Oxygen surplus : केरळने असं काय केलं, ज्यामुळे तिथे ऑक्सिजनचा अजिबात तुटवडा नाही?

Kerala Oxygen surplus : केरळ (Kerala Oxygen plant) असं एक राज्य आहे, जिथे ऑक्सिजन मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. केवळ ऑक्सिजन उपलब्ध आहे असं नाही तर केरळ परराज्यांना ऑक्सिजन निर्यातही करत आहे.

Oxygen surplus  : केरळने असं काय केलं, ज्यामुळे तिथे ऑक्सिजनचा अजिबात तुटवडा नाही?
oxygen-shortage
Follow us
| Updated on: Apr 27, 2021 | 5:06 PM

तिरुअनंतपूरम : देशाची राजधानी दिल्लीपासून भारतात सर्वत्र ऑक्सिजनचा  (Oxygen Shortage ) तुटवडा आहे. आता तर परदेशातून ऑक्सिजन आणावा लागत आहे. प्रत्येक राज्यात ऑक्सिजनअभावी रुग्णांचा दम घुटमळत असताना, केरळ (Kerala Oxygen plant) असं एक राज्य आहे, जिथे ऑक्सिजन मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. केवळ ऑक्सिजन उपलब्ध आहे असं नाही तर केरळ परराज्यांना ऑक्सिजन निर्यातही करत आहे. (Kerala oxygen plant surplus production during covid19 corona crisis)

सद्धस्थितीला जर केरळमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा जाणवलाच, तर केरळला दुसऱ्या कुणावरही अवलंबून राहण्याची (Oxygen surplus) गरज नाही. स्वत:चं उत्पनादन स्वत: करुन आपल्या नागरिकांचे जीव वाचवण्याची क्षमता केरळमध्ये आहे.

अन्य राज्यांना ऑक्सिजनचा पुरवठा

ताज्या आकड्यांनुसार, केरळ सध्या नियमितपणे दररोज 70 मेट्रिक टन ऑक्सिजन तामिळनाडूला आणि 16 मेट्रिक टन ऑक्सिजन कर्नाटकला निर्यात करत आहे. त्यावरुन केरळच्या ऑक्सिजन निर्मितीची क्षमता लक्षात येऊ शकते.

मेडिकल ऑक्सिजन मॉनिटरिंगचे नोडल ऑफिसर आर वेणुगोपाल यांनी बीबीसीला केरळमधील ऑक्सिजनबाबत अधिक माहिती दिली. ते म्हणतात, ” कोव्हिड संकटात आम्हाला दररोज 35 मेट्रिक टन ऑक्सिजनची तर नॉन कोव्हिड केयरसाठी दररोज 45 मेट्रिक टन ऑक्सिजनची आवश्यकता असते. आमची क्षमता 199 मेट्रिक टन प्रति दिवस इतकी आहे. जर आवश्यकता भासली तर आम्ही उत्पादन क्षमता वाढवू शकतो”

रुग्णांना ऑक्सिजन

केरळमध्ये ऑक्सिजनची कमी न होण्याचं एक मोठं कारण म्हणजे, इथे कोरोना रुग्णांची संख्या तर आहे, मात्र ज्या रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता आहे, त्यांची संख्या कमी आहे.

केरळ टास्क फोर्स

केरळ कोव्हिड टास्क फोर्सचे सदस्य डॉ मोहम्मद अशील म्हणाले, ” आम्ही कोरोना रुग्ण पहिल्या टप्प्यातच ओळखण्यात यशस्वी ठरत आहोत. त्यामुळे त्यांच्यावर तातडीने उपचार सुरु करणे शक्य होतं. त्यामुळे आमच्या इथे प्रत्येक रुग्णांला ऑक्सिजन लावण्याची गरज नाही”

आशा स्वयंसेविका आणि पंचायतींमध्ये निवडून आलेले सदस्य हे केरळमधील सार्वजनिक आरोग्य प्रणालीचा कणा आहेत.

आम्ही वॉर्ड समित्या पुनर्जिवीत केल्या. वॉर्डातील कोणत्याही नागरिकाला जर ताप आला किंवा काहीही लक्षणं असली की सर्वात आधी त्याची चाचणी केली जाते. ताप कोणत्याही कारणाने आला असला तरी सर्वात आधी कोव्हिड चाचणी केली जाते. त्यानुसार त्यांच्यावर उपचार केले जातात, असं डॉ. अशील सांगतात.

ऑक्सिजनची मागणी वाढली

केरळमध्ये ऑक्सिजन मुबलक आहे, मात्र मेडिकल ऑक्सिजनची मागणी गेल्या आठवड्यात वाढल्याचं डॉ. अशील सांगतात. इतरवेळी 73 मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी आता 84 मेट्रिक टनवर पोहोचली आहे.

जरी ही मागणी वाढली असली तरी काळजीचं कोणतंही कारण नाही. कारण ते म्हणतात, सध्याचे ऑक्सिजन प्लांट 100 टक्के क्षमतेने काम करत नाहीत. जर मागणी वाढली तर उत्पादन क्षमता 100 टक्क्यांनी वाढवू.

VIDEO : ऑक्सिजन नेमका तयार कसा होतो? 

संबंधित बातम्या 

Video: ज्या ऑक्सिजनसाठी सगळीकडे मारामारी चाललीय तो नेमका कसा तयार होतो?

(Kerala oxygen plant surplus production during covid19 corona crisis)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.