PM

म्हैसूरः कर्नाटकात सुमारे 3 दशकांपूर्वी दोन मित्रांनी एक एनजीओ (NGO) सुरू केली होती. लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या महिला आणि लहान मुलींना मदत करणे हाच त्या एनजीओचा एक उद्देश होता. 1990 च्या काळात हे सामाजिक काम म्हणून सुरु केलेल्या कामांमुळे आजच्या घडीला 5 हजारहून अधिक महिला आणि लहान मुलींचे जीवन बदलूनच गेले आहे. कर्नाटकातील म्हैसूरमध्ये (Mysore) घोडागाडी चालकांची दुर्दशा अशा बातमीासाठी ते फिरत होते.

त्यावेळी त्यांच्यासमोर एक घटना घडली की, दोघं जण दारु पिऊन देह विक्रय करणाऱ्या महिलांसोबत वाद घालत होते. ही घटना आहे, 1990 च्या दशकातील.

दोघंजण दारु पिऊन वाद घालू लागल्यावर देह विक्रय करणाऱ्या महिलेनेही शिव्या देण्यास चालू केल्या. त्याचवेळी महिलांच्या दुर्दशेबद्दल स्टॅनले वर्गीस आणि एम.एल. परशुराम या दोघांना त्यांची दया आली. आणि त्यांनी त्यांच्यासाठी आणि समाजातील उपेक्षित मुलांसाठी काम करण्याचा निर्णय घेतला.

हे काम करण्यासाठी त्यांनी नोकरीही सोडून दिली आणि ओढनाडी एनजीओ सुरू केली. त्यानंतर त्यांच्या या कामामुळे ही स्टॅनली-परशू जोडी प्रचंड हिट आहे.

कर्नाटकातील ओडनाडी ही संस्था आता अनाथ मुला-मुलींना निवासी आणि शैक्षणिक मदतसाठी ओळखली जाते. यामध्ये प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांपासून ते पदव्युत्तर अभ्यासक्रमात शिकणाऱ्या युवक-युवतींचा समावेश आहे.

त्यांच्या या कामाचा व्याप वाढून आता एनजीओची आज नेदरलँड्स, स्वीडन, यूके, कॅनडा आणि यूएसमध्येही कार्यालये स्थापन केली आहेत.

कर्नाटकात, ओडनाडी लैंगिक हिंसाचाराला बळी पडलेल्या महिला आणि लहान मुलींना मदत करणारी संस्था म्हणून ओळखली जाते.

त्यांनी आपल्या घट्ट सामाजिक सहसंबंधाद्वारेच महिलांची होणाऱ्या विक्रीतून त्यांनी किमान 13,000 महिलांची सुटका केली आहे.

लैंगिक हिंसाचार, अत्याचाराला बळी पडलेल्या आणि देह विक्रय करणाऱ्या महिलांच्या मुलांसाठी ही शैक्षणिक संस्थांतून 1 टक्के आरक्षणासाठी प्रयत्न करणारी संस्थाही म्हणून याकडे पाहिले जाते.

मागील तीस वर्षापासून ही संस्था काम करते आहे. स्टॅनली आणि परशुराम यांची ही ओडनादीच्या माध्यमातून कर्नाटकातील विविध भागात काम करते.

या दोन माणसांनी आतापर्यंत 5000 महिला आणि मुलांना लैंगिक हिंसाचाराच्या दलदलीतून बाहेर काढले आहे. या सर्वांना म्हैसूर आणि इतर ठिकाणी देहविक्रय करण्यासाठी जबरदस्ती करण्यात आली होती.

स्टॅनली आणि परशुराम यांच्या या जोडीमुळे सर्वसामान्य कुटुंबीयांनी आता संस्थेतील मुला-मुलींबरोबर आपल्या मुलांची लग्न करुन दिली आहेत. असे जवळपास 100 विवाह या संस्थेच्या माध्यमातून झाले आहेत.

ओढनदी या संस्थेच्या दोन स्वतंत्र इमारती असून त्यापैकी एक मुलींसाठी आणि दुसरी मुलांसाठी आहे. या एनजीओमध्ये 24 कर्मचारी आहेत.

त्यामध्ये तीन व्यावसायिक समुपदेशकांचाही समावेश आहे. स्वयंसेवी संस्था येथे राहणाऱ्या महिला, मुली आणि मुलांच्या संगोपनासाठी दरमहा सुमारे तीन लाख रुपये खर्च येतो.

या सामाजिक संस्थेला आता पोलिसांचाही हातभार लागला आहे. त्यांच्याकडून पाहिजे मदत दिली जाते.

स्वयंसेवी संस्था अशा महिला आणि मुलांशी संपर्क साधून त्यांना कायदेशीर मदत करुन त्यांना जगण्याचा नवा अधिकार मिळवून देते.

संस्थेतील मुला मुलींना अभ्यास करण्यास आणि त्यांच्या कौशल्यांना प्रोत्साहन देण्यासाठीही मदत केली जाते. यामुळे त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मोठी मदत केली जाते.

स्टॅनलीच्या आमची सामजिक संस्था ही तीन स्तरावर काम करते. ते बचाव, पुनर्वसन आणि पुन्हा एकत्रीकरणासाठी तत्पर असते. कन्नडमध्ये ओढनाडी म्हणजे सोबती जो व्यक्तीला कोणत्याही अटी आणि शर्तीशिवाय स्वीकारतो. आणि सावलीप्रमाणे त्या व्यक्तीसोबत चालतो.

स्टॅनली आणि परशुराम यांनी सगळ्यात आधी देह विक्रय करणाऱ्यांच्या मुलांची काळजी घेण्यापासून सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी महिलांना भाडोत्री घरात राहण्यास मदत केली.

नाट्यदिग्दर्शक म्हणून ओळखले जाणारे प्रसाद कुंदूर हे या दोघांबद्दल बोलताना म्हणतात की, या दोघांनाही सगळीकडून धोका आहे.

त्यात पोलीस, समाजकंटक आणि अंडरवर्ल्ड यांच्याकडून आलेल्या धमक्यांचाही समावेश आहे. तरीही लैंगिक अत्याचार झालेल्या महिलांसाठी मात्र ही दोन माणसं जीव धोक्यात घालून प्रामाणिकपणाने लढत आहेत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.