बेपत्ता कोब्रा जवान ताब्यात असल्याचा दावा, सुटेकसाठी नक्षलवाद्यांकडून ‘ही’ अट

बेपत्ता जवान आपल्या ताब्यात असल्याचा दावा नक्षलवाद्यांनी केलाय. तसेच त्याच्या सुरक्षित सुटकेसाठी त्यांनी एक अट ठेवली आहे.

बेपत्ता कोब्रा जवान ताब्यात असल्याचा दावा, सुटेकसाठी नक्षलवाद्यांकडून 'ही' अट
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Apr 05, 2021 | 6:00 PM

रायपूर : देशाला हदरवणाऱ्या छत्तीसगडमधील नक्षलवादी हल्ल्यात सीआरपीएफच्या कोब्रा बटालीयनमधील एक जवान बेपत्ता झाल्याचं समोर आलं. त्यानंतर आता हा जवान आपल्या ताब्यात असल्याचा दावा नक्षलवाद्यांनी केलाय. तसेच त्याच्या सुरक्षित सुटकेसाठी त्यांनी एक अट ठेवली आहे. नक्षलवाद्यांनी स्थानिक पत्रकारांशी संपर्क साधत आपल्या अटी सांगितल्या आहेत. यावेळी त्यांनी अटी मान्य झाल्यास जवानाला कोणतीही दुखापत करणार नाही, असंही नक्षलवाद्यांनी सांगितल्याचं बोललं जातंय (Kidnapping of CRPF Cobra soldier by Naxalite in Chhattisgarh for one demand).

सीआरपीएफने दिलेल्या माहितीनुसार कोब्रा बटालीयनचा एक जवान नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीनंतर गायब आहे. राजेश्वर सिंह मनहास असं या बेपत्ता जवानाचं नाव आहे. राजेश्वर हे मुळचे जम्मू काश्मीरचे रहिवासी आहेत.

बेपत्ता जवानाच्या सुटकेसाठी नक्षलवाद्यांची अट काय?

छत्तीसगडमधील नक्षलवाद्यांनी स्थानिक पत्रकारांना फोन करुन बेपत्ता जवान आपल्या ताब्यात असल्याचं सांगितलंय. तसेच त्याची सुटका व्हावी यासाठी एक अट समोर ठेवलीय. या अटीनुसार जवानाने सुटकेनंतर सुरक्षा दलात काम करु नये. ही नोकरी सोडून इतर कोणतंही काम करावं, अशी भूमिका नक्षलवाद्यांनी घेतलीय. नक्षलवाद्यांच्या या भूमिकेमागील कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे.

“नक्षलवाद्यांची मागणी पूर्ण करा, पण माझ्या पतीची सुटका करा”

दुसरीकडे जवान राजेश्वर सिंह यांच्या पत्नीने छत्तीसगड सरकारकडे आपल्या पतीची सुटका करण्याची विनंती केलीय. नक्षलवाद्यांची मागणी मान्य करा आणि पतीची सुटका करा, अशी भावना या जवानाच्या पत्नी मिनू मनहस यांनी व्यक्त केलीय.

जवानाचे वडील सीआरपीएफमध्ये असताना शहीद

जवान राजेश्वर सिंह यांचे वडील देखील सीआरपीएफमध्ये होते. ते देशासाठी लढताना एका मोहिमे दरम्यानच शहीद झाले होते. राजेश्वर यांच्या कुटुंबात त्यांच्याशिवाय आई, पत्नी आणि एक लहान मुलगी आहे.

हेही वाचा :

Chhattisgarh Naxal Attack : नक्षलवादी हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, ‘बलिदान व्यर्थ जाणार नाही’ शाहांचा गर्भित इशारा

Chhattisgarh Naxal attack : एकाच हातावर दोन गोळ्या लागल्या, तरीही वीर जवान भिडला, कमांडरची डॅशिंग कहाणी

नक्षलवाद्यांविरोधात आता ‘ऑपरेशन प्रहार-3’; ‘हे’ 8 नक्षली कमांडर सुरक्षा दलाच्या रडारवर

व्हिडीओ पाहा :

Kidnapping of CRPF Cobra soldier by Naxalite in Chhattisgarh for one demand

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.