Insurance on the Spot : किंतु नाही की परंतु नाही, आता रस्त्यावरील वाहनांचा विमा ऑन दी स्पॉट!

Insurance on the Spot : विम्याविषयी भारतीय अत्यंत बेफिकीर आहेत. आरोग्य, जीवन विमाबाबतच हा टक्का अत्यंत कमी आहे. त्यात वाहन विमा पुन्हा नुतनीकरण करणाऱ्यांची संख्याही कमी आहे. त्यावर आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता रस्त्यावरील वाहनांचा विमा ऑन दी स्पॉट करण्यात येणार आहे.

Insurance on the Spot : किंतु नाही की परंतु नाही, आता रस्त्यावरील वाहनांचा विमा ऑन दी स्पॉट!
Follow us
| Updated on: Mar 03, 2023 | 11:06 AM

नवी दिल्ली : विना विमा (without Insurance) रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांचा आता ‘ऑन दी स्पॉट’ विमा करण्यात येईल. केंद्र सरकार मोटार विमा अधिनियमात मोठा बदल करणार आहे. ज्या वाहनांचा विमा नसेल. त्यांना ट्रॅफिक चेंकिंगमध्ये तात्काळ बाजूला घेण्यात येईल. त्यांना वाहन विमा खरेदी करावा लागेल. ऑन द स्पॉट (On The Spot) हा विमा खरेदी करावा लागेल. त्यासाठी वाहनधारकाकडून रक्कम वसूल करण्यात येईल. फास्टॅगमधून (Fastag) ही रक्कम कापण्यात येईल. एकदा नियम लागू झाल्यावर वाहनधारकांना विना विमा रस्त्यावर वाहन चालवता येणार नाही. या महत्वपूर्ण निर्णयामुळे रस्त्यावरील अपघात कमी करण्याचा प्रयत्न आहे. तसेच अपघातातील मयताला विमाच्या माध्यमातून तात्काळ आर्थिक मदत करता येणार आहे. तर मोटार अपघात न्यायाधिकरणावरील ताणही मोठ्या प्रमाणात कमी होईल.

रस्त्यावर वाहन चालविण्यासाठी त्याचा विमा काढणे आवश्यक आहे. जर एखादे वाहन विना विमा रस्त्यावरुन धावत असेल तर नियमानुसार वाहनधारकाला दंड लावल्या जातो. आता विम्याविषयी नियमात नवीन सुधारणा होत आहे. त्यामुळे वाहनधारकांना केवळ दंडच नाही तर ऑन द स्पॉट विमाही खरेदी करावा लागणार आहे. ही रक्कम फास्टॅगच्या माध्यमातून वसूल करण्यात येईल. त्याशिवाय वाहन सोडण्यात येणार नाही.

वाहतूक विभागाच्या नियमानुसार, विना विमा रस्त्यावर चालणाऱ्या वाहनांना लवकरच लगाम घालण्यात येणार आहे. वाहन विम्याबाबत भारतीय अत्यंत निष्काळजी असल्याचे आकड्यावरुन दिसून येते. आकड्यानुसार, भारतात जवळपास 50 टक्के वाहन विना विमा रस्त्यावर धावत आहेत. जर एखाद्या वेळी अपघात झाल्यास या वाहनातील प्रवासी आणि समोरील वाहनातील प्रवाशांना उपचारांसाठी वा मृत्यूनंतर कोणताही फायदा होत नाही. त्यामुळे प्रत्येक वाहनांना कमीत कमी थर्ड पार्टी इन्शुरन्स असणे आवश्यक आहे.

हे सुद्धा वाचा

आता सरकार याविषयीच्या व्यवस्थेत अमुलाग्र बदल करणार आहे. त्यासाठी पोलीस आणि वाहतूक विभागाला एकत्रित उपकरण देण्यात येणार आहे. त्यामाध्यमातून दोन्ही विभागांना वाहनाची संपूर्ण कुंडली एकाचवेळी दिसेल. ज्या वाहनधारकांनी वाहनाचा विमा घेतला नाही. त्यांचा रेकॉर्ड लागलीच स्क्रीनवर दिसेल. त्यामुळे अशा वाहनधारकांची, त्याच्या वाहनाची संपूर्ण कुंडलीच दोन्ही विभागाकडे एकाचवेळी असेल. विना विमा धावणाऱ्या वाहनधारकांना दंडासोबतच जागच्या जागी वाहन विमा खरेदी करावा लागेल.

IRDAI ने यापूर्वीच विना विमा पकडल्या गेलेल्या वाहनाधारकांसाठी तात्पुरत्या विम्याची सोय केलेली आहे. शॉर्ट टर्म विमा पॉलिसी अगोदरच आहे. पण आता नवीन नियमानुसार ही पॉलिसी थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये बदलण्यात येईल. सध्या हा नवीन नियम लवकर लागू करण्यासाठी कायदेशीर अडचणी दूर करण्यात येत आहे. त्यासंबंधीच्या चर्चा आणि प्रक्रिया सरकारी पातळीवर सुरु आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.