जम्मू काश्मीर राज्यात अद्याप १६८ दहशतवादी सक्रिय असल्याची माहिती आहे. या वर्षभरात ७५ दहशतवाद्यांना यमसदमी पाठवण्यात सैन्यदलाला यश आले आहे. मारण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये २१ दहशतवादी हे बाहेरच्या देशातले असल्याची माहितीही अधिकार्यांनी दिली आहे.
गेल्या काही काळात काश्मीरमध्ये अतिरेक्यांच्या कारवाया वाढल्यात
Image Credit source: ANI
Follow us on
श्रीनगर – काश्मिरात (Jammu Kashmir)दहशतवादी कारवाया (terrorist activity)अद्यापही सुरुच आहेत. सामान्य माणसांना सातत्याने लक्ष्य करण्यात येते आहे. गुरुवारी बडगाम जिल्ह्यात चेदुरा तहसील कार्यालय परिसरात झालेल्या गोळीबारात एका काश्मिरी पंडिताची (Kashmiri Pandit)हत्या करण्यात आली आहे. राहुल भट्ट हे या मृत काश्मिरी पंडिताचे नाव आहे. राहुल भट्ट हे तहसील कार्यालयात नोकरी करीत होते. दहशतवाद्यांनी तहसील कार्यालयात घुसून राहुल भट्ट यांच्यावर गोळीबार केला. त्यानंतर उडालेल्या गोंधळात भट्ट यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. जिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. जम्मू–काश्मीर पोलिसांनी या घटनेची माहिती दिली आहे.
I strongly condemn the barbaric killing of Rahul Bhat by terrorists at Budgam. Those behind this despicable terror attack will not go unpunished. J&K Govt stands in solidarity with the bereaved family in this hour of grief: Office of J&K Lt Governor, Manoj Sinha
जम्मू–काश्मिरातील अनेक भागांत गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद्यांविरोधात सैन्यदलाकडून कारवाई करण्यात येते आहे. निरनिराळ्या भागांमध्ये तपास मोहिमा सुरु आहेत. त्यात अनेक दहशतवादी ठारही झाले आहेत. त्यामुळे दहशतवाद्यांत अस्वस्थता निर्माण झाली असून, पलटवार करण्यासाठी अशा कारवाया करण्यात येत आहेत.
जम्मू काश्मीरच्या उपराज्यपालांनी व्यक्त केले दु:ख
जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी दहशतवाद्यांनी केलेल्या या हत्येची तीव्र शब्दात निंदा केली आहे. या दहशतवादी कृत्याच्या मागे असलेल्यांना सोडणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. या दुखाच्या प्रसंगात जम्मू काश्मीर सरकार भट्ट यांच्या कुटुंबाच्या शोकात सहभागी असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली आहे.
काश्मिरात अद्याप १६८ दहशतवादी सक्रिय
जम्मू काश्मीर राज्यात अद्याप १६८ दहशतवादी सक्रिय असल्याची माहिती आहे. या वर्षभरात ७५ दहशतवाद्यांना यमसदमी पाठवण्यात सैन्यदलाला यश आले आहे. मारण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये २१ दहशतवादी हे बाहेरच्या देशातले असल्याची माहितीही अधिकार्यांनी दिली आहे. गेल्या ११ महिन्यांत प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ झालेल्या चकमकींत दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले. तर घुसखोरीचे १२ प्रयत्न हाणून पाडण्यात आल्याची माहितीही देण्यात आली आहे.
२०२१ मध्ये १८० दहशतवादी मारले
एकट्या २०२१ या वर्षांत काश्मिरात १८० दहशतवाद्यांना यमसदनी पाठवण्यात आले आहे. यात १८ दुसऱ्या देशांतील होते. गुप्तचर यंत्रणांनी दिलेली माहिती आणि स्थानिकांनी केलेल्या मदतीमुळेच हे शक्य होत असल्याचे सैन्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. गेल्या वर्षभरात दहशतवाद्यांसाठी स्लीपर सेल म्हणून काम करणाऱ्या ४९५ जणांना अटक करण्यात यश आले आहे. तर यावर्षी चार महिन्यांच्या काळात ८७ जणांना अटक करण्यात आली आहे.
गेल्या काही काळात दहशतवादी कारवाया वाढल्या
मंगळवारी जम्मू–काश्मीरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी तर एक सामान्य नागरिक मारले गेले. तर एक जवान आणि दोघेजण जखमी झाले आहेत. बांदीपोरा परिसरात सैन्यदलाने एका दहशतवाद्याला ठार मारले. त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्६साठी जप्त करण्यात आला आहे. सोमवारी शओपिया परिसरात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोन सामान्य नागरिक जखमी झाले होते. अनंतनागमध्ये चकमकीत दोन दहशतवादी ठार झालेत.
दहशतवादी हल्ल्याचा कट
श्रीनगरमध्ये बोमिनातून चार दहशतवाद्यांना पकडण्यात पोलिासंना यश मिळाले आहे. हे चारही जण दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत होते. त्यांच्याकडूनही मोठा शस्६साठा जप्त करण्यात आला आहे. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात सैन्यदलाच्या कारवाया दिवसेंदिवस तीव्र होत आहेत.