‘हनीमूनसाठी 100% बेस्ट जागा..’ वादानंतर लक्षद्वीपमध्ये पर्यटकांची गर्दी वाढली, टूरिस्ट भलतेच खुश

lakshadweep Tourism : भारत वि मालदीव असा वाद सुरू असातनाच सोशल मीडियावर Boycott Maldives हे ट्रेडिंगमध्ये आहे. तर लक्षद्वीपच्या पर्यटनामध्येही बरीच वाढ झाली असून पर्यटकांचा ओघही वाढला आहे.

'हनीमूनसाठी 100% बेस्ट जागा..' वादानंतर लक्षद्वीपमध्ये पर्यटकांची गर्दी वाढली, टूरिस्ट भलतेच खुश
Follow us
| Updated on: Jan 11, 2024 | 1:11 PM

Lakshadweep Tourism : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर त्यांचे फोटो बरेच व्हायरल झाले. मात्र या दौऱ्यानंतर भारत विरुद्ध मालदीव वादाला सुरूवात झाली. गेल्या काही दिवसांपासून हा वाद सुरू असून त्याचे पडसाद देशभरात उमटले आहेत. पंतप्रधान मोदी यांनी लक्षद्वीप भेटीच्या फोटोंवर मालदीव सरकारमधील काही मंत्र्यांनी आपत्तीजनक टिप्पणी केल्याने हा वाद सुरू झाला. मात्र देशभरातील नागरिकांनी यामुळे मालदीववर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. सोशल मीडियावर तर Boycott Maldives हा ट्रेंडही सुरू झाला.

दरम्यान पंतप्रधान मोदींनी लक्षद्वीप दौऱ्याचे फोटो शेअर करून तिथे अधिकाधिक लोकांना येण्याचे आवाहनही केले. त्यानंतर सोशल मीडियावर लक्षद्वीप सतत ट्रेंडमध्ये आहे. अनेक भारतीयांनी मालदीव बॉयकॉट केले, आत्तापर्यंत मालदीवमधील हजारो बूकिंग्सही कॅन्सल झाली. भारत वि. मालदीव असा वाद सुरू असतानाच लक्षद्वीप मात्र बरेच चर्चेत आले आहे. क्षद्वीपच्या पर्यटनामध्येही बरीच वाढ झाली असून पर्यटकांचा ओघही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तेथील पर्यटक तिथल्या सौंदर्याबद्दल आणि जागेबद्दल काय म्हणाले, जाणून घेऊया.

सुट्टीसाठी आला मित्रांचा ग्रुप

हे सुद्धा वाचा

आंध्र प्रदेशमधून आठ मित्रांचा एक ग्रुप अगाती आयलंड फिरण्यासाठी तेथे आला. त्यांनी तेथील अनुभव शेअर केले. इथे ( या आयलंडवर) खूपच स्वच्छता आहे, खूपच. पाणीदेखील अगदी नितळ, स्वच्छ आहे. बीचवर राहणाऱ्या स्थानिक लोकांनी काहीच घाण केलेली नाही, असं एक तरूणाने सांगितलं. हे सगळे तरूण आंध्र प्रदेशमधून कार्डेलिया शिपद्वारे बुधवारी तिथे पोहोचले. आम्हाला इथला निसर्ग, त्याचे सौंदर्य पहायचे होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यापूर्वीच, खूप आधीच आम्ही ही ट्रीप प्लान केली होती. पण आता पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे तर या जागेची आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा होऊ लागली की. बरेच जण आम्हाला फोन करत आहेत, ते म्हणतायत की तुम्ही पंतप्रधान मोदींना फॉलो केलं आणि म्हणूनच आता तिथे सुट्टीला गेला आहात, असा अनुभव एका तरूणाने सांगितला.

‘हनीमूनसाठी 100% बेस्ट जागा..’

आता मला असं वाटायला लागलंय की, बरेच लोक सुट्टीसाठी आता इकडे यायला लागतील आणि पुन्हा पुन्हा येतील. त्यामुळे इथल्या पर्यटनालाही चालना मिळेल, ज्याचा इथल्या स्थानिक लोकांना फायदा होईल, असं मत एका तरूणाने व्यक्त केलं. मला वाटतं हनिमूनसाठी हे सर्वोत्तम ठिकाण आहे. लोक कमी आहेत आणि मजा खूप करता येईल. हनीमूनसाठी ही 100 % बेस्ट जागा आहे, असंही तो तरूण म्हणाला.

पर्यटनाला चालना देण्यासाठी सरकारचे प्रयत्न

लक्षद्वीपमध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी सरकार अनेक वर्षांपासून काम करत आहे. येथील पायाभूत सुविधा सुधारल्या जात आहेत. विजेची गरज भागविण्यासाठी सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याची तयारी सुरू आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी जलसंचय प्रकल्पाचे काम सुरू आहे. मात्र, तरीही कनेक्टिव्हिटी ही मोठी समस्या आहे.

लक्षद्वीप हा ३६ लहान बेटांचा समूह आहे. आणि एका बेटावरून दुसऱ्या बेटावर जाण्यासाठी स्पीड बोट हे एकमेव साधन आहे. राजधानी कावरत्तीहून अगट्टीला जाण्यासाठी एकच बोट आहे. लक्षद्वीपमध्ये अगट्टी हे एकमेव विमानतळ आहे आणि येथून पर्यटकांना स्पीड बोटीद्वारे एका बेटावरून दुसऱ्या बेटावर नेले जाते. मुख्य भूभाग आणि लक्षद्वीपमधील कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी प्रशासनाने अगट्टी विमानतळाच्या विस्ताराचा प्रस्ताव दिला आहे. सध्या अगट्टी विमानतळावर फक्त छोटी विमाने उतरू शकतात.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.