इंदिरा गांधी ‘मदर ऑफ इंडिया’; भाजपच्या केंद्रीय मंत्र्याचं मोठं विधान
अभिनय क्षेत्रातून राजकीय क्षेत्रात प्रवेश करणारे सुरेश गोपी यांनी कॉंग्रेस नेत्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांची स्तूती केल्याने आर्श्चय व्यक्त केले जात आहे. प्रसारमाध्यमाशी बोलताना सुरेश गोपी यांनी काँग्रेस दिवंगत नेते आणि माजी मुख्यमंत्री के. करुणाकरन यांची देखील स्तूती करीत त्यांना कॉंग्रेसचे राज्यातील पितामह म्हटले आहे.
केरळात यंदा भाजपाचे खाते उघडून देणारे भाजपाचे नवनिर्वाचित खासदार आणि मंत्री सुरेश गोपी यांनी अलिकडेच मुरली मंदिराचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी कॉंग्रेसच्या दिवंगत नेत्या इंदिरा गांधी यांना मदर ऑफ इंडिया म्हटले आहे. सुरेश गोपी यांनी करुणाकरन आपल्या दृष्टीने केरळ राज्यात कॉंग्रेस पार्टीचे पितामहच होते असेही सुरेश गोपी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना कबूल केले. लोकसभा निवडणूकांत सुरेश गोपी यांनी करुणाकरण यांच्या पूत्राला हरवून त्रिशूर लोकसभेत तिरंगी निवडणूकीत मोठा विजय मिळवित भाजपाला डाव्यांच्या बालेकिल्ल्यात प्रवेश मिळवून दिला आहे.
केरळातील भाजपाचे एकमेव खासदार सुरेश गोपी पुनकुन्नाम स्थित के. करुणाकरण यांचे स्मारक असलेल्या मुरली मंदिर दौऱ्यावर आले होते. तेथे त्यांनी मिडीयाशी गप्पा मारल्या. त्यावेळी त्यांनी करुणाकरण आणि मार्क्सवादी नेते ई. के. नयनार यांना आपले राजकीय गुरु असल्याचे सांगितले. त्यांनी आपल्या या दौऱ्याला राजकारणाशी जोडू नका अशी विनंती केली. आपण आपल्या राजकीय गुरुंना श्रद्धांजली वाहण्यासाठी आलो आहोत असेही ते म्हणाले.
इंदिरा गांधी ‘मदर ऑफ इंडिया’
केरळच्या त्रिशूर येथून भाजपाच्या तिकीटावर निवडून आलेल्या खासदार सुरेश गोपी यांनी नयनार आणि त्यांची पत्नी शारदा टीचर सारखे त्यांचे करुणाकरन आणि त्यांची पत्नी कल्याणी कुट्टी अम्मा यांच्याशी देखील घनिष्ठ संबंध होते. अलिकडेच तर कन्नूर स्थित नयनार यांच्या घरी देखील गेले होते. सुरेश गोपी म्हणाले की आपण इंदिरा गांधी यांना मदर ऑफ इंडिया मानतो. तर करुणाकरन राज्य कॉंग्रेसचे पितामह होते. करुणाकरन यांना केरळच्या कॉंग्रेसचे पितामह मानने म्हणजे दक्षिण राज्यातील सर्वात जुन्या पार्टीचे संस्थापक किंवा सहसंस्थापक यांना अनादर करणे नव्हे असेही त्यांनी स्पष्ट केले.
करुणाकरन यांच्या मुलाचा पराभव केला
सुरेश गोपी यांनी के. करुणाकरण यांच्या प्रशासकीय गुणांची स्तूती केली. यावेळी लोकसभेत केरळच्या त्रिशूर लोकसभा मतदार संघातून जिंकून सुरेश गोपी यांनी करुणाकरण यांचे पूत्र कॉंग्रेस नेते मुरलीधरन यांना हरवले आहे. मुरलीधरन या निवडणूकीत तिसऱ्या स्थानावर फेकले गेले. सुरेश गोपी याने मुरली मंदिर दौऱ्यासंदर्भात बोलताना सांगितले की मी 2019 मध्येच मुरली मंदिर जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतू करुणाकरण यांची कन्या पद्मजा वेणुगोपाल हीने राजकीय कारणांनी त्यांना तेथे जाण्यासाठी विरोध केला होता. मुरली मंदिर शिवाय त्यांनी शहरातील प्रसिद्ध लॉर्डे माता चर्चमध्ये जाऊन प्रार्थना देखील केली. सुरेश गोपी यांनी त्रिशूर लोकसभा जिंकून केरळात भाजपाचे खाते उघडले आहे. या लोकसभा जागेवर तिरंगी लढत झाली होती. ज्यात कॉंग्रेस, भाजपा आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टी यांच्या उमेदवारांमुळे अत्यंत चुरशीची निवडणूक झाली होती. त्यात ते विजयी झाली.