International Labor Day 2021 : जाणून घ्या 1 मे रोजी ‘कामगार दिवस’ का साजरा केला जातो?
हा दिवस जगभर साजरा केला जातो आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिन, कामगार दिन आणि मे दिन या नावानेही ओळखला जातो. (Know why May 1 is celebrated as Labour Day, when it is start)
नवी दिल्ली : दरवर्षी 1 मे हा आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस कामगारांचे कर्तृत्व साजरे करण्यासाठी आणि कामगारांच्या शोषणाबद्दल जनजागृती करण्यासाठी साजरा केला जातो. हा दिवस जगभर साजरा केला जातो आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिन, कामगार दिन आणि मे दिन या नावानेही ओळखला जातो. (Know why May 1 is celebrated as Labour Day, when it is start)
कामगार दिनाचा इतिहास
1989 मध्ये, मार्क्सवादी आंतरराष्ट्रीय समाजवादी कॉंग्रेसने एका आंतरराष्ट्रीय प्रदर्शनासाठी ठराव मंजूर केला, ज्यामध्ये त्यांनी कामगारांना दिवसातील 8 तासांपेक्षा जास्त काम न करण्याची मागणी केली. त्यानंतर, हा वार्षिक कार्यक्रम झाला आणि 1 मे कामगार दिन म्हणून साजरा करण्यास सुरवात झाली.
पूर्वी, कामगारांचे मोठ्या प्रमाणात शोषण केले जायचे. दिवसातील 15 तास त्यांना राबवले जात होते. याविरुद्ध 1886 मध्ये कामगार एकत्र आले आणि त्यांनी त्यांच्या हक्काविरोधात आवाज उठवण्यास सुरवात केली. याचा निषेध म्हणून, त्यांनी दररोज 8 तासाची ड्युटी आणि पगाराची रजेची मागणी केली.
भारतात चेन्नईमध्ये 1923 मध्ये कामगार दिन साजरा करण्यात आला. लेबर फार्मर्स पार्टी ऑफ इंडियाने हा दिवस साजरा केला. या दिवशी कम्युनिस्ट नेते मल्यापुरम सिंगारावेलु चेतियार यांनीही सरकारला सांगितले की कामगारांच्या प्रयत्नांचे आणि कार्याचे प्रतीक म्हणून हा दिवस राष्ट्रीय सुट्टी म्हणून जाहीर करावा. हा दिवस कामगार दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून ओळखला जातो.
कामगार दिवस 2021 थीम
आंतरराष्ट्रीय कामगार दिन 1 मे रोजी साजरा केला जाईल आणि दरवर्षी कामगारांच्या प्रयत्नांचे प्रतीक असलेली एक कॉमन ऑब्झर्वेशन थीम आहे. 2021 थीम अद्याप जाहीर केलेली नाही. मात्र लवकरच याची घोषणा केली जाईल. 2019 मध्ये कामगार दिनाची थीम होती, “सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी कामगारांना एकत्रित करणे”
मे दिवस कसा साजरा करतात?
या दिवशी निषेध, संप आणि मोर्चे होतात. तथापि, यावेळी कोरोनो महामारीमुळे उत्सव काही वेगळे असतील. कोरोना व्हायरसमुळे कार्यक्रमांवर बंदी आहे. लोकांना एकत्र जमण्यास बंदी आहे. त्यामुळे छोट्या स्वरुपात कार्यक्रम साजरे केले जात आहेत. (Know why May 1 is celebrated as Labour Day, when it is start)
कोरोना कालावधीत हेल्पलाईन कामगारांना सरकारचा दिलासा, विमा योजना 6 महिन्यांसाठी वाढवली#coronacasesinindia #PMnarendramodi #insurancescheme #healthworkers https://t.co/VAbSEn1jbD
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 30, 2021
इतर बातम्या
ऑक्सिजनचे टेन्शन लवकरच संपणार; देशभर प्लान्ट उभारण्याच्या मोहिमेला गती
1 मे रोजी 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण होणार, महापालिकेची 5 लसीकरण केंद्रे सज्ज