मु्ंबई – दिल्ली एक्सप्रेस वे बद्दल दहा खास गोष्टी जाणून घ्या, 12 तासांत दिल्ली गाठवणारा हा मार्ग आहे कसा
दिल्ली - मुंबई द्रुतगती मार्गाच्या सोहना-दौसा पट्ट्याचे 12 फेब्रुवारी 2023 रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन होत आहे. काय आहेत या महामार्गाची वैशिष्टये पाहुयात..
नवी दिल्ली : मुंबई ते दिल्ली हा ( Delhi-Mumbai expressway ) महत्वाकांक्षी एक्सप्रेस वे वेगाने तयार होत आहे. तब्बल 1386 किमी लांबीच्या आणि मुंबई ते दिल्ली हे अंतर 12 तासांत कापणाऱ्या या महामार्गाच्या सोहना ते दौसा टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी 12 फेब्रुवारीला होत आहे. या मार्गाला तयार करण्यासाठी 12 लाख टन स्टील ( steel ) लागणार असून त्यातून 50 हावडा ब्रिज (Howrah Bridges ) तयार होतील असे म्हटले जात आहे. या महामार्गाचा सोहना ते दौसा हा टप्पा येत्या मंगळवार पासून प्रवाशांसाठी खुला होत आहे.
काय आहेत या महामार्गाची दहा वैशिष्ट्ये पाहूयात…
1 ) दिल्ली ते मुंबई एक्सप्रेस वे हा आठ पदरी एक्सेस कंट्रोल ग्रीन फिल्ड प्रोजेक्ट असून भविष्यात तो बारा पदरी करण्याची योजना आहे.
2) या महामार्गासाठी दिल्ली, हरीयाणा, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र अशा पाच राज्यात पंधरा हजार हेक्टर जमिन संपादन करावी लागणार आहे.
3) या महामार्गाच्या परिसरात 94 प्रवासी सुविधा तयार करण्यात येत आहेत. त्यामुळे वापरकर्त्यांना त्याचा लाभ होईल.
4) या महामार्गावर 40 हून अधिक इंटरचेंजेस असणार आहेत. त्यामुळे कोटा, इंदूर, जयपूर, भोपाळ, वडोदरा आणि सूरत येथील वाहन चालकांना कनेक्टीविटी मिळणार आहे.
5) सोहना ते दौसा हा टप्पा येत्या मंगळवार पासून प्रवाशांसाठी खुला होत आहे.
6) या प्रकल्पाचे सुरूवातीचे बजेट 2018 साली 98000 कोटी होते. त्यासाठी 12 लाख स्टीलचा वापर होणार आहे. त्यातून कोलकात्याच्या हावडा ब्रिज सारखे पन्नास ब्रिज उभारता येतील.
7) दिल्ली – मुंबई एक्सप्रेसमुळे दिल्ली ते मुंबईचे प्रवासाचे अंतर 180 किमीने कमी होणार आहे. ( 1,424 किमी वरून 1,242 किमीवर येणार )
8 ) दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गावर अत्याधुनिक स्वयंचलित वाहतूक व्यवस्थापन यंत्रणा असेल.
9 ) प्राण्यांना जाण्यासाठी ओव्हरपास, अंडरपास असणारा हा भारतातील आणि आशियातील पहिला एक्सप्रेसवे आहे. रणथंबोर वन्यजीव अभयारण्यात प्राण्यांच्या अधिवासाची खास काळजी घेत त्याचे बांधकाम होत आहे.
10 ) दिल्ली – मुंबई द्रुतगती मार्गाच्या सोहना-दौसा पट्ट्याचे 12 फेब्रुवारी 2023 रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन होत आहे. उद्घाटनानंतर तो प्रवाशांसाठी खुला केला जाईल. त्यामुळे दिल्ली ते जयपूर दरम्यानचा प्रवास कालावधी दोन तासांपर्यंत कमी करण्यात मदत होईल.