केरळात 40 प्रवाशांना घेऊन जाणारी बोट बुडाली; 15 जणांचा बुडून मृत्यू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता…

अपघात झाला तेव्हा बोट किनाऱ्यापासून सुमारे 300 मीटर दूर होती. मिळालेल्या माहितीनुसार, बोटीत बसलेले लोक मलप्पुरमच्या परप्पनगडी आणि तनूर भागातून आले होते.

केरळात 40 प्रवाशांना घेऊन जाणारी बोट बुडाली; 15 जणांचा बुडून मृत्यू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता...
Follow us
| Updated on: May 08, 2023 | 12:44 AM

मलप्पुरम : केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यात प्रवाशांनी घेऊन जाणारी बोट नदीत उलटल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या बोटीत सुमारे 40 लोक प्रवास करत असल्याचे सांगण्यात येत आहे. दुर्घटना घडल्यानंतर समजलेल्या प्राथमिक माहितीनुसार या दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू झाल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले आहे. तर अनेक लोकं अजूनही नदीत बेपत्ता असल्याचेही सांगण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच बचाव आणि मदत पथकं घटनास्थळी दाखल झाली आहेत. नदीत बेपत्ता झालेल्यांचा शोध घेण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

पुरपुझा नदीवरील थुवल थेराम पर्यटनस्थळावर सायंकाळी सातच्या सुमारास पर्यटकांनी भरलेली बोट उलटली. पर्यटकांसोबत अनेक मुले या बोटीत चढल्यामुळे ही बोट बुडल्याचे सांगण्यात येत आहे.

घटनास्थळी बचाव पथकाशिवाय अनेक मच्छिमार आणि स्थानिक लोकही बचाव कार्यामध्ये सहभागी झाले आहेत. नदीतून 10 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून जखमी लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

केरळचे मंत्री व्ही. अब्दुररहिमन यांनी 15 जणांचा बुडून मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. 15 जणांमध्ये 4 मुलांचाही समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे.

स्थानिकांनी दिलेल्या महितीनुसार, बोटीमध्ये प्रमाणाच्या बाहेर लोकं भरलेली होती, त्यामले बोट लोकांसह बुडाल्याचे सांगण्यात आले आहे.

ही घटना घडल्यानंतर बोटीतील नागरिकांना वाचवण्यासाठी कोणतीच यंत्रणा नसल्याने अनेकांचा जीव गेल्याचेही सांगण्यात येत आहे.

अपघात झाला तेव्हा बोट किनाऱ्यापासून सुमारे 300 मीटर दूर होती. मिळालेल्या माहितीनुसार, बोटीत बसलेले लोक मलप्पुरमच्या परप्पनगडी आणि तनूर भागातून आले होते. येथे प्रवासी बोटींना संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच चालवण्याची परवानगी देण्यात आली होती.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.