Royal Enfield ची राजवट संपवायला आली 1.49 लाखांची ‘ही’ बाईक, लुकही आहे जबरदस्त

125 सीसी बाईक प्रमाणेच हंगेरियनच्या Keeway SR250 ला मल्टी-स्पोक व्हील्स, ब्लॉक पॅटर्न टायर्स, चॉप्ड फेंडर्स, फ्रंट फोर्क गेटर्स, वर्तुळाकार इन्स्ट्रुमेंट कन्सोल, रिबड पॅटर्न सीट आहे.

Royal Enfield ची राजवट संपवायला आली 1.49 लाखांची 'ही' बाईक, लुकही आहे जबरदस्त
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Jan 12, 2023 | 12:41 PM

नवी दिल्ली : रॉयल इनफील्ड या दुचाकीचा संपूर्ण देशात दबदबा आहे. या कंपनीची कुठलीही नवीन गाडी बाजारात आली तर ग्राहक तिला पसंती देतात. रॉयल इनफील्ड च्या दुचाकीचा खपही मोठ्या प्रमाणात आहे. भारतातील अशा दुचाकींमध्ये मोठ्या प्रमाणात स्पर्धा आहे. विविध कंपन्या नवनवीन प्रकारात दुचाकी बाजारात विक्रीला आणतात, त्यात अशीच एक दुचाकी थेट रॉयल इनफील्डला टक्कर देणारी आहे. नागरिकांमध्ये रॉयल इनफील्डची क्रेझ मोठ्या प्रमाणात आहे अशातच हंगेरियन या कंपनीने नवीन दुचाकी बाजारात आणली आहे. ऑटो एक्सपो 2023 मध्ये हंगेरियन दुचाकी कंपनी Keeway SR250 ही दुचाकी बाजारात आणली आहे. अवघ्या 1.49 लाख एक्स-शोरूम किमतीची दुचाकी रॉयल एनफिल्ड हंटर 350 ला टक्कर देणारी आहे. बाजारात या दोन्ही दुचाकीची स्पर्धा सुरू झाली आहे. त्यामुळे Royal Enfield च्या हंटर 350 ला टक्कर देणारी Keeway SR250 दुचाकी भाव खाऊन जात आहे.

Keyway SR250 ही दुचाकी हंगेरियन कंपनीच्या SR125 दुचाकी सारखीच पण क्लासिक रेट्रो-थीमचा प्रकार आहे. हंगेरियन कंपनीची SR250 दुचाकी भारतात आधीच उपलब्ध आहे.

125 सीसी बाईक प्रमाणेच हंगेरियनच्या Keeway SR250 ला मल्टी-स्पोक व्हील्स, ब्लॉक पॅटर्न टायर्स, चॉप्ड फेंडर्स, फ्रंट फोर्क गेटर्स, वर्तुळाकार इन्स्ट्रुमेंट कन्सोल, रिबड पॅटर्न सीट आहे.

हे सुद्धा वाचा

याशिवाय जुना स्कूल स्क्रॅम्बलर-प्रकारचा स्टॅन्स मिळतो. या दुचाकीतील खास बाब म्हणजे एक गोलाकार सिंगल-पॉड डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि एलईडी लाइटिंग देखील आहे.

इंजिन आणि पॉवरमध्ये Keeway SR250 ही 250 cc सिंगल-सिलेंडर एअर-कूल्डचा इंजिनमध्ये समावेश आहे. सिंगल-सिलेंडर आणि 4-स्ट्रोक इंजिन 7500rpm चे आहे.

16.08HP ची पीक पॉवर आणि 6500rpm नुसार 16Nm च्या पीक टॉर्कचाही सपोर्ट आहे. ग्लॉसी व्हाईट, ग्लॉसी रेड आणि ग्लॉसी ब्लॅक या तीन रंगांमध्ये ही दुचाकी उपलब्ध होणार आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार एप्रिल 2023 पर्यंत या दुचाकीची राइड चाचणी पूर्ण होऊ वितरण सुरू होणार आहे.

Keyway SR250 ही दुचाकी रॉयल एनफील्ड हंटर 350, TVS Ronin आणि Kawasaki W175 ला टक्कर देणारी आहे. नव्या पद्धतीनुसार SR250 मॉडेल हे अद्यावायत दुचाकीमध्ये सहभागी झाले आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.