शेतकऱ्यांच्या रेल्वेत पाण्याचा थेंब नाही, अधिकारी म्हणतो, रेल्वेसमोर आडवे पडा, पाणी देतो!
प्रशांत लीला रामदास, टीव्ही 9 मराठी, नवी दिल्ली: देशभरातील शेतकरी आज आणि उद्या दिल्लीत एल्गार करणार आहेत. किसान मुक्ती मोर्चाच्या नेतृत्त्वात देशभरातील शेतकरी तसेच 200 पेक्षा अधिक संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. महाराष्ट्रातील शेतकरीही दिल्लीत पोहोचले आहेत. मात्र रेल्वेने दिल्लीकडे गेलेल्या शेतकऱ्यांना रेल्वेच्या भोंगळ कारभाराचा फटका बसला. संपूर्ण रेल्वेच्या निम्म्याहून अधिक बोगीमध्ये थेंबभरदेखील पाणी उपलब्ध नव्हतं. […]
प्रशांत लीला रामदास, टीव्ही 9 मराठी, नवी दिल्ली: देशभरातील शेतकरी आज आणि उद्या दिल्लीत एल्गार करणार आहेत. किसान मुक्ती मोर्चाच्या नेतृत्त्वात देशभरातील शेतकरी तसेच 200 पेक्षा अधिक संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. महाराष्ट्रातील शेतकरीही दिल्लीत पोहोचले आहेत. मात्र रेल्वेने दिल्लीकडे गेलेल्या शेतकऱ्यांना रेल्वेच्या भोंगळ कारभाराचा फटका बसला.
संपूर्ण रेल्वेच्या निम्म्याहून अधिक बोगीमध्ये थेंबभरदेखील पाणी उपलब्ध नव्हतं. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रीचं जेवणही करता आलं नाही. पुणे स्थानकावर पाणी भरणे अपेक्षित असताना, डब्याला नळपाईप जोडलेली असूनही, रेल्वेने तसंच पाणी न भरता प्रस्थान केले.
गाडीत शंभरहून अधिक महिला असून एकही सुरक्षा रक्षक, रेल्वे कर्मचारी गाडीत उपलब्ध नव्हता. याबाबत रेल्वेकडे तक्रार केली असता, तुमच्या लोकांना गाडीसमोर आडवे पडायला सांगा, म्हणजे पाणी भरले जाईल, असं धक्कादायक उत्तर रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलं.
यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पहाटेपर्यँत गाडीत पाणी उपलब्ध न झाल्यास आहे त्या ठिकाणी रेल्वे उभी केली जाईल, याची सगळी जबाबदारी रेल्वे प्रशासनाकडे राहील असा इशारा दिला. शेतकरी काही फुकट जात नसून, तबबल 48 लाख रुपये भाडे रेल्वेला दिले आहेत. तरीही रेल्वे साधी सुविधाही देत नाही. रेल्वे मुद्दाम त्रास देण्यासाठी तर असं करत नाही ना असा संशय शेतकरी व्यक्त करत असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते अँड योगेश पांडे यांनी सांगितले.
शेतकऱ्यांची दिल्लीत धडक
देशभरातील शेतकरी आज पुन्हा एकदा राजधानी दिल्लीत धडकले आहेत. कृषीक्षेत्रावर ओढवलेले आर्थिक संकट आणि शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी संसदेचे 21 दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवण्यात यावे, अशी मागणी करत अखिल भारतीय शेतकरी संघर्ष समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली, महाराष्ट्रासह देशभरातील लाखो शेतकरी राजधानी दिल्लीत पोहोचले आहेत. तब्बल 200 शेतकरी संघटना एकत्र येत, संपूर्ण देशातून पदयात्रा करुन मोठ्या संख्येने शेतकरी दिल्लीत आले आहेत. सध्या हे शेतकरी दिल्ली हरियाणा बॉर्डरवर बिजवासन परिसरात थांबले आहेत. येथून 25 किलोमीटरची पदयात्रा करत रामलीला मैदानात पोहोचणार आहेत. ‘किसान मुक्ती मोर्चा’ असे मोर्चाचे नाव असून यासाठी देशभरातील 200 शेतकरी संघटनांचे शेतकरी आज आणि उद्या दिल्लीत दाखल होणार आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात आंदोलनकर्ते जमा होणार असल्याने, दिल्ली पोलिसांनी मार्गदर्शिका जारी केली आहे. याअंतर्गत जंतर-मंतरवर एक हजारहून अधिक लोक एकत्रित येणे प्रतिबंधित आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची संख्या वाढली तर त्यांना जंतर मंतरवरुन रामलीला मैदानात जाऊन धरणे आंदोलन करावे लागेल. या आंदोलनासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह 20 पेक्षा अधिक राजकीय पक्षांच्या नेत्यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. तर भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनाही निमंत्रण पाठवलं आहे.
संबंधित बातमी