बंगळुरू: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसाच्या दौऱ्यासाठी काल शनिवारी कर्नाटकात आले आहेत. शहा यांच्या हस्ते शनिवारी रॅपिड अॅक्शन फोर्स सेंटरची कोनशिला बसविण्यात आली. मात्र, या कोनशिलेवर केवळ हिंदी आणि इंग्रजीतूनच मजकूर लिहिलेला होता. कोनशिलेतून कानडी हद्दपार करण्यात आल्याने जनता दल संयुक्तचे नेते आणि माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी प्रचंड भडकले आहेत. (Kumaraswamy provokes Amit Shah, says “Why should home minister reply…”)
कुमारस्वामी यांनी ट्विटरवरून संताप व्यक्त केला आहे. अमित शहा यांच्या हस्ते शनिवारी शिवमोगाच्या भद्रावती येथे आरएएफ युनिटचा शिलान्यास करण्यात आला. त्याच्या फाऊंडेशन पॅनलवर हिंदी आणि इंग्रजीचा उल्लेख आहे. यावेळी कन्नड भाषेची उपेक्षा करण्यात आली आहे. देशाने त्रिभाषा सूत्रं स्वीकारलेलं आहे. त्यामुळे संबंधित राज्याच्या भाषेचा सन्मान करणं हे केंद्राचं कर्तव्य आहे. गृहमंत्र्यांनी त्रिभाषा सूत्राची केलेली अवहेलना आणि कन्नड भाषा आणि कन्नड नागरिकांचा अपमान करणारी आहे, असं कुमारस्वामी यांनी म्हटलं आहे.
गृहमंत्री, मुख्यमंत्र्यांनी अपमान केला
ही गोष्ट कन्नड भाषिकांसाठी अत्यंत अपमानास्पद आहे. सेंटरसाठी जी जमीन दिली आहे. ती कन्नड भूमीची आहे. त्यामुळे कन्नड भाषेची उपेक्षा का करण्यात आली? याचं उत्तर गृहमंत्र्यांनी दिलं पाहिजे. जी व्यक्ती जमीन आणि भाषेची रक्षा करू शकत नाही, ती व्यक्ती राज्य करू शकत नाही. केंद्रीय गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी कानडी जनतेचा विश्वासघात केला आहे, अशी टीकाही त्यांनी केलीय.
अमित शहा यांनी शनिवारी शिवमोगाच्या भद्रावती येथे रॅपिड अॅक्शन फोर्स सेंटरचं भूमिपूजन केलं. यावेळी त्यांच्या हस्ते या सेंटरची कोनशिला बसवण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा उपस्थित होते. सेंटरचा शिलान्यास केल्यानंतर शहा यांनी आनंद व्यक्त केला होता. या सेंटरसाठी 230 कोटी रुपये खर्च होणार आहे. या सेंटरमध्ये प्रशासकीय भवन, निवास केंद्र, रुग्णालय, केंद्रीय स्कूल आणि स्टेडियम असणार आहे. (Kumaraswamy provokes Amit Shah, says “Why should home minister reply…”)
LIVE | नालासोपारा ते वसई फाटा वाहतूक खोळंबली, वाहनांच्या 2 किमीपर्यंत रांगाhttps://t.co/6UWud9bZbO#LIVE |#Livestream | #news | #NewsUpdate
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 17, 2021
संबंधित बातम्या:
अमेरिकेत गुंडगिरी करून ट्रम्प यांच्याकडून माझ्या पक्षाची बदनामी; आठवलेंची टीका
आपण टाळ्या-थाळ्या वाजवल्या, दिवे लावले; यामुळे देशाचा आत्मविश्वास वाढला : नरेंद्र मोदी
(Kumaraswamy provokes Amit Shah, says “Why should home minister reply…”)