चक्रिवादळानंतर का चर्चेत आले ओएनजीसी बार्ज?, जाणून घ्या याचा काय असतो उपयोग

ऑईल अँड नॅच्युरल गॅस कॉर्पोरेशन (ONGC)ने याची अधिकृत पुष्टी केली आहे. या बार्जमध्ये त्यांचे 261 कर्मचारी होते, असे ओएनजीसीने म्हटले आहे. (know why ONGC barges came up in famous after the hurricane, what is uses of it)

चक्रिवादळानंतर का चर्चेत आले ओएनजीसी बार्ज?, जाणून घ्या याचा काय असतो उपयोग
चक्रिवादळानंतर का चर्चेत आले ओएनजीसी बार्ज
Follow us
| Updated on: May 22, 2021 | 10:14 PM

नवी दिल्ली : देशात आलेल्या तौक्ते वादळाने सर्वत्र हाहाःकार माजवला. रविवारी 16 मे रोजी हे वादळ गोव्यात धडकले. त्यानंतर कोकण, मुंबईतून सरकत गुजरातकडे गेले. वादळामुळे समुद्राला उधाण आले होते. समुद्र खवळला होता, उंचच उंच लाटा समुद्रात उसळत होत्या. या वादळात शेती, घरे, बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या वदाळात ओएनजीसी कंपनीचे बार्ज P-305 ही बुडाले. ऑईल अँड नॅच्युरल गॅस कॉर्पोरेशन (ONGC)ने याची अधिकृत पुष्टी केली आहे. या बार्जमध्ये त्यांचे 261 कर्मचारी होते, असे ओएनजीसीने म्हटले आहे. हे सर्वजण बॉम्बे हाय येथे ऑफशोर ड्रिलिंगसाठी गेले होते. वादळामुळे ते तिथेच अडकले आणि बार्ज बुडायला लागला. या घटनेत आतापर्यंत 49 लोकांचे मृतदेह काढण्यात आले आहेत. (know why ONGC barges came up in famous after the hurricane, what is uses of it)

सामानाची वाहतूक करण्यासाठी होतो बार्जचा वापर

बार्जचा फ्लोर पूर्णपणे सपाट असतो आणि नद्यांच्या आणि मोठ्या कालव्यांमधून जड वस्तूंच्या वाहतुकीच्या उद्देशाने ते तयार केले जाते. आजच्या काळात बार्जचा वापर मोठ्या प्रमाणात एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी माल नेण्यासाठी केला जातो. सामान पाठविण्यासाठी बार्जचा वापर केला जातो कारण ते इतर जहाजांपेक्षा अधिक स्वस्त असतात. चक्रिवादळात दुर्घटनाग्रस्त झालेले बार्ज पी -305 अपघातावेळी किनाऱ्यापासून सुमारे 70 किमी अंतरावर होते. ओएनजीसीच्या ऑईल रिग्स व प्लॅटफॉर्मवर करारावर घेतलेल्या कामगारांसाठी हे बार्ज राहण्यासाठी घेतले जातात. हे सर्व कामगार त्यावर बांधलेल्या क्वार्टरमध्ये राहत होते. बार्ज पूर्णपणे शक्तीहीन असतात आणि यामुळे टगबोटच्या मदतीने ते किना-यावर आणले जातात.

आणखी तीन लोक बार्जवर अडकले

चक्रीवादळ मुंबईत धडकल्यानंतर पश्चिम किनाऱ्यावरील चार बार्ज वाहून गेल्या. यानंतर राष्ट्रीय तटरक्षक दल (NCG) आणि भारतीय नौदलाने बचावकार्य सुरू केले. दोघांच्या मदतीने 147 जणांना बार्जमधून बाहेर काढण्यात आले. आणखी तीन बार्ज वादळाचा बळी ठरले, यात शेकडो कामगार होते. या सर्वांकडून मदतीसाठी सिग्नल पाठविण्यात आला. मंगळवारी हवामान स्वच्छ झाल्यावर हेलिकॉप्टर्स रेस्कूसाठी पाठविण्यात आले. चार बार्जवर अंदाजे 800 लोक होते.

अलर्टकडे दुर्लक्ष केले

गेल्या आठवड्यात भारतीय तटरक्षक दलाने इशारा दिला होता. या इशाऱ्यात नाविक, नौका आणि मच्छीमारांना समुद्राच्या किनाऱ्यापासून दूर राहण्यास सांगण्यात आले होते. तटरक्षक दलाचे प्रवक्ते कमांडंट आर के सिंह यांनी सांगितले की महाराष्ट्र, गोवा, तामिळनाडू, केरळ आणि लक्षद्वीप येथे हवामान सतर्कता जारी करण्यात आली आहे. नॅशनल डिजास्टर रिस्पॉन्स फोर्स (NDRF) च्या वतीने प्रत्येक राज्यात पाच वेगवेगळी पथके तैनात करण्यात आली होती. हवामान खात्याने चक्रीवादळ येण्यापूर्वी पाच दिवस अगोदर इशारा देखील दिला होता. यानंतरही 800 लोकांचे जीव धोक्यात घालण्यात आले. (know why ONGC barges came up in famous after the hurricane, what is uses of it)

इतर बातम्या

Hyundai Alcazar SUV ची वाट पाहणाऱ्यांसाठी वाईट बातमी, कंपनीने लाँचिंगबाबतचा निर्णय बदलला

Viral Video | देशी जुगाड! हा आगळावेगळा मास्क पाहून तुम्हीही चक्रावून जाल; एकदा व्हिडीओ पाहाच!

नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.