‘बीजेपी को हटाना है, देश को बचाना है’; ‘या’ दोन्ही नेत्यांचा पुन्हा एल्गार…

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, लालू प्रसाद यादव पुन्हा एकदा सोनिया गांधींच्या भेटीला गेल्यामुळे आता साऱ्याच राजकीय पक्षांचे लक्ष विरोधकांच्या निर्णयाकडे लागले आहे.

'बीजेपी को हटाना है, देश को बचाना है'; 'या' दोन्ही नेत्यांचा पुन्हा एल्गार...
Follow us
| Updated on: Sep 25, 2022 | 7:57 PM

दिल्ली : केंद्रात असलेल्या भाजपला दूर करण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, लालू प्रसाद यादव यांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. हरियाणातील आजची सभा झाल्यानंतर नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव सोनिया गांधींची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहचले. त्यामुळे सोनिया गांधींच्या भेटीनंतर विरोधी पक्षांच्या ऐक्याबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

‘भाजप हटवायचे आहे, देश वाचवायचा आहे’, लालू-नितीश सोनिया गांधींच्या भेटीनंतर म्हणाले दिल्लीत लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी विरोधकांच्या एकजुटीवर भर देत भाजपवर निशाणा साधला. नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव यांनी सोनिया यांच्या निवासस्थानच्या बाहेर येताच विरोधकांची पुन्हा एकदा बैठक होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी या दोन्ही नेत्यांनी ‘बीजेपी को हटाना है, देश को बचाना है’, असं म्हणत विरोधकांचा आवाज बुलंद करणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात असून आणि काही बैठका होणार असल्याचेही या नेत्यांनी सांगितले.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोनिया गांधी यांच्याबरोबरची ही बैठक अत्यंत महत्त्वाची असल्याचे बोलले जात आहे.

नितीश कुमार यांनी विरोधी ऐक्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. सोनिया गांधींची आज भेट घेतल्यानंतर विरोधी गटातील पक्षांमध्ये आणखी बळ येण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

याबैठकीत आगामी निवडणुकीबरोबरच पुढील राजकीय रणनिती कशी आखली जाणार याबाबत चर्चा होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबरोबर आजची ही नियोजित बैठक होती असंही काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.

याआधी नितीश कुमार यांनी दिल्ली दौऱ्यावर असतानाच राहुल गांधी यांचीही भेट घेतली होती. त्यावेळीही त्यांच्याबरोबर गंभीर चर्चा झाल्याचे नितीश कुमार यांनी सांगितले होते.

या भेटीविषयी लालू प्रसाद यादव म्हणाले की, नितीश कुमार आणि मी सोनिया गांधी यांची भेट घेणार होतो हे पूर्वनियोजितच होते. ही भेट फक्त विरोधकांची मोट बांधण्यासाठी आणि राजकीय चर्चा करण्यासाठीच असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी लालू प्रसाद यादव यांना 2024 च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींना तुम्हाला दूर करायचे आहे का, या प्रश्नावर त्यांनी होय मोदींना आम्ही सत्तेतून बाजूलाच करु असा विश्वासही त्यांनीय यावेळी व्यक्त केला.

लालू प्रसाद यादव सध्या किडनीच्या आजाराने त्रस्त आहेत. त्यासाठी ते परदेशातही जाणार आहेत. त्यांची किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया असल्याने ते परदेशात जाणार आहेत. मात्र त्यांचा पासपोर्ट जप्त करण्यात आल्याने त्यांना परदेशात जाऊन उपचार घेता आले नव्हते.

तोपर्यंत त्यांच्यावर एम्समध्येच उपचार सुरु होते. आता सोनिया गांधींची भेट घेऊन ते उपचारासाठी परदेशात जाणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.