अंगावरची हळदही फिटली नव्हती, ट्रान्सजेंडर बॉडीबिल्डर प्रवीण नाथने जीवन संपवलं, व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी केलं होतं लग्न

प्रवीण नाथ त्यांच्या वैवाहिक जीवनात समाधानी नसल्याच्या बातम्या काही दिवसांपासून ऐकायला येत होत्या. दोघांमध्ये तणाव निर्माण झाला होता. मात्र प्रवीण नाथ यांनी त्या अफवा निराधार असल्याचे म्हटले होते.

अंगावरची हळदही फिटली नव्हती, ट्रान्सजेंडर बॉडीबिल्डर प्रवीण नाथने जीवन संपवलं, व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी केलं होतं लग्न
Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: May 05, 2023 | 9:20 AM

तिरुअनंतपुरम : केरळमधील पहिला ट्रान्सजेंडर बॉडीबिल्डर (Kerala first transgender body builder) प्रविणनाथ यांनी त्यांचं आयुष्य संपवलं (killed himself) आहे. त्यांनी इतकं टोकाचं पाऊल का उचललं, यामागचं ठोस कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र वैयक्तिक आयुष्यातील समस्यांमुळे त्यांनी जीवन संपवलं असावं असा कयास बांधला जात आहे. एका दिवसापूर्वी प्रवीण नाथनी (pravin nath) राहत्या घरी विष प्राशन केले. यानंतर त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी सांगितले की, प्रवीण हे शहराच्या उपनगर भागात राहत होते. त्यांनी घरात विष प्राशन केले. यानंतर त्यांचा मृत्यू झाला.

प्रवीण यांचा मृतदेह मेडिकल कॉलेजमध्ये ठेवण्यात आला आहे. तेथे त्यांचे शवविच्छेदन केले जाणार आहे. जेणेकरून मृत्यूचे कारण खरोखरच आत्महत्या आहे की दुसरे काही, हे कळू शकेल. या वर्षी प्रवीण नाथ यांनी व्हॅलेंटाईन डेला त्यांच्या ट्रान्सजेंडर जोडीदाराशी लग्न केल्यानंतर प्रवीण नाथ यांचे नाव चर्चेत आले होते. त्यांच्या या निर्णयाचे अनेकांनी कौतुक केले होते. पण अनेकांनी वादग्रस्त कमेंटही केल्या. प्रवीण नाथ यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. पोलिस या प्रकरणाचा तपास करत असून अनेक लोकांचीही चौकशी केली जात आहे.

लग्नानंतर तणावात होते !

मीडिया रिपोर्ट्समध्ये असे सांगण्यात आले होते, की लग्नानंतर त्यांच्या नात्यात तणाव निर्माण झाला होता. भांडणतंटेही होत होते. मात्र प्रवीण नाथ यांनी हा दावा चुकीचा असल्याचे सांगितले होते. आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण नसल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र आता त्यांनी अचानक जीवन संपवल्याने त्यांच्या मृत्यूनंतर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पोलीस प्रत्येक बाजूने चौकशी करत आहेत. पोलिस हे त्यांच्या जोडीदाराचाही जबाब घेऊन त्याची चौकशी करणार आहेत.

2022 मध्ये गाठली आंतरराष्ट्रीय स्पर्धेची अंतिम फेरी

मिळालेल्या माहितीनुसार, प्रवीण नाथ यांना विष प्राशन केल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याला त्रिशूर मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले, तेथे त्यांचा मृत्यू झाला. ते पलक्कड येथील इलवणचेरी येथील रहिवासी होते. यावर्षी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी त्याने रिशाना ऐशूसोबत लग्न केले. दोघेही खूप खुश होते. तीन दिवसांपूर्वी त्यांच्या लग्नाबाबत वेगवेगळ्या अफवा पसरल्या होत्या. दोघेही वेगळे झाले असल्याचे बोलले जात होते. प्रवीणने मात्र या सर्व अफवा फेटाळून लावत असे काहीच नसल्याचे नमूद केले होते. प्रवीणने 2021 मध्ये ट्रान्सजेंडर प्रकारात मिस्टर केरळ चॅम्पियनशिप जिंकली. 2022 मध्ये ते आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अंतिम फेरीत पोहोचले होते.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.