ठरलेल्या मार्गावरुन भ्रम, हिंसा घडवणं पूर्वनियोजित कट, शेतकऱ्यांचा सरकारवर गंभीर आरोप

नवी दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीवर पोलिसांनी लाठीमार केल्यानंतर दिल्लीत तणाव निर्माण झाला आहे.

ठरलेल्या मार्गावरुन भ्रम, हिंसा घडवणं पूर्वनियोजित कट, शेतकऱ्यांचा सरकारवर गंभीर आरोप
Follow us
| Updated on: Jan 26, 2021 | 3:26 PM

नवी दिल्ली : नवी दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीवर पोलिसांनी लाठीमार केल्यानंतर दिल्लीत तणाव निर्माण झाला आहे. आयटीओ येथे शेतकऱ्यांनी पोलिसांची व्हॅन, क्रेन ताब्यात घेतली आहे. त्यामुळे पोलीस या आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीमार करत आहे. शेतकरी आंदोलन अधिकच चिघळल्याने दिल्लीतील मेट्रो सेवा बंद करण्यात आली आहे. अनेक ठिकाणची वाहतूक बंद करण्यात आली आहे. शेतकरी लाल किल्ल्यात घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त वाढवल्याने संपूर्ण दिल्लीला छावणीचं स्वरुप आलं आहे. (Kisan Union leader says some confusion over route, its pre planned strategy of government to create violence)

पोलिसांनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅली काढण्यासाठी दुपारी 12 वाजेची वेळ दिली होती. पण संयुक्त शेतकरी मोर्चाच्या नेत्यांचं न ऐकता शेतकऱ्यांनी ही रॅली काढली. तसेच शेतकऱ्यांना रॅलीसाठी जो मार्ग आखून दिला होता. त्या मार्गावरून शेतकऱ्यांनी रॅली काढली नाही. शेतकऱ्यांनी वेगळ्याच मार्गाने रॅली काढली होती. सिंधु बॉर्डरवरून ही रॅली निघणार होती. मात्र, या मार्गाने न जाता शेतकरी आयटीओपर्यंत पोहोचले. त्यामुळे पोलिसांनी शेतकऱ्यांना अडवल्याने पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये धुमश्चक्री उडाली. त्यातच दगडफेक सुरू झाल्याने पोलिसांना लाठीमार करावा लागला. याचवेळी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून जमावाला पांगवण्यास सुरुवात केली.

आंदोलनाच्या ठिकाणी असलेले शेतकरी आणि पोलीस संभ्रमात आहेत, कारण नेमके हल्लेखोर कोण आहेत? याबाबत कोणालाही काहीही माहिती नाही. शितकरी युनियन शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करत होती. आमचं आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरु होतं, असं शेतकरी युनियनच्या नेत्यंकडून सातत्याने सांगितलं जात आहे. दरम्यान आयटीओ येथील एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतंय की एक ट्रॅक्टरचालक ट्रॅक्टर थेट पोलिसांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न करतोय. या व्हिडीओमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

दरम्यान, भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत म्हणाले की, “आमचं आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरु आहे. आंदोलनाच्या ठिकाणी कोणताही गोंधळ झालेला नाही. आम्ही सध्या गाजीपूर येथे आहोत आणि येथील वाहतूक व्यवस्था सुरळीतपणे सुरु आहे.” सर्वांना प्रश्न पडला आहे की, शेतकरी राजधानीत पोहोचले कसे? कारण शेतकरी युनियनच्या नेत्यांनी शहरात प्रवेश न करण्याचे आश्वासन यापूर्वीच दिलं आहे. किसान एकता मार्चने ट्विट करुन हिंसा निर्माण करणं हा सरकारचा पूर्वनियोजित कट असल्याचा दावा केला आहे. शेतकरी नेत्यांनी दावा केला आहे की, “मोर्चाचा जो रुट (मार्ग) होता, त्याबाबतची माहिती सर्वांपर्यंत पोहचली नसावी, काही शेतकऱ्यांमध्ये मोर्चाच्या मार्गाबाबत थोडा गोंधळ निर्माण झाला होता. परंतु त्या ठिकाणी झालेल्या हिंसेमागं सरकारचं मोठं राजकारण आहे.

संबंधित बातम्या

पोलिसांची व्हॅन, क्रेनवर आंदोलकांचा ताबा, मेट्रो बंद, शेतकरी आंदोलनाने तणाव; दिल्लीला छावणीचं स्वरुप

Kisan Tractor Rally: दिल्लीत ट्रॅक्टर रॅली दरम्यान पोलीस-शेतकरी भिडले, दगडफेकीनंतर पोलिसांचा लाठीचार्ज

(Kisan Union leader says some confusion over route, its pre planned strategy of government to create violence)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.