आरएसएसच्या दहशतीने देशातील वातावरण बिघडलं; या एका घटनेमुळे संघ आरोपीच्या पिंजऱ्यात; या मंत्र्यांनी साधला निशाणा…
भारतातील अंधश्रद्धेविषयी बोलताना त्या म्हणाल्या की, आपल्या देशात अशा अंधश्रद्धेची मूळं खोलवर रुजली आहेत.
केरळः जागतिकीकरणामुळे (Globalization) समाजात वाढलेली निराशा आणि काही प्रतिगामी शक्तींमुळे राज्यात अंधश्रद्धेचे प्रमाण वाढले आहे. या दोन्ही गोष्टींमुळेच राज्यातील नरबळी झाल्याचे मत केरळचे सामाजिक न्याय मंत्री डॉ. आर बिंदू (Dr. R. Bindu) यांनी मानले. संपूर्ण भारतात अशा घटना घडत असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला आहे. या दक्षिणेकडील राज्यात मात्र अशा घडलेल्या घटना लवकर उघडकीस आल्याचेही त्यांनी सांगितले. येथील लोक सावध राहत असल्याने असे प्रकार उघडकीस आल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
अंधश्रद्धा, नरबळी या प्रकरणावरुनच त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही निशाणा साधला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
केरळचे मंत्री बिंदू यांनी सांगितले की, हे फक्त केरळमध्येच घडते असे नाही तर देशभर अशा घटनांना ऊत आला आहे. केरळमधील लोक अधिक सावद असल्यामुळेच असे अंधश्रद्धेचे प्रकार उघडकीस येत आहेत असंह त्यांनी सांगितले.
देशातील इतर राज्यांमध्ये अंधश्रद्धेचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे नरबळीसारखे प्रकार इतर राज्यातही घडत असतात मात्र त्या घटना लवकर उघडकीस येत नाहीत असंही त्यांनी स्पष्ट सांगितले.
भारतातील अंधश्रद्धेविषयी बोलताना त्या म्हणाल्या की, आपल्या देशात अशा अंधश्रद्धेची मूळं खोलवर रुजली आहेत.
आणि ती दिवसेंदिवस वाढतच जात आहेत. त्यामुळे नरबळी हा प्रकार फक्त केरळपुरता मर्यादित नाहीत तर भारतातील अनेक ठिकाणी अंधश्रद्धेमुळे हिंसाचार आणि क्रूरतेच्या घटना वाढत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. आर बिंदू यांनी अंधश्रद्धा, नरबळी आणि इतर धार्मिक गोष्टीवर बोलत असताना, तुम्ही राष्ट्रीय स्वयं सेवक संघावर बोलत आहात का असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
त्यावेळी त्या म्हणाल्या की, हो मी संघाविषयीच बोलत असून त्यांच्या मुळे सामान्य माणसांमधून आता दहशत पसरली आहे. जागतिकीकरणामुळे आलेली निराशा हेही त्याचे एक मुख्य कारण असल्याचेही त्यांनी सांगितले.
जागतिकीकरणामुळे लोकांना प्रचंड पैसा पाहिजे आहे. त्यासाठी त्यांना झटपट पैसेही कमवायचे आहेत. त्यामुळे अशा अंधश्रद्धेच्या घटनांमध्ये लोकं अडकली जात असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.