President Election Results : 5 लाख पगार, 340 खोल्यांचं राष्ट्रपती भवन; जाणून घ्या राष्ट्रपती झाल्यावर काय मिळतात सुविधा

मुघल गार्डन्स हे राष्ट्रपती भवनाचे सगळ्यात मोठे आकर्षण आहे. त्याचा परिसर पंधरा एकरांचा आहे. ते प्रत्येकवर्षी सामान्य लोकांसाठी खुले केले जाते. तिथे प्रत्येकवर्षी झाडे लावली जातात.

President Election Results : 5 लाख पगार, 340 खोल्यांचं राष्ट्रपती भवन; जाणून घ्या राष्ट्रपती झाल्यावर काय मिळतात सुविधा
जाणून घ्या राष्ट्रपती झाल्यावर काय मिळतात सुविधाImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Jul 21, 2022 | 2:43 PM

मुंबई – आज आपल्या देशाला नवा राष्ट्रपती (President) कोण मिळणार हे काही तासात स्पष्ट होईल. राष्ट्रपती निवडणुकीची मतमोजणी आज संसद भवनात सुरु आहे. पाचवाजेपर्यंत निकाल लागण्याची शक्यता आहे. द्रौपदी मुर्म (Draupadi Murmu)आणि यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) हे दोन उमेदवार राष्ट्रपती पदाच्या रिंगणात उभे आहेत. द्रौपदी मुर्म या जिंकतील असा भाजपाला विश्वास आहे. त्यामुळे त्यांनी आत्तापासून जल्लोष करायला सुरुवात केली आहे. तसेच द्रौपदी मुर्म यांच्या गावात लोक नृत्य करुन आनंद साजरा करीत आहेत. समजा द्रौपदी मुर्म या निवडणूक जिंकल्या तर देशातील त्या पहिल्या राष्ट्रपती आदिवासी महिला असतील. 18 जुलैला राष्ट्रपती पदासाठी निवडणूक झाली होती. 24 जुलै रोजी रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ संपत आहे. राष्ट्रपती हे देशाचे सर्वोच्च पद आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश राष्ट्रपतींना शपथ देतात. राष्ट्रपतींच्या मान्यतेशिवाय कोणताही कायदा तयार होऊ शकत नाही. आज आपल्या देशाला नवे राष्ट्रपती मिळणार आहेत. त्यांना किती पगार असतो.

राष्ट्रपती पदावर असणाऱ्या व्यक्तीला पगार आणि सुविधा काय आहेत?

  1. 2018 पर्यंत राष्ट्रपतींना दरमहा 1.50 लाख रुपये पगार मिळत होता. पण त्यामध्ये आता वाढ करण्यात आली आहे. त्यामध्ये पाच लाखांची वाढ करण्यात आली आहे. त्याचबरोबर राष्ट्रपतींना मोफत वैद्यकीय उपचार, टेलिफोन बिल, घर, वीजयासह अनेक भत्तेही मिळतात.
  2. राष्ट्रपतींना प्रवासासाठी मर्सिडीज-बेंझ एस 600 पुलमन गार्ड वाहन आहे. विशेष म्हणजे राष्ट्रपतींना स्पेशल रक्षक असतात. त्यांची सध्याची संख्या 86 एवढी आहे.
  3. जी व्यक्ती राष्ट्रपती पदावरून निवृत्त होते, त्या व्यक्तीला अडीच लाख रुपये पेन्शन मिळते. त्याच्यासोबत एक बंगला देण्यात येतो. त्याबरोबर दोन मोबाईल फोन आणि आजीवन मोफत उपचार सुविधा उपलब्ध आहे. माजी राष्ट्रपतींना सहाय्यकासोबत रेल्वे किंवा विमानाने प्रवास करण्याची सुविधाही मिळते.

राष्ट्रपती 340 खोल्यांच्या इमारतीत राहतात

  1. राष्ट्रपती नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात राहतात. राष्ट्रपती भवन ब्रिटीश व्हाईसरॉयसाठी बनवले आहे. भवन तयार करण्यासाठी 17 वर्षे लागली होती. 1929 मध्ये ते पूर्णपणे तयार झाले होते. या इमारतीची रचना एडवर्ड लुटियन्स आणि हर्बर्ट बेकर यांनी केली होती.
  2. हे सुद्धा वाचा
  3. राष्ट्रपती भवनचा परिसर 320 एकाराचा आहे. विशेष म्हणजे ती इमारत चार मजली अजून त्यामध्ये 340 खोल्या आहेत. राष्ट्रपती भवन बांधण्यासाठी सुमारे 45 लाख विटांचा वापर करण्यात आला. राष्ट्रपती भवनाच्या इमारतीशिवाय मुघल गार्डन आणि कर्मचाऱ्यांचे निवासस्थानही आहे.
  4. मुघल गार्डन्स हे राष्ट्रपती भवनाचे सगळ्यात मोठे आकर्षण आहे. त्याचा परिसर पंधरा एकरांचा आहे. ते प्रत्येकवर्षी सामान्य लोकांसाठी खुले केले जाते. तिथे प्रत्येकवर्षी झाडे लावली जातात.

राष्ट्रपतींचे अधिकार काय आहेत?

राष्ट्रपतींची मुख्य जबाबदारी म्हणजे पंतप्रधानांची नियुक्ती आणि संविधानाचे रक्षण करणे. राष्ट्रपतींच्या मंजुरीशिवाय कोणतेही विधेयक मंजूर होत नाही. राष्ट्रपती धन विधेयक वगळता कोणतेही विधेयक पुनर्विचारासाठी पाठवू शकतात. राष्ट्रपती हे तिन्ही सैन्यांचे सर्वोच्च कमांडर आहेत.

Non Stop LIVE Update
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.