मी करणार ते राव करणार नाही; अध्यक्ष पदावरुन खर्गेंना छेडले…
मल्लिकार्जुन खर्गे यांच्याविषयी शशी थरुर म्हणाले की, खर्गे यांच्यासारखे नेते काँग्रेसमध्ये बदल घडवून आणू शकत नाहीत.
नवी दिल्लीः या वर्षी बहुचर्चित ठरलेल्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत (Congress President Election 2022) याच पक्षाचे खासदार शशी थरूर (Shashi Tharoor) आणि ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांच्यात थेट लढत होत आहे. 8 ऑक्टोबर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख असल्याने त्यानंतरच पक्षाचे चित्र स्पष्ट होईल असं सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे शशी थरूर यांनी या निवडणुकीतून माघार घेणार नसल्याचेच जाहीर केले आहे. यावेळी त्यांनी हेही सांगितले की, आपल्याला पाठिंबा देणाऱ्यांना आपण फसवणार नाही हेही त्यांनी स्पष्ट केले.
याचवेळी मल्लिकार्जुन खर्गे यांच्याविषयी बोलताना ते म्हणाले की, खर्गे यांच्यासारखे नेते काँग्रेसमध्ये बदल घडवून आणू शकत नाहीत असं म्हणून त्यांनी त्यांना छेडलेही आहे.
नागपुरातील एका कार्यक्रम प्रसंगी ते बोलत शशी थरूर यांनी काँग्रेस अध्यक्ष पदाविषया आपले मत मानले. यावेळी त्यांनी हेही सांगितले की,आम्ही एकमेकांचे शत्रू नाही नाही त्यामुळे हे युद्ध आहे असंही नाही. ही आमच्या पक्षाची आणि पक्षाच्या भविष्यासाठी निवडणूक असल्याचेही त्यांनी सांगितले.
मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसच्या पहिल्या तीन नेत्यांमधील महत्वाचे नेते हे मान्य आहेत. मात्र असे नेते पक्षात बदल घडवून आणू शकत नाहीत. ते पारंपरिक पद्धतीनेच चालूच ठेवतील. त्यामुळे मी कार्यकर्त्यांच्या अपेक्षेनुसार बदल घडवून आणणार असल्याचे त्यांनी सांगितले. .
नागपुरात पत्रकारांशी बोलताना तिरुअनंतपुरमचे खासदार शशी थरुर यांनी सांगितले की, ‘मोठे’ नेते स्वाभाविकपणे इतर ‘मोठ्या’ नेत्यांच्या पाठीशी उभे असतात, परंतु त्यांना राज्यांतील पक्ष कार्यकर्त्यांचा पाठिंबा असतो. आम्ही मोठ्या नेत्यांना मान देतो, पण पक्षातील तरुणांचे ऐकण्याची वेळ आली आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितले.
पक्षाच्या संघटनात्मक रचनेत बदल करण्याचे काम आम्ही करणार असून कार्यकर्त्यांनाही महत्त्वाचे स्थान दिले जाणार आहे. शनिवारी, पक्षाध्यक्ष निवडीनंतर गांधी कुटुंबाच्या भूमिकेबद्दल विचारले असता, शशी थरूर म्हणाले होते, “गांधी कुटुंबाचा आणि काँग्रेसचा डीएनए एकच आहे.
त्यांना ‘गुडबाय’ म्हणायचे कोणी धाडस करणार नाही. गांधी कुटुंब हे अध्यक्ष पदापेक्षाही आमच्यासाठी ते खूप मोठी संपत्ती असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.