Nipah virus | देशात पुन्हा व्हायरसची दहशत, एक रुग्ण 950 लोकांच्या संपर्कात, ‘या’ ठिकाणी बंद

| Updated on: Sep 15, 2023 | 12:45 PM

Nipah virus | व्हायरसमुळे आतापर्यंत किती रुग्णांचा मृत्यू?. देशातील एका राज्यात निपाह व्हायरसने दहशत निर्माण केली आहे. या व्हायरसमुळे संक्रमित रुग्णांची संख्या किती आहे? ते जाणून घ्या.

Nipah virus | देशात पुन्हा व्हायरसची दहशत, एक रुग्ण 950 लोकांच्या संपर्कात, या ठिकाणी बंद
Nipah Virus
Follow us on

कोझिकोडे : केरळमध्ये निपाह व्हायरसची लागण झालेल्या आणखी एका रुग्णाची ओळख पटली आहे. केरळमध्ये निपाहने संक्रमित असलेल्या रुग्णांची संख्या 6 झाली आहे. राज्य सरकारसाठी दिलासा देणारी सुद्धा एक बाब आहे. तपासणीसाठी जे 11 सॅम्पल पाठवले होते, ते निगेटिव्ह आले आहेत. निपाह व्हायरसमुळे आतापर्यंत दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. संक्रमण वाढू नये. म्हणून सरकारने अनेक पावलं उचलली आहेत. राज्यातील कोझिकोड जिल्हा निपाह व्हायरसच्या प्रकोपाने प्रभावित आहे. 30 ऑगस्टला एका 47 वर्षीय रुग्णाचा निपाह व्हायरसमुळे मृत्यू झाला. त्यानंतर केंद्र सरकारही अलर्ट मोडवर आहे. निपाह व्हायरसचा सामना करण्यासाठी नॅशनल सेंटर फॉर डिजीज कंट्रोल, आरएमएल रुग्णालय आणि नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्सेजने टीम बनवली आहे.

ही टीम केरळ सरकारला व्हायरस नियंत्रणात आणण्यासाठी मदत करेल. इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने बायोसेफ्टी लेवल-3 कंटोनमेंट मोबाइल लेबोरेट्री तयार केली आहे. जिल्हा स्तरावर व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ही टीम मदत करेल. वेळीच व्हायरसला नियंत्रणात आणण्यासाठी ही पावलं उचलण्यात आली आहेत. 2018 नंतर चौथ्यांदा निपाह व्हायरसचा प्रकोप वाढलाय. राज्यातील शाळा आणि कार्यालय बंद करण्याचा आदेश देण्यात आला आहे. कोझिकोडमध्ये प्रभावित ग्राम पंचायतींना क्वारंटीन झोन म्हणून घोषित करण्यात आलय. निपाह व्हायरसने प्रभावित 47 वर्षीय रुग्णाची ओळख पटवण्यात आली. त्याच्या संपर्कात आलेल्या 15 रुग्णांचे सॅम्पल तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

शाळा-कॉलेजेस बंद

ग्रामपंचायतीमध्ये आतापर्यंत संक्रमित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 950 लोकांची ओळख पटवण्यात आली आहे. यात 213 रुग्ण हाय-रिस्क कॅटेगरीतील आहेत. 287 स्वास्थ सेवा देणारे कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये आहेत. चार हाय-रिस्क लोकांना खासगी रुग्णालयात ठेवण्यात आलं आहे. केरळमधील निपाह व्हायरचा प्रकोप लक्षात घेऊन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने हाय-लेव्हल मीटिंग घेतली आहे. यात कोझिकोड जिल्हा प्रशासनाचे अधिकारी होते. धोका लक्षात घेऊन, राज्य सरकारने जिल्ह्यातील शाळा-कॉलेजेस बंद केले आहेत. आधी 14-15 सप्टेंबरला शाळा बंद ठेवण्याचा आदेश होता. आता 16 सप्टेंबरपर्यंत शाळा बंद राहतील.