Remdesivir Price List: कोरोनावरील ‘रामबाण’ उपाय! बाजारात ‘या’ 7 कंपन्यांचं रेमडेसिविर उपलब्ध, किंमत किती?
तज्ज्ञांनी रेमडेसिवीर हे कोरोनावरील उपचारासाठी एकमेव प्रभावी औषध नसल्याचं सांगितलंय. तसेच सरकारने हे औषध उपलब्ध करुन देणाऱ्या 7 कंपन्यांच्या औषधांचे तपशील किमतीसह जाहीर केले आहेत.
नवी दिल्ली : भारतात (India) कोरोना विषाणूच्या (Corona Virus) दुसऱ्या लाटेनं अक्राळविक्राळ रुप धारण केलंय. देशात दररोज 2 लाखांपेक्षा अधिक नवे रुग्ण सापडत आहेत. शेकडो लोकांचा मृत्यू होतोय. त्यामुळेच कोरोनावर प्रभावी ठरणाऱ्या औषधांच्या मागणीत मोठी वाढ झालीय. यात सर्वात आघाडीवर रेमडेसिवीर (Remdesivir) हे इंजेक्शन आहे. एकिकडे रेसमडेसिवीरची मागणी वाढत आहे, तर दुसरीकडे औषध विक्रेत्यांकडून नफेखोरीसाठी याचा काळाबाजारही होत आहे. त्यामुळे या औषधांच्या किमतीने आकाशाला गवसणी घातलीय. म्हणूनच सर्वसामान्यांना हे औषध खरेदी करणं अशक्य झालंय. मात्र, तज्ज्ञांनी रेमडेसिवीर हे कोरोनावरील उपचारासाठी एकमेव प्रभावी औषध नसल्याचं सांगितलंय. तसेच सरकारने हे औषध उपलब्ध करुन देणाऱ्या 7 कंपन्यांच्या औषधांचे तपशील किमतीसह जाहीर केले आहेत (Know all about alternative medicines for Remdesivir in Corona treatment).
रेमडेसिवीरच्या किमतीत 70 टक्के कपात
देशभरात कोरोना विषाणूच्या संसर्गाने मोठं आव्हान उभं केलंय. त्यामुळे रेसमडेसिवीर औषधाचा काळाबाजार होत असल्याचेही प्रकार समोर आले. यानंतर केंद्र सरकारने रेमडेसिवीरच्या किमतीत कपात करण्याचा निर्णय घेतलाय. सरकारच्या निर्णयानंतर रेमडेसिवीर औषध उत्पादन कंपन्यांनी त्याच्या किमतीत जवळपास 70 टक्के कपात केलीय.
Zydus Cadila कंपनीचं रेमडेसिवीर औषध सर्वात स्वस्त
औषध उत्पादक कंपनी Zydus Cadila ने आपल्या रेमडेसिवीर औषधाची किंमत 899 रुपये केलीय. या कंपनीचं रेमडेसिवीर औषध बाजारात Remdac नावाने उपलब्ध आहे. याची आधी किंमत 2 हजार 800 रुपये होती. याशिवाय सध्या बाजारात सर्वात महाग रेमडेसिवीर औषध Hetero Healthcare Limited कंपनीचं आहे. याचं बाजारातील नाव Covifor असं आहे. त्याची नवी किंमत 3490 रुपये आहे. आधी Covifor या औषधाची किंमत तब्बल 5400 रुपये होती.
कोणत्या 7 औषधांची यादी जाहीर
Here are the revised prices of major brands of #Remdesivir Injection 100mg/Vial
Major manufacturers have reported voluntary reduction in MRP after Govt. intervention #Unite2FightCorona@airnews_mumbai pic.twitter.com/zbp03smqpy
— PIB in Maharashtra ?? (@PIBMumbai) April 17, 2021
इबोला विषाणूवर उपचारासाठी रेमडेसिवीरची निर्मीती
अमेरिकन औषध निर्माता कंपनी Gilead Sciences ने इबोला विषाणूच्या उपचारासाठी रेमडेसिवीरची निर्मिती केली होती. त्यानंतर आता कोरोना विषाणूच्या संसर्गावर उपचारासाठीही या औषधाचा वापर होतो. रेमडेसिवीर औषध कोरोना विषाणूला पोषक करणाऱ्या संप्रेरकांवर (एन्जाइम्स) प्रभावीपणे काम करत बंद करते, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय.
हेही वाचा :
आम्ही रेमडेसिवीर काय पाकिस्तान किंवा चायनाला देत होतो का?; चंद्रकांत पाटलांचा सवाल
रेमडेसिवीरचा ‘गेम’डीसिवीर करू नका; आठवलेंनी ठाकरे सरकारला डिवचले
व्हिडीओ पाहा :
Know all about alternative medicines for Remdesivir in Corona treatment