नवऱ्याने पत्नीच्या 14 बॉयफ्रेंडसना पाठवली नोटीस; नुकसानभरपाईची मागणी

आपल्या ड्रायव्हरच्या मदतीने या व्यक्तीने पत्नीवर पाळत ठेवली होती. तिच्याविरुद्ध पुरावे गोळा केल्यानंतर या व्यक्तीने पत्नीच्या 14 प्रियकरांवर कायदेशीर दावा ठोकला. | defamation notices to wifes 14 boyfriends

नवऱ्याने पत्नीच्या 14 बॉयफ्रेंडसना पाठवली नोटीस; नुकसानभरपाईची मागणी
Follow us
| Updated on: Dec 15, 2020 | 8:28 AM

कोलकाता: आपल्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा प्रकार समोर आल्यानंतर कोलकातामधील एका व्यक्तीने तिच्या प्रियकरांना नोटीस धाडून 100 कोटी रुपयांची मागणी केल्याचा प्रकार नुकताच समोर आला. हा सर्व प्रकार चित्रपटात शोभेल असा आहे. कोलकातामध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीला आपल्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. तिच्यावर पाळत ठेवल्यानंतर आपल्या पत्नीचे एक-दोन नव्हे तर 14 प्रियकर असल्याची धक्कादायक बाब या व्यक्तीच्या निदर्शनास आली. त्यानंतर या व्यक्तीने या सर्व प्रियकारांना कायदेशीर नोटीस धाडल्या आहेत. (Kolkata Man sends 100 crore defamation notices to wifes 14 boyfriends)

बांग्ला इंडियन एक्स्प्रेसच्या माहितीनुसार, या व्यक्तीने आपल्या पत्नीच्या 14 प्रियकरांकडे नुकसान भरपाई म्हणून 100 कोटीची मागणी केली आहे. तुमच्यामुळे माझे वैवाहिक आयुष्य उद्ध्वस्त झाल्याचे या व्यक्तीने नोटीसमध्ये म्हटले आहे.

या महिलेचा पती कोलकातामधील एक उद्योजक आहे. पत्नीच्या प्रियकरांमुळे आपले वैवाहिक जीवन उद्ध्वस्त झाले. आपली सामाजिक प्रतिष्ठा धुळीस मिळाली, असे या व्यक्तीचे म्हणणे आहे.

आपल्या ड्रायव्हरच्या मदतीने या व्यक्तीने पत्नीवर पाळत ठेवली होती. तिच्याविरुद्ध पुरावे गोळा केल्यानंतर या व्यक्तीने पत्नीच्या 14 प्रियकरांवर कायदेशीर दावा ठोकला. या सगळ्यांनी दोन आठवड्यांच्या कालावधीत नुकसान भरपाईची रक्कम न दिल्यास कायदेशीर कारवाईला तयार राहावे, असा इशारा नोटीसमध्ये देण्यात आला आहे.

नोटीसमध्ये आणखी काय म्हटले आहे?

तुमचे माझ्या पत्नीशी शारीरिक संबंध आहेत आणि गोपनीय पद्धतीने माझी पत्नी तुमच्या संपर्कात आहे. ती विवाहित असून मी तिचा पती असल्याचे तुम्हाला माहिती आहे. यानंतरही तुम्ही तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करून माझे जीवन उद्ध्वस्त केले. त्यामुळे मी यातनामय आयुष्य जगत आहे. माझी सामाजिक प्रतिष्ठा पूर्णपणे धुळीस मिळाली. परिणामी आता तुम्ही मला नुकसानभरपाई म्हणून दोन आठवड्यांत 100 कोटी रुपये द्यावेत. अन्यथा कायदेशीर कारवाईला समोर जाण्यासाठी तयार राहावे, असे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या:

अनैतिक संबंधातून सुटका करुन घेण्यासाठी मित्रानेच केली तृतीयपंथी युवकाची हत्या

उत्तर प्रदेशमध्ये ‘सैराट’, मुलीला गोड बोलून माहेरी आणलं, नंतर गोळी झाडून हत्या, मृतदेह शेतात पुरला

भर दुपारी शिक्षिकेचा संशयास्पद मृत्यू, पतीनेही विष पिल्याने गुंता वाढला; मृत्यूचे नेमके कारण शोधण्याचे आव्हान

(Kolkata Man sends 100 crore defamation notices to wifes 14 boyfriends)

दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर.
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?.
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी.
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?.
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?.
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.