कोलकातामध्ये रेल्वेच्या इमारतीला भीषण आग; अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांसह 9 जणांचा होरपळून मृत्यू

| Updated on: Mar 09, 2021 | 8:24 AM

सोमवारी रात्री हे सर्वजण एका लिफ्टने वरच्या मजल्यावर जात होते. त्यावेळी इमारतीचा वीजपुरवठा खंडित झाल्याने लिफ्ट बंद पडली. | Kolkata Fire

कोलकातामध्ये रेल्वेच्या इमारतीला भीषण आग; अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांसह 9 जणांचा होरपळून मृत्यू
Follow us on

कोलकाता: कोलकाताच्या स्ट्रँड रोडवर असलणाऱ्या एका बहुमजली इमारतीला सोमवारी रात्री भीषण आग (Fire) लागली होती. या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. या इमारतीमध्ये दक्षिण-पूर्व रेल्वेचे विभागीय कार्यालय आहे. मृतांमध्ये रेल्वे आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. (Fire in Kolkata Railway building)

प्राथमिक माहितीनुसार, सोमवारी रात्री हे सर्वजण एका लिफ्टने वरच्या मजल्यावर जात होते. त्यावेळी इमारतीचा वीजपुरवठा खंडित झाल्याने लिफ्ट बंद पडली. या दुर्घटनेनंतर ममता बॅनर्जी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यानंतर राज्य सरकारकडून मृतांच्या वारसांना 10 लाखांची आर्थिक मदत देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

रात्री साधारण 11 वाजण्याच्या सुमारास आग नियंत्रणात आली. सोमवारी संध्याकाळी साधारण सव्वासहाच्या सुमारास 13 व्या मजल्यावर ही आग लागली. आग लागल्याचे समजल्यानंतर सुरक्षा कर्मचारी तातडीने 13व्या मजल्यावर पोहोचले. त्यांनी बहुतांश कर्मचाऱ्यांना बाहेर काढले. साधारण साडेसहाच्या सुमारास अग्निशमन दलाचे जवान इमारतीमध्ये आले. ही आग भीषण असल्याने अग्निशमन दलाच्या जवानांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. यावेळी रेल्वे अधिकारी पार्था सारथी मंडल आणि एस सहनी या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला.

रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

या घटनेनंतर रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. या दुर्घटनेत रेल्वे व अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांसह नऊ जणांचा मृत्यू झाला. आम्ही या सगळ्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहोत, असे पीयूष गोयल यांनी सांगितले.

(Fire in Kolkata Railway building)