Election result 2023 : 12 वीपर्यंत शिक्षण, अंगावर 11 गुन्हे दाखल असणाऱ्या उमेदवाराने केला राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा पराभव

Telangana assembly election 2023 : दोघात तिसरा सगळं विसरा ही म्हण अनेकदा ऐकली असेल. मात्र आता प्रत्यक्षात तसं झालं असून 12 शिकलेल्या उमेदवाराने मुख्यमंत्री आणि भावी मुख्यमंत्री यांना पराभूत केलं आहे.

Election result 2023 : 12 वीपर्यंत शिक्षण, अंगावर 11 गुन्हे दाखल असणाऱ्या उमेदवाराने केला राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा पराभव
assembly-election
Follow us
| Updated on: Dec 04, 2023 | 6:10 PM

मुंबई : देशातील पाच राज्यांच्या निवडणुकीचा निकाल लागला असून भाजप पक्षाने तीन राज्यात आपला झेंडा फडकावला. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये सत्तेत येणार आहेत. तर काँग्रेस पक्षाला फक्त तेलंगणामध्ये यश आलेलं आहे. केसीआर यांच्या बीआरएसला काँग्रेसने धक्का देत सत्तांतर केलं आहे. देशात चर्चा झाली ती म्हणजे तेलंगणामध्ये भाजपच्या एका उमेदवाराने दोन महारथींना धक्का दिल्याची, कोण आहे तो उमेदवार आणि कोणाचा पराभव केला जाणून घ्या. महत्त्वाचं म्हणजे हा उमेदवार 12 वी शिकला असून त्यांच्या अंगावर तब्बल 11 गुन्हे दाखल आहेत.

थेट मुख्यमंत्री आणि सत्तेत आलेल्या प्रदेशाध्यक्षांना धक्का

भाजपच्या या उमेदवाराचं नाव कटिपल्ली वेंकट रमण रेड्डी असून त्यांचं वय 53 वर्षे इतकं आहे. कटिपल्ली रमण रेड्डी व्यापारी असल्याची माहिती असून त्यांच्याकडे जवळपास 50 कोटी रूपयांची संपत्ती आहे. उद्योगपती असलेल्या रेड्डी यांनी विधानसभा निवडणुकीध्ये धमाकेदार एन्ट्री केली. पठ्ठ्याने थेट राज्याचे मुख्यमंत्री केसीआर आणि चालू निवडणुकीमध्ये सत्तेत येणाऱ्या काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी यांचा पराभव केला.

कटिपल्ली रमण रेड्डी यांनी आपल्या कामरेड्डी विधानसभा मतदारसंघात अनेक शाळा आणि रूग्णालये बांधली आहेत. याआधी ते भाजप कामारेड्डी विधानसभेचे प्रभारी आणि निजामाबाद जिल्हा पंचायत अध्यक्ष म्हणून काम पाहिलं होतं. निवडणुकीमध्ये भाजपला 11 जागा मिळाल्या त्यामधील ही एक जागा लॉटरी ठरली. पहिल्यांदाच भाजपने या मतदारसंघातून विजय मिळवला.

दरम्यान, कट्टीपल्ली वेंकट रमना रेड्डी यांना 66,652 मते मिळाली आहेत. कटिपल्ली यांनी सीएम केसीआर यांचा 6741 मतांनी पराभव केला आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या केसीआर यांना 59, 911 मते मिळाली. तिसऱ्या क्रमांकावर तेलंगणा काँग्रेस प्रदेश समितीचे अध्यक्ष रेवंत रेड्डी आहेत. त्यांना 54916 मते मिळाली आहेत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.