Kerala Election 2021 : तिकीट मिळालं नाही, काँग्रेस महिला मोर्चाच्या अध्यक्षाचं मुंडण, राजीनामाही सादर!
आता केरळमधील काँग्रेसच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा लतिका सुभाष यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. इतकंच नाही तर त्यांनी तिकीट मिळालं नाही म्हणून मुंडणही केलं आहे!
तिरुवअनंतपुरम : केरळमध्ये काँग्रेसला अजून एक झटका बसलाय. केरळ काँग्रेसमधील गटबाजी आणि काँग्रेस हायकमांडच्या कामकाजावर बोट ठेवत पीसी चाको यांनी राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता केरळमधील काँग्रेसच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा लतिका सुभाष यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. इतकंच नाही तर त्यांनी तिकीट मिळालं नाही म्हणून मुंडणही केलं आहे!(Congress leader Latika Subhash resigns as she did not get ticket in Kerala assembly elections)
लतिका सुभाष यांनी इत्तूमनूर विधानसभा मतदारसंघातून लढण्याची तयारी दर्शवली होती. त्याबाबत त्यांनी पक्षाकडे तिकीटही मागितलं होती. पण पक्षानं त्यांना तिकीट दिलं नाही. त्यामुळे सुभाष यांनी मुंडण करत निषेध व्यक्त केला आहे. मी पदाचा राजीनामा देत आहे. पण अन्य कुठल्याही पक्षात सहभागी होणार नसल्याचं सुभाष यांनी स्पष्ट केलंय. सुभाष यांना स्वत: राहुल गांधी यांनीच 2018 मध्ये काँग्रेसच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा म्हणून नियुक्ती केली होती. त्यावेळी राहुल गांधी हे पक्षाचे अध्यक्ष होते.
Kerala Mahila Congress chief Lathika Subhash gets her head tonsured in front of the party office in Thiruvananthapuram in protest after being denied the party ticket for Assembly elections.
“I am not joining any party but I’ll resign from my post,” she says. pic.twitter.com/FWme31IEdU
— ANI (@ANI) March 14, 2021
बुधवारी पीसी चाको यांचा राजीनामा
पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि गांधी परिवाराचे विश्वासू राहिलेले पीसी चाको यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. चाको यांनी बुधवारी राजीनाम्याची घोषणा केली. ANIने दिलेल्या माहितीनुसार चाको यांनी पक्षाच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे आपला राजीनामा पाठवला आहे. चाको यांनी केरळ काँग्रेसमधील गटबाजीला कंटाळून आपण राजीनामा देत असल्याचं म्हटलंय.
पक्षांतर्गत गटबाजीबाबत आपण पक्ष नेतृत्वाला कळवून थकलो आहोत. केरळ काँग्रेसमध्ये जे काही सुरु आहे, त्याबाबत पक्ष नेतृत्व फक्त बघ्याची भूमिका घेत आहे, अशी खंतही चाको यांनी बोलून दाखवली आहे. विधानसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर चाको यांचा राजीनामा काँग्रेससाठी मोठा झटका मानला जात आहे.
#WATCH Congress leader PC Chacko says, “PM Modi has negative opinion for the first family of India, the first family of India is truly the first family of India. India is obliged to them… India is India today because of the planning and leadership of Pandit Jawaharlal Nehru…” pic.twitter.com/lOK9ztpcEj
— ANI (@ANI) March 30, 2019
गांधी परिवाराची स्तुती ते राजीनामा!
गांधी परिवार हा देशातील पहिला परिवार असल्याचं सांगत दोन वर्षांपूर्वी चाको यांनी वाद ओढवून घेतला होता. त्यावेळी देशपातळीवर चाको यांच्यावर मोठी टीका झाली होती. भाजपने तर चाको हे गांधी परिवाराची चाटूगिरी करण्यातच धन्यता मानत असल्याचं टीकास्त्र डागलं होतं. आता मात्र त्यात गांधी परिवाराच्या नेतृत्वावर नाराजी व्यक्त करत चाको यांनी राजीनामा दिला आहे.
संबंधित बातम्या :
केरळमध्ये CPIM चा मोठा निर्णय, तरुणांना संधी देण्यासाठी 5 मंत्र्यांसह 25 आमदारांचं तिकिट कापलं
Congress leader Latika Subhash resigns as she did not get ticket in Kerala assembly elections