8 तास काम नंतर 3 तास आराम, पगारही फुल्ल; जाणून घ्या ‘हा’ नवा नियम
केरळ सरकारने (Kerala government) एक नवा नियम जारी केला आहे. या नव्या नियमानुसार या राज्यातील कामगारांना कामादरम्यान तीन तास (working hours) आराम करता येणार आहे.
तिरुअनंतपुरम : उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. दुपारी कडक ऊन पडायला लागले आहे. दरवर्षी उष्माघात आणि गर्मीमुळे अनेक नागरिकांचा मृत्यू होतो. ही बाब लक्षात घेऊन केरळ सरकारने (Kerala government) एक नवा नियम जारी केला आहे. या नव्या नियमानुसार या राज्यातील कामगारांना कामादरम्यान तीन तास (working hours) आराम करता येणार आहे. यासाठी सरकारने किमान वेतन कायदा 1958 च्या 24 आणि 25 या कलमांचा आधार घेतला. या कलमांतर्गत केरळ सरकारने कामगारांच्या कामाच्या तासात काही बदल केले आहेत. (Kerala government reduced the working hours of labour allowed to rest upto three hours)
नेमके बदल काय ?
उन्हाळ्याची चाहूल लागल्यामुळे वातावरणातील उष्णता वाढत आहे. दरवर्षी कामादरम्यान उष्माघात झाल्यामुळे कित्येक कामगारांचा मृत्यू होतो. ही बाब गंभीर असल्याचे केरळ सरकारच्या लक्षात आले. त्यामुळे केरळ सरकारने कामगारांच्या कामाच्या तासांमध्ये काही बदल केले. या नव्या बदलानुसार कामाची वेळ ही सकाळी 7 ते संध्याकाळचे 7 अशी असेल. या कालावधीत कामगांराना फक्त आठ तास काम करावे लागेल. त्यानंतर कामगारांना आराम करण्यास मुभा असेल. दुपारी 12 ते 3 या काळात कामगारांना आराम करण्याची मुभा देण्यात आली आहे. दुपारचा 12 ते 3 या वेळेत कामगारांना आराम करता येईल, असे या नव्या नियमात म्हणण्यात आले आहे.
नियमाची अंमलबजावणी कधीपासून?
सरकारने हा नवा नियम जारी केल्यानंतर लगेच या नियमाची अंमलबजावणी होईल असे जाहीर केलं आहे. 17 फेब्रुवारीपासून या नव्या नियमाचे पालन करणे वेगवेगळ्या संस्थांना बंधनकारक आहे. हा नियम 30 एप्रिलपर्यंत लागू राहील.
दरम्यान, केरळमध्ये सामान्य तापमान 33 डिग्री सेल्शियस असतं. त्यामुळे येथील मजुरांना उन्हात काम करणे जिकरीचे होऊन जाते. याच कारणामुळे सरकारने हा नियम लागू केल्याचे म्हटले जात आहे. या नियमाची अंमलबजावणी होतेय की नाही, हे पाहण्यासाठी विषेश पथकं तयार केली जाणार आहेत. या पथकाकडून रस्ते आणि बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांवर लक्ष ठेवतील.
इतर बातम्या :
फाशीची शिक्षा होणारी भारतातील पहिली महिला; कोण आहे शबनम, तिचा गुन्हा काय?
Video: उत्तराखंडच्या चामोलीच्या दुर्घटनेनंतर नेमकं काय घडलं? बघा निसर्गाची ही करणी
(Kerala government reduced the working hours of labour allowed to rest upto three hours)